म.वि.आ. : असून अडचण नसून खोळंबा

Submitted by pkarandikar50 on 25 April, 2023 - 00:29

म.वि.आ. : असून अडचण नसून खोळंबा
शरद पवार यांच्या ताज्या वक्तव्यानंतर आता म.वि.आ.चा अध्याय संपला का? अशी चर्चा माध्यमातून सुरू झाली आहे. वास्तविक पहाता, २०१४ च्या विधान सभा निवडणूकीत शिवसेना - भा.ज.प. युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी विरोधी पक्षात बसण्याची मानसिक तयारी केली होती. तथापि शिवसेनेची महत्वान्कांक्षा अचानकपणे अनावर झाली आणि भा.ज.प.ला एकदाचा धडा शिकवायचाच या भूमिकेतून शिवसेना अडून बसली. त्यांच्या युतीत असे वितुष्ट यावे हा काही राष्ट्रवादीचा डाव नव्हता. पण तसे आपसूक घडून आल्यावर सत्ता काबीज करण्यासाठी म.वि.आ. हा एक संधीसाधू प्रयोग करून पहाण्याची आलेली चांगली संधी राष्ट्रवादी वाया घालवणार नव्हती.
मुळातच म.वि.आ. म्हणजे गाजराची पुंगी होती. एकदा सत्ता हातातून निसटल्यानंतर आता तिची गरज राष्ट्रवादीला उरलेली नाही. यानंतर निवडणूकीच्या मार्गाने पुन्हा म.वि.आ. सत्तेत येऊ शकत नाही हे राष्ट्रवादीला चांगले ठाऊक आहे. युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्या नंतरही अवास्तव महत्वान्काक्षेपायी जे उद्धव ठाकरे भा.जा.प.ला ‘बाय बाय’ करू शकतात; ते उद्या जागा-वाटपाच्या वेळीही म.वि.आ. मध्ये पेचप्रसंग निर्माण करू शकतात हीच जाणीव शरद पवार यांच्या वक्तव्यामागे दिसते आहे. लोकसभा किंवा विधानसभेआधी उद्या म.न.पा. निवडणूका लागल्यानंतर हा प्रश्न उफाळून येणारच आहे. त्यावेळी म.वि.आ. तून बाहेर पडणे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन घटक पक्षांना भाग पडणार आहे. त्याचे सूतोवाच शरद पवार यांनी करून ठेवले आहे, इतकाच त्यांच्या वक्तव्याचा अर्थ घ्यावा लागेल.
महाराष्ट्राच्या सत्तांतरावरून सर्वोच्च न्यायालयातल्या प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा निकाल हाती येईपर्यंत तरी उ.बा.ठा.सेनेला आपले आस्तित्व टिकविण्यासाठी म.वि.आ. आवश्यक वाटत असली तरी आता राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या दृष्टीने खरे तर उ.बा.ठा. सेना म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ होऊन बसली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शिंदे- फडणवीस सरकारच्या बाजूने लागला तर उ.बा.ठा.सेना आणखीनच अडचणीत येणार आहे पण तसे झाले तरी उद्धव ठाकरे जागा-वाटपाच्या चर्चेला बसल्यावर काही वास्तववादी भूमिका घेतील याची खात्री देता येत नाही. त्यामुळे आतापासूनच म.वि.आ. च्या विसर्जनाच्या तयारीला लागणे व्यवहार्य ठरेल हेच पवार सूचित करत आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

IMG_20230425_112920.jpg

काही झाले तरी भाजप जनमतातून सत्तेत येत नाही. फोडाफोडी, ईडी, सीबीआय, पोलीस ह्यांचा गैरवापर करून अनैतिक मार्गानेच यावे लागेल,

खरतर हाच प्रश्न भाजपसमोरही उभा ठाकला आहे भाजपला स्वबळावर सरकार बनवायचे असल्याने भाजप शिंदे सेनेला पन्नास जागांच्यावर जागा देणार नाही तसे पाहिले तर शींदे हे भाजपच्या गळ्यातील लोढणच ठरलय याबाबत भाजपचा अंदाज चुकलाय भाजपला वाटत होते की सारे शिवसैनिक शींदेसोबत येतील पण तस काही घडल नाही उलट सहानुभूतीनची लाट ठाकरे गटाकडे वळली हे पुण्यात दिसुनच आलेत्यामुळे जागा वाटपावरून युतीतहीतेच प्रश्न निर्माण होतील .

कोणत्या पक्षाची काय खेळी असेल याचे निव्वळ तर्क बांधत बसणे हे न्हाव्याच्या दुकानात बातम्या ऐकायला जाऊन त्यावरून नेमके काय चालू आहे अशा कंड्या आपणही पिकवण्यासारखेच आहे. लेखकाची गोष्ट वेगळी. ते पवार साहेबांचे जवळचे असल्याने साहेब नेमके कधी खरे बोलतात हे ठाऊक असेल. कदाचित साहेबांच्या सांगण्यावरून अनेक जण कामाला लागतात आणि परस्पर विरोधी बातम्यांचा एकच दणका होऊन सामान्य माणसाला काही कळेनासे होते. लोक अनेक अंदाज बांधू लागतात.

अशातलाच एक अंदाज वागळे आणि अन्य युट्यूब पत्रकारांचा लसावि काढल्यावर येतो तो म्हणजे..

उद्धव ठाकरेंना मिळत असलेल्या सहानुभूतीमुळे पवार अस्वस्थ आहेत. त्यामुळे अजित पवारांचे बंड घडवून आणून पवार स्वतःकडे सहानुभूती ठेवतील. म्हणजे दोन्ही हाताची मिळून दहाही बोटे तुपात ! सत्तेत अर्धी राष्ट्रवादी, त्यामुळे कारवाई नाही पासून कामे मार्गी मागणार. कार्यकर्त्यांना इंधन मिळणार. आणि त्याच वेळी या बंडातून काका सहानुभूती आपल्याकडे वळवणार. उठांच्या सहानुभूतीची लाट ओसरणार आणि पुढच्या निवडणुकीत पुन्हा पुतण्याचे मतपरिवर्तन होऊन पश्चात्तापाने पुतण्या घरी परतणार. एव्हढे अटेण्शन घेतल्यावर जागा ७० च्या आसपास आल्या तर कुठलेही सरकार यांच्याशिवाय बनणार नाही.

उठा ला मिळणारी कथित सहानुभूति राष्ट्रवादीसाठी काळ ठरू शकते .
म्हणूनच काका पुतण्या कोलांटउड्या मारून उठा ला जेरीस आणणार .
नाहीतर मीडिया समोर वेगवेगळी वक्तव्य करून काकानी संभ्रम निर्माण केला नसता , आजच्या घडीला उठासाठी सर्वात धोकादायक कोण असेल तर काका पुतण्या .
जर भाजप /शिंदे गट सत्तेत आला नाही तर पुतण्या किंवा सुळे मॅडम मुख्यमंत्री होतील आणि उठा गट सतरंज्या गोळा करायला राहिलं .

Bjp नको हे विरोधी पक्ष पेक्षा जनतेला च जास्त वाटत आहे.
त्या मुळे bjp ह्या येणाऱ्या निवडणुकीत विजय पासून लांब च राहील.
हे मात्र नक्की.
बाकी राष्ट्रवादी ,काँग्रेस,सेना हे एकत्र राहतील ह्याची शाश्वती नाही.
पण निकाल आला की जनमत समोर त्यांना माघार घ्यावीच लागेल.
पटो किंवा न पटो bjp विरोध करावाच लागणार आहे

जर भाजप /शिंदे गट सत्तेत आला नाही >>> शिंदेंना मुख्यमंत्रीपदी ठेवून जरा उद्धव ठाकरेंचा सामना केला तर महाराष्ट्रात भाजपच्या जागा कमी होतील. मात्र ऐन निवडणुकीत ती कोणत्या मुद्द्यांवर होते, मोदींनी फेकलेल्या कार्ड्सला विरोधी पक्ष इग्नोर करून मुद्द्यांवर ठाम राहील का यावर खूप ठरेल. जर मोदींनी फेकलेल्या प्रत्येक कार्डला उत्तरे देत बसले तर २०१९ प्रमाणे हातातली निवडणूक जाईल.

याशिवाय प्रत्येक शहरात किंवा राज्यात एखादा मोठा प्रोजेक्ट संपत आलेला आहे. २०१४ च्या आधी ते संपले ( अर्धवट अवस्थेत उद्घाटने सुद्धा होतील) तर मोदी संपूर्ण निवडणूक विकास या मुद्द्यावर लढवतील. तरीही भाजपला इतक्याच जागा मिळतील असे सांगणे अवघड आहे. विरोधी पक्ष एक राहील का ? जागावाटपावरून तोडगा निघेल का ? असे कैक प्रश्न आहेत.

शिवाय विरोधकांकडे असलेले बिनीचे शिलेदार आता ८० च्या घरात आहेत किंवा निष्क्रीय झाले आहेत. नव्या नेत्यांना मोदींचे डावपेच समजून मुद्दे सेट करता येतील का ? आपल्याला अनुकूल नरेटिव्हज सेट करून त्याभोवती निवडणूक फिरवत ठेवता येते का ? मीडीया किती साथ देईल ?
असे अनेक प्रश्न आहेत.

भाजपने २०१४, १९ या दोन्ही वेळा सर्वे करून घेतले होते. त्यात त्यांना अनुकूल दान मिळाले नव्हते. त्यावर विचारविनिमय करून रणनीती आखली गेली. आता सुद्धा काय होतंय हे पाहूयात.

भाजपने २०१४, १९ या दोन्ही वेळा सर्वे करून घेतले होते. त्यात त्यांना अनुकूल दान मिळाले नव्हते. त्यावर विचारविनिमय करून रणनीती आखली गेली. आता सुद्धा काय होतंय हे पाहूयात.>>>>>>>>>
हे मात्र खरं आहे !
आर एस एस ची टीम भाजपला त्यात्या राज्यात शिखरावर पोहोचवण्यासाठी पाच वर्ष आधीच तयारीला लागते , त्या वेळी भाजप विरोधी खिसे भरण्यात गुंतलेले असतात .
नॉर्थ ईस्ट मधील राज्यात देखील हेच घडलंय,शिवाय हे स्वतः काकानी सांगीतले आहे

डावपेच ना मोदी न चे असतात ना bjp चे.
सर्व डावपेच आरएसएस च आखते .
त्यांच्या कडे आरएसएस चे बळ आहे.
काँग्रेस कडे पहिले खूप अशा समांतर संघटना होत्या,संस्था होत्या त्या आता कमजोर झाल्या आहेत.
राष्ट्रवादी कडे अशा समांतर संघटना आहेत त्या त्यांना मदत करतात.
सेना मात्र अजून ह्या बाबत खूप मागे आहे

सर्व डावपेच आरएसएस च आखते >>>>>
निरपेक्ष बुद्धीने केलेल्या कामाला डावपेच म्हणत नाही हेमंत .
काँग्रेस राष्ट्रवादी मध्ये ground लेवल ला काम न करता उमेदवारी पाहिजे असलेल्यांचा भरणा अधिक असतो , भाजपचे तसे नाही .

सरकार येतात सरकार जातात.
लोकांच्या जीवनात जास्त काही फरक पडत नाही.
त्या मुळे लोक पण जास्त तिकडे लक्ष देत नाहीत.
सर्व पक्षांची धोरण लोकांच्या हिता विषयी जास्त वेगळी नसतात.
पण.
विरोधी पक्षच संपवणे ,विरोधी विचार च संपवणे अशी धोरण कोणत्याच सत्ताधारी राजकीय पक्षाने आज पर्यंत राबवली नव्हती.
ते काम bjp करत आहे.
मीडिया वर पूर्ण नियंत्रण आणून विरोधी विचार संपवला जात आहे
Ed, CBI,सारख्या संस्था न वर दबाव आणून विरोधी पक्ष संपवला जात आहे.
आणि हे गंभीर आहे देशाच्या लोकशाही ल घातक आहे.
ह्याची जाणीव लोकांना होत आहे.
विरोधी पक्ष विस्कळीत जरी झाला तरी लोक bjp हटवण्यासाठी पूर्ण प्रयत्न मतदान करून नक्कीच करणार आहे.
काही राज्य अपवाद आहेत पण त्याने जास्त काही फरक पडणार नाही

सहमत,
"ह्याची जाणीव लोकांना होत आहे." हे वाक्य आणि त्या पुढचे वगळता.

काल राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी देखील पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार चे वक्तव्य करून बार उडवून दिला.
पाटील म्हणजे दुसरे पवार साहेब , मोजून मापून बोलणार .
त्यांच्या या वक्तव्याने उबाठा आणि काँगेसच्या पोटात गोळा आणला असणार.
त्यांच्या या वक्तव्यावर जयंत पाटलांच्या तोंडात साखर पडो अशी प्रतिक्रिया दादाने दिली.
राष्ट्रवादीला सवयच आहे अंधाधुंधी पसरवून खवा पळवण्याची , बार्गेनिंग पावर वाढवण्याची .
पण त्यामूळे उठाचे दिवसेंदिवस पतन होत राहील ......

Bjp नको बाकी कोणी ही चालेल.
अगदी वंचित चे प्रकाश आंबेडकर पण cm म्हणुन चालतील.
अशी महाराष्ट्र मधील जनतेची इच्छा आहे आणि evm ghotala नाही झाला तर निवडणुकीत दिसेल च

Bjp नको बाकी कोणी ही चालेल.
अगदी वंचित चे प्रकाश आंबेडकर पण cm म्हणुन चालतील.
अशी महाराष्ट्र मधील जनतेची इच्छा आहे आणि evm ghotala नाही झाला तर निवडणुकीत दिसेल च

तुम्हाला चालून काय फायदा ?
उठालाच मुख्यमंत्री करायची राऊत ची ईच्छा असेल तर ?
नाही म्हणजे त्यांनी सेना शिवाय काँगेस किंवा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री चालेल असे कधीही म्हटले नाही .

फु बै फु ला इतरांच वाकून पायची लै हौस. मुस्लिम कुठे बलात्कार कर्त्यात, राष्ट्रवादी सेनेत काय चाललंय, रागा काय बोलला ... ह्यांची सत्तेत बसलेली बेणी काय कर्त्यात (मुळात काहीच करत नाहीत ही बाब अलाहिदा) ह्याकडे ढुंकून बघणात नाही

भाजप एकटी सत्तेत कधीच येवू शकत नाही आत्ता पर्यंत भाजप नेत्यांच्या लक्षात आलंय म्हणून तर फडणवीस बाजूला आणि शिंदे मुख्यमंत्री आहेत .
२०२४ ला राष्ट्रवादी किंवा शिंदे गटाचाच मुख्यमंत्री होईल , गृहमंत्री पदावर भाजप समाधान मानील आणि फडणवीस ला दिल्लीत एखादे मंत्री पद मिळेल .
कोणत्याही परिस्थितीत उबाठा वडापाव विकताना च दिसेल....

देवेंद्र फडणवीस फॉर पीएम नावाचे एक पेज होते, ते दिसत नाही आता.
डोईवर फेटा , दोन बोटं उंचावलेली आणि देवेंद्रजींना पंतप्रधान करा अशी जाहीरात शोभून दिसत होती.
वरून हाग्या दम आला का ?

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवू अस एकदा देवेंद्रजी म्हणाले. असं झालं तर भाजपला महाराष्ट्रात कुणीच वाचवू शकणार नाही.
शिंदे मराठा म्हणून त्यांना प्रोजेक्ट केलं तर मराठा मतं अजिबात मिळणार नाहीत.

दिल्लीला शिंदे नको असतील तर अजित पवार आहेत. पण ते मुमं झाले तर फडणवीसांना केंद्रात अवजड खातं देतील नाहीतर भाज्यपाल म्हणून सिक्कीमला पाठवतील. अ.प. मुम झाले तर विखे, हर्षवर्धन पाटील काँग्रेसमधे परततील.

Bjp ला 80 च्या पुढे जागा मिळाल्या तर च ना राष्ट्रवादी च मुख्यमंत्री होईल bip च्या पाठिंब्याने.
तीस चाळीस च मिळाल्या तर फडणवीस ह्यांना ढोकळा विकावा लागेल

मुदत संपली की आता .
किती दिवस राहिले आहेत ह्या विधान सभेला.
आता जो पण मुख्यमंत्री असेल तो औटघटकेचे असेल

भावी मुख्यमंत्री याची चर्चा मुद्दामहून उचकवली जात आहे. ती काय हादग्याची खिरापत आहे ओळखायला? प्रथम निवडून आलेले आमदार संख्या तर कळू द्या.

ह्याचा double फायदा आहे.
राष्ट्रवादी bjp बरोबर येईल असे बोलत राहिले की शिंदे दबावात येतील.
शिंदे ची गरजच संपेल bjp ची असे वातावरण निर्माण होईल.
जागावाटप करताना शिंदे जास्त जोर लावणार नाहीत.
जे मिळेल ते कबूल करतील.असे पण शिंदे च भविष्य धोक्यात च आहे.
ठाकरे न भविष्य धोक्यात नाही.

पण पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल यात शिंदे आणि उठा टेन्शन मध्ये येण्याचे कारण काय ?
राष्ट्रवादीचे नेते हे फटाके का फोडत आहे ?
शिंदे ना गार करण्यासाठी राष्ट्रवादी गेम खेळते म्हणावं तर त्या मुद्द्यावरून दादा आणि राऊत ची चकमक उडाली होती .
सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतर सगळे धुरीण राजकारणी
थकलेले असताना महाराष्ट्रातील काका मात्र नव्या जोमाने दादा , उठा , शिंदे , f२० या सगळ्या बरोबर धोबपछाड खेळत आहे .
त्यामूळे काही कळायला मार्ग नाही .
एक मात्र नक्की संपादक झाकणझुल्याची पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ आलेली दिसते , ज्या प्रकारे राणेच्या वडिलांचा उध्दार केला त्यावरून तरी असे दिसतय .
लै वंगाळ हायत भाजपवाले , अजून एखाद्या केस मध्ये महिनाभर आत पाठवतील .....

Pages