साहेबांचा अध्यक्ष पदाचा राजिनामा!

Submitted by यक्ष on 2 May, 2023 - 08:07

साहेबांचा अध्यक्षपदाचा राजिनामा....!
तशी अनपेक्षित अन वादळी बातमी. नव्या पर्वाला सुरुवात?
भाकरी फिरवून झाली की फिरवणे सुरु झाली?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शक्यता अशा आहेत
१) नवाब मलिक
२)जितेंद्र आव्हाड
३) मेहबूब शेख
४) फौजिया खान
५) हसन मुश्रीफ
६ ) सुप्रिया सुळे
७) जयंत पाटील

महत्त्वाची टीप :- वरील सर्वांऐवजी अजित पवार अध्यक्ष झाले तर राष्ट्रवादी टिकेल , अन्यथा अजित पवार भाजप मध्ये आणि राष्ट्रवादीची शकले निश्चित ....

अजित पवार भाजपमध्ये / सोबत जाऊन एकनाथ शिंदेंना घरी पाठवून मुख्यमंत्री होणार असतील. म्हणून राजीनामा.
अजित पवारांनी पुन्हा जोडीने पहाटे शपथ घ्यावी. यावेळी त्यांनी आधी आणि मग फडणवीसांनी. मी पुन्हा येईन.

धाय मोकलून रडणार्‍या व्यक्तीपूजक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गळे काढून राजीनामा मागे घ्या म्हणून टाहो फोडायचा आणि देवाने पक्षप्रेमाचा पाझर फुटल्याचे दाखवत तो मागे घ्यायचा...निवडणुकांची तयारी म्हणून शक्तीप्रदर्शनाचा आणि मतदारांना ईमोशनल अपील करण्याचा किंवा आगामी काळात राजकीय चर्चांचा केंद्रबिंदू आपल्याकडेच ठेवण्याचा हा नवा डावपेच असू शकतो.

मी राजीनामा देत आहे तुम्ही नवा नेता निवडा एवढी लोकशाही आणि एवढा ऊदारमतवादी नेता राष्ट्रवादीमध्ये तरी नक्कीच नाही.

दोन्ही प्रमुख दावेदार सारख्याच उत्साहात दिसतायत.
एकाला शब्द देऊन ऐनवेळेला दुसऱ्याच्या हात वर करणार का? की काही win-win तोडगा आधीच निघालाय?
Anyone reading between the lines?

आता अदाणी विषय काढून फायदा नाही असं सर्व नेत्यांना पटलंय. सगळा ढिगारा ढासळतोय. तर तिकडे अदाणीबाबा एकेक कर्ज कमी करत चालला आहे.

अजित पवारदादा चांगले संबंध ठेवणारे आहेत. राजकारणात सौम्यवादी आहेत. म्हणजे भावी होऊ शकतात. शिवाय फार अडचणीत येणारे नाहीत. परंतू पुढचा मुख्यमंत्री मीच हे सांगून कॉन्ग्रेसला भडकावले आहे आणि कुटुंबात काही बिनसले आहे हे सूचित केलं. इकडे काकासाहेबांनी "काल वज्रमूठ सभा होती म्हणून त्यात पद सोडण्याची वाच्यता केली नाही" हे सांगून मविआला अडचणीत टाकलेच जाता जाता.

एकूण काय तर थोड्याच दिवसांत "कॉन्ग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार" हा निर्णय जाहीर होईल. पायीयात्राप्रभाव अजमावणार.

फुरोगामी, भरत,भ्रमर तुम्ही या बाफ वरून रजा घ्यावी हेच ऊत्तम.. जिथे तिथे तेच तेच प्रतिसाद लिहून कंटाळून जात नाही का तुम्ही लोक ? या धाग्यावर फक्त शरद पवार अन राकाँ मध्ये आता काय घडामोडी होतील हे वाचायच आहे फक्त. तुमचे नेहमीचे टोमणे.. सुपरहिट कॅरॅक्टर जरा प्लीज बाजुला ठेवा

आतली बातमी काय आहे? अचानक राजिनामा का?
सुळे आणि अजित पवारांना पण धक्का बसला अशी बातमी वाचली.

कदाचित वयोमान आणी साथ न देणारी प्रकृती यामुळे निवृत्तीचा निर्णय घेतला असावा. तसेच स्वतः ह्यात व कार्यरत असतानाच पक्षाला निदान पुढच्या पाच वर्षांचा अजेंडा देऊन नवा अध्यक्ष स्थिरस्थावर करावा असाही विचार असेल..

वाचू नका हो प्रतिसाद.
तुम्हांला घडामोडींची माहिती इथे मिळणार हे वाचून अंमळ करमणूक झाली.

"आपल्या प्रतिस्पर्ध्यांना आपल्या डावपेचांचा थांगपत्ता लागू न देणं, ही हातोटी राजकारणात असावी लागते. माझ्याकडे ती आहे आणि तिचा वापर मी खुबीनं करत आलो आहे." - "लोक माझे सांगाती" मधे स्वतः काका Happy

काल म्हणे याच पुस्तकाची पुढची आवृत्ती प्रकाशित झाली आणि त्यात अगदी गेल्या वर्षातील घडामोडी सुद्धा आहेत. नुकतीच मी त्या आधीची आवृत्ती विकत घेतली! काका वाचकांनाही डावपेचांचा थांगपत्ता लागू देत नाहीत Happy

>>कदाचित वयोमान आणी साथ न देणारी प्रकृती यामुळे निवृत्तीचा निर्णय घेतला असावा. तसेच स्वतः ह्यात व कार्यरत असतानाच पक्षाला निदान पुढच्या पाच वर्षांचा अजेंडा देऊन नवा अध्यक्ष स्थिरस्थावर करावा असाही विचार असेल..<< +१
व्यासपिठावर प्रतिभाताईंची उपस्थिती या मुद्द्याला बळ देते. पवारसाहेब आता ८०च्या आसपास असतील, सक्रिय राजकारणाकरता आवश्यक असलेली दगदग आयुमाना प्रमाणे त्यांना झेपणार नाहि, या दृष्टिकोनातुन घेतलेला तो निर्णय आहे.

बाकि रोजच्या अयशस्वी कलाकारांनी सुरु केलेली सट्टेबाजी नेहेमी प्रमाणेच करमणुकिचं साधन झलेलं आहे...

त्यात अगदी गेल्या वर्षातील घडामोडी सुद्धा आहेत. >>> हो उठाना "शालजोडी"गिफ्ट केलिये.
नुकतीच मी त्या आधीची आवृत्ती विकत घेतली! काका वाचकांनाही डावपेचांचा थांगपत्ता लागू देत नाहीत >>> हा हा !!
पवाराच्या वयापेक्षा त्याच आजारपण हेच कारण असाव, सिमिलर वयात बायडेन अमेरिकेचे राश्ट्रध्यक्ष आहेत याना तर फक्त स्टेटपुरता पक्ष साभाळायचा आहे /होता.
बाकी त्याच्या घोषणेची पत्रकार परिषद बरच काही सान्गुन जात होती.दादा ज्या प्रकारे दमदाटी करुन सगळ्याना गप्प बसवत होते त्यावरुन त्याच्या मनात फक्त 'काकानी नेहमीसारखी परत पलटी मारु नये 'म्हणजे झाल हे असणार.सगळे बिचारे भावुक आणि दादा एकाला म्हणतायत " कर उपोषण थोडा बारिक होशिल".सुसु ताइना तर दमच दिला "तु बोलु नकोस".
हसमुखराय जयत पाटील्,मानस पुत्र आव्हाड हयाना खरोखरच दाटून येत होत हे जाणवत होत.

ठीकच आहे ना मग. पवारांच्या वय आणि आजारपण लक्षात घेता हे होणारच होते. तसंही पवारांनंतर राष्ट्रवादीची शकलं हि होणारच होती ...
किती दिवस एकाच बांबूवर तंबू टिकून राहणार

भाजप सोडून सगळ्या पक्षांची शकले झाली आहेत , होत आहेत .
परिवाराला प्रथम प्राधान्य दिले की दुफळी माजणारच , त्याला राष्ट्रवादी अपवाद कशी असेल ?
उठा ऐवजी इतरांना प्राधान्य दिले गेले असते तर १६ आमदारांइतकी सेना आटली असती का ?
कदाचित स्वबळावर येण्या इतपत मजबूत झाली असती .
जे गणित सोनिया , बाळासाहेब , डी एम के , YSR ला सुटले नाही ते पवार काकांना सुटेल ?

बोलेल त्याच्या अगदी उलट करण्याचा शिरिस्ता पवार साहेब टिकवतील का दोन तीन दिवस उत्सुकतेचा राहणार .
पण तिथे भरपूर गमंत चालली होती .
डोळ्यात नद्यांचा पुर आणणाऱ्या कार्यकर्त्यांना साहेब हात करून हा तू बोल , तू बोल असे करत होते तर दादा डोळे वटारून ए गप्प बस असे सुनावत होते .
सरळ प्रकृती अस्वस्था कारण सांगून राजीनामा द्यायचा , दोन दिवस खेळ कशाला लांबवला ?
मला तरी वाटतयं साहेबांनी ताकत आजमावून दादाचे बंड फुस्स केले आहे .

उद्धव ठाकरेंना मिळणारी सहानुभूती आणि कोर्टाचा निकाल आल्यास मुदतपूर्व निवडणुकांची शक्यता या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी सेंटर स्टेजला आली आहे.

डावपेचांचा थांगपत्ता लागू न देणं, ही हातोटी राजकारणात असावी

हाहाहा. इतके काय इतर लोक आणि पत्रकार बावळट आहेत की त्यांनाही पाऊले पडती कुठली वाट समजू नये?
एकेक खेळी आणि बोल आठवा. लगेच यांचा मतितार्थ काही पेपरात मांडला जातो. (काही पत्रकारांना फुकट घरे कशी मिळाली मुंबईत?)

लवासावर ठप्प बंदी आणल्यावर एका सभेत "कशाला परकीय म्हणून सोनियाजीना वेगळे काढता?" या अगोदर पंप्र परकी नागरीक नको म्हणून पत्र पाठवले त्यावरून कॉन्ग्रेसमधून काढले गेले तेव्हा राष्ट्रवादी (खरोखरच) पक्ष काढला.
आता अदाणीसह केलेली गुंतवणूक धोक्यात येतेय म्हटल्यावर भेटीगाठी केल्या आणि पक्षातून अंग काढायचे ठरवले. अजित पवारांची गुंतवणूक नाहीये. आता फुटलेले /फुटणारे नेते कॉन्ग्रेसमध्ये जातील आणि कॉन्ग्रेसचा स्वबळावर निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा होईल. उद्धवराव पडतील बाजूला. त्यांचाही सपोर्ट गेल्याच जमा.

तर हे सर्व माझे तर्क नसून पेपरात उघडच झालंय.
तरीही "डावपेचांचा थांगपत्ता लागू न देणं मलाच ठाऊक!!?"
'लोक माझे सांगाती' हे कथन उत्तम साहित्यिक कृती ठरून पुरस्कार मिळेलच.

शिंदे नी केलेला प्रयोग करून दादा राष्ट्रवादी बळकावण्याचा शक्यता होती , म्हणून काका ने डाव रचला होता का ? हा एक कांगोरा असू शकतो.
पण काहीही म्हणा ते दोघेही काँग्रेस आणि उठा सेनेला चार फूट खाली गाडल्या शिवाय राहणार नाहीत .
२०२४ च्या विधानसभा निवडणुकी नंतर राष्ट्रवादी एक तर भाजप बरोबर सत्तेत असेल किंवा मोठ्ठा विरोधी पक्ष होऊन भाजप बरोबर नुरा कुस्त्या खेळेल या शिवाय तिसरा पर्याय दिसत नाही.
दुसऱ्या पुस्तकात उठा चे वाभाडे काढले आहे म्हणतात !
पवार साहेब नसतील तर सुळे , राऊत आणि उठा शून्य आहेत .

या सगळ्या प्रकरणात सगळ्यात धमाल meme म्हणजे कोणीतरी त्या धाय मोकलून रडणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेते कार्यकर्ते यांच्या फोटोखाली 'माजी गो चांदी' असं लिहिलं होतं Proud
पुलंनी लिहिलेलं खरोखर सगळीकडे फिट होतं. असो चांदी जशी उठून तरातरा निघून गेली तसे साहेबही उद्या राजीनामा वापस घेऊन तुरुतुरु पुन्हा कामाला लागतील याच सदिच्छा!

पुलंनी लिहिलेलं खरोखर सगळीकडे फिट होतं. असो चांदी जशी उठून तरातरा निघून गेली तसे साहेबही उद्या राजीनामा वापस घेऊन तुरुतुरु पुन्हा कामाला लागतील याच सदिच्छा!
Happy

इथे असणारे सर्व आयडी किंवा सर्व व्यक्ती है सामान्य लोक आहेत कोण पक्षाचे आयटी सेल चे नोकर आहेत काही सामान्य लोक आहेत.
राजकीय नेते मग कोणत्या ही पक्षाचे असू.
राजकारणात आहेत ते फक्त व्यवसाय म्हणून.
देशाचे हित .
हे काय असते.
देश बुडला तरी चालेल अगदी नष्ट झाला तरी चालेल राजकीय लोकांना त्याचे काही देणेघेणे नसते.
पाकिस्तान मध्येच बघा सर्व पाळले देश बुडवून.
भारतात पण तीच अवस्था आहे.
पण चहा पेक्षा किटली गरम ह्या नुसार वडा पाव ,आणि चपटी वर राजकीय नेत्यांच्या मागे लागलेले च .
बेरोजगार लोक राजकीय पक्षांचे गुणगान गात असतात.
हे सर्व करण्या पेक्षा .
राहता त्या इमारतीत एकी निर्माण करा,राहता त्या गावात एकी निर्माण करा.
मजबूत जनतेच्या संघटना असतील तर तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षांना दबवू शकता.
कोणत्या ही संकटाला तींड देवू शकता आणि तुम्हाला कोणीच दबावात आणू शकत नाही.
राजकीय पक्षांच्या नादाला लागू नका.
देशभक्ती चे कीर्तन सांगणारे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते कधी देश विकून निघून अगदी पाकिस्तान मध्ये पण जातील .
तुम्ही फक्त पाकिस्तान ल शिव्या देण्यात च स्वतःचे आयुष्य बरबाद करून घ्याल

साहेबांनंतर राजीनामे देवून निष्ठा दाखविण्याची शर्यत चालू झाली आहे .
त्यात कोणीतरी जयंत पाटलांनी पण राजीनामा दिल्याचे सांगून टाकले . मग काय जयंत पाटलांनी घाई गडबडी ने जाहीर केले की मी राजीनामा दिलेला नाही ....

पुरोगामी तुम्ही का इतके एक्साईट झाले आहात.
ना तुम्हाला कोण नगरसेवक पण बनवणार नाही.
ना bjp sarkar मध्ये तुमच्या मताला काही किंमत आहे.
ना रोज च्या आयुष्यात तुम्हाला राजकीय लोक मदत करणार आहेत.

पुरोगामी तुम्ही का इतके एक्साईट झाले आहात.
ना तुम्हाला कोण नगरसेवक पण बनवणार नाही.
ना bjp sarkar मध्ये तुमच्या मताला काही किंमत आहे. Lol

Pages