राजकारण

ओबिसी आरक्षणाशिवाय पोटनिवडणूक?पर्याय काय ?

Submitted by ashokkabade67@g... on 13 September, 2021 - 02:02

ओबीसीआरक्षणा शिवाय पोटनिवडणुका घ्याव्यात असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत ,पण यामुळें ओबीसींवर अन्याय होणार आहे ईकडे निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची तयारीही सुरु केली यामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला हे खरे असले तरी निवडणूक घेणे सरकारला भागच आहे यावर आज ओबीसी नेत्यांची बैठकही आहे पण निवडणुका घेण्याशिवाय आता पर्याय सरकारपुढेही नाही .ओबीसी आरक्षणाला सरकार व विरोधीपक्ष या दोघांचाही पाठिंबा असतांना या बिकट परिस्थितीतही सुवर्णमध्य काढून ओबीसी समाजाला न्याय देता येणे शक्य आहे या पोटनिवडणुकीत आधी जे मतदारसंघ ओबीसींसाठी राखीव होते त्या मतदार संघात महाराष्ट्रात असलेल्या सर्व पक्षांनी एकमत करून आपल्या प

११ सप्टेंबर, तेव्हाचा आणि आजचा

Submitted by पराग१२२६३ on 10 September, 2021 - 23:11

11 सप्टेंबर 2001 ला अमेरिकेतील न्यू यॉर्क आणि वॉशिंग्टन डी. सी.मधील अनुक्रमे वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि ‘पेंटॅगॉन’वर दहशतवाद्यांनी प्रवासी विमानांद्वारे हल्ले केले. त्यामध्ये तीन हजारांच्यावर लोकांचा बळी गेला. त्या हल्ल्यांना आज 20 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या दहशतवादी हल्ल्यांना ओसामा बिन लादेनची अल-कायदा संघटना आणि तिला आश्रय देणारी अफगाणिस्तानातील तालिबानी सत्ता यांना जबाबदार धरून त्यांच्या विरोधात अमेरिकेने ‘नाटो’च्या सहकार्याने ऑक्टोबर 2001 मध्ये जागतिक ‘दहशतवादविरोधी युद्धा’ला (War on Terror) सुरुवात केली.

अण्णा हजारे, भाजप आणि आंदोलन।

Submitted by ashokkabade67@g... on 31 August, 2021 - 12:53

भ्रषटाचार विरोधी आंदोलन सुरु करुन प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अण्णाच्या आंदोलनाला पाठिंबा देत भाजपने अण्णांच्या आंदोलनाचा फायदा उचलत भाजपने सत्ता मिळवली आणि भाजप सत्तेवर आल्यावर अण्णांनी ज्या लाखो करोड रुपयांच्या भ्रष्टाचाराची दंवडी पिटली आणि भाजपने सांगितलेले काही ट्रक भरुन असलेले पुरावे अचानक कुठे गेले ते कुणालाच कळले नाही त्यामुळेच कदाचित बिचारी भाजप अनेक भ्रषटाचाऱ्यांना जेलमधे टाकण्याचे आश्वासन पुर्ण करु शकली नाही पण सत्ता मिळाली हेही नसे थोडके पण भाजप सत्तेत आल्यानंतर अण्णांचा आवाजच बंद झाला .स्वताला जनसेवक आणि मोदीजींनी शब्दकोषात नव्याने भर टाकलेल्या आंदोलनजीवी या शब्दामुळे अण्णांनी आ

विषय: 

अफगाणिस्तान - एक शोकांतिका ( भाग ०१ )

Submitted by Theurbannomad on 16 August, 2021 - 11:04

" आमचं भवितव्य अंधारात आहे आता....सगळं संपलं ! " माझा एक अफगाणी मित्र अतिशय कळवळून माझ्याकडे मन मोकळं करत होता. " खूप सोसलंय आमच्या देशाने....खेळणं केलं आमच्या देशाचं त्या खवीस रशियाने आणि अमेरिकेने....दहशतवादी आम्ही आहोत की ते? तालिबान तयार यांनी केले, आणि मग त्यांना संपवायला हे स्वतःहूनच आमच्या देशात आले...म्हणाले होते लोकशाही आणू...कसली लोकशाही आणली यांनी???" त्याच्या या प्रश्नांना उत्तर द्यायचं माझं धाडस झालं नाही. प्रश्न थेट होते, उत्तरं मलाच काय पण समस्त जगाला माहित होती पण त्यावर तोडगा मात्र कोणाकडेच नव्हता.

विषय: 

'खेळरत्न पुरस्कार' नाम बदल..योग्य की अयोग्य?

Submitted by सचिन पगारे on 12 August, 2021 - 15:10

भारता चे महान सुपुत्र दिवंगत प्रधानमंत्री राजीवजी गांधी यांच्या नावाने 'खेळरत्न' हा पुरस्कार् देण्यात येतो. सध्याच्या मोदी सरकारने राजीवजींच्या नावे देण्यात येणाऱ्या ह्या पुरस्काराचे नाव बदलून ध्यानचंद ह्या खेळाडूच्या नावाने हा पुरस्कार् देण्याचा निर्णय घेतला.

पीएम ह्यांनी लोकांची मागणी म्हणून हे नाव बदलल्याचे
सांगितले.अर्थात कोण लोक, कुठे मागणी झाली, कुठे मोर्चे निघाले याबद्दल अवाक्षरही नाही.अर्थात सत्ताधारी म्हणून त्यांनी त्यांचा अधिकार वापरला. अशीच तात्परता बेरोजगारी, लसीकरण,पेट्रोल डिझेलचे वाढते भाव, अशक्त जिडीपी। ह्याबाबत त्यांनी दाखवल्यास जनता त्यांची। ऋणी राहील.

केंद्र सरकारने मराठा आरक्षण आंदोलनाचेही राजकारणच केले।

Submitted by ashokkabade67@g... on 7 August, 2021 - 12:53

केंद्र सरकारकडे मोठ्या आशेने पहाणाऱ्या मराठा आरक्षणाचे शेवटी केंद्र सरकारने राजकारणच केले .राज्याला आरक्षणाचे अधिकार देतांनाच आरक्षणाचा चेंडू राज्याकडेच परतवला पण अधिकार देतांनाच पन्नास टक्क्यांची मर्यादा मात्र कायम ठेवत आरक्षण लटकवून ठेवले व जाती जातीत भांडण लावत स्वताचा स्वार्थ साधण्याचे राजकारण केले महाराष्ट्रात भाजप नेते कितीही भलावण करत असले तरही केंद्र सरकारला आरक्षण द्यायचे नाही हे मात्र स्पष्ट झाले नरसिंहराव सरकिरच्या काळात तामिळनाडू राज्याला आरक्षणाबाबत पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलाडण्याची परवानगी देत काँग्रेस सरकारने आरक्षण मर्यादा वाढवून दीली तेच मोदी सरकारला करता आले नाही वा करा

विषय: 

'तबर'चा राजनय

Submitted by पराग१२२६३ on 31 July, 2021 - 02:33

भारत आणि रशिया यांच्यातील घनिष्ट संरक्षण संबंधांचे एक प्रतीक असलेली ‘भा. नौ. पो. तबर’ (आयएनएस तबर) ही युद्धनौका नुकतीच रशियन नौदल दिनाच्या सोहळ्यात सहभागी झाली होती. त्या सोहळ्याच्या निमित्ताने रशियाच्या सदिच्छा भेटीवर असलेल्या ‘तबर’ने 22-26 जुलैदरम्यान सेंट पीटर्सबर्गमध्ये मुक्काम केला होता. त्यानंतर 28-29 जुलैला ‘तबर’ने दोन्ही देशांच्या नौदलांदरम्यान होणाऱ्या ‘इंद्र’ युद्धसरावातही भाग घेतला.

हाँग काँग आणि चीन

Submitted by पराग१२२६३ on 9 July, 2021 - 08:49

हाँग काँगला मुख्य चीनशी पूर्णपणे एकरुप करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून 24 जून 2020 पासून ॲपल या लोकशाहीवादी दैनिकाचे प्रकाशन बंद करण्यात आले आहे. त्याआधी चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीने जून-2020 मध्ये हाँग काँगसाठीचा ‘राष्ट्रीय सुरक्षा कायदा’ एकमताने मंजूर केला होता. त्यानंतर लगेचच त्या कायद्यानुसार हाँग काँगमधील लोकशाहीवादी आंदोलन चिरडून टाकण्यास सुरुवात झाली. लोकशाहीवादी आंदोलकांच्या म्होरक्यांची धरपकड सुरू करून त्यांच्यावर खटले दाखल करण्यास सुरुवात झाली. या कायद्याने हाँग काँगवरील आपली पकड मजबूत करण्याचा चीनचा मार्ग मोकळा झाला आहे.

नादिया मुराद - द लास्ट गर्ल

Submitted by स्वेन on 2 July, 2021 - 05:06

अडॉल्फ हिटलरचं मेईन काम्फ, एपीजे अब्दुल कलाम यांचं विंग्ज ऑफ फायर, नेल्सन मंडेला यांचं लाँग वॉक टू फ्रिडम, राकेश मारिया यांचं लेट मी से इट नाऊ, बराक ओबामा यांचं अ प्रॉमिस्ड लॅंड, देव आनंद यांचं रोमान्सींग विथ लाईफ ही अशी आत्मकथनाची पुस्तकं हातात पडल्यावर आपण वाचायला सुरुवात करतो आणि मग ते पुस्तक वाचून संपवल्याशिवाय खाली ठेववत नाहीं.

Pages

Subscribe to RSS - राजकारण