महाराष्ट्रातील भविष्यातील निवडणूक अंदाज

Submitted by सचिन पगारे on 9 March, 2023 - 10:52

महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या तीन वर्षात राजकारण प्रेमींना धक्क्यावर, धक्के बसण्याचा कालावधी होता.. शिवसेनेने सोडलेली बीजेपीची साथ, म वि आ ची निर्मिती, शिंदेच् बंड, गुवाहाटी, गुजरात, गोवा ह्या राज्यात घेतलेला आश्रय, ठरेंचा राजीनामा, म वि आ चे सरकार पडणे, शिंदे फडणवीस सरकार येणे, फडणवीसांना उपमुख्यमंत्री करणे, निवडणूक आयोगा कडून शिंदे कडे शिवसेना देणे. बऱ्याच घडामोडी अजून घडणार आहेत. ह्या घटनाचं इतक्या अनाकलनीय होत्या की एकही राजकीय ज्योतिषी तोंड उघडायला तयार नाही . आपली झाकली मुठ सव्वा लाखाची बरी. आता ह्या ज्या घडामोडी घडल्यात ह्याचा विचार करता मी पुढे काय होईल ह्याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतो. अर्थात हा अंदाज आहे भाकीत नाही . करण अंदाज खरा किंवा खोटा ठरवू शकतो भाकीत मात्र मिथ्या असते.
ह्या घडामोडी मुळे भविष्यात महाराष्ट्रातील राजकारण तर बदलेलच पण केंद्रीय राजकारणालाही दणके बसतील.
सध्या जी स्तिथी आहे ती जैसे थे राहिल्यास ह्याचे सर्वाधिक नुकसान हे भाजपला होऊ शकते. विधानसभेत पक्षीय बलाबल साधारणता असे राहील.
1) राष्ट्रवादी काँग्रेस..75 ते 80 सीट
2) भाजप- 60/80
जर म वि आ सोबत वंचित आघाडी असल्यास भाजप 60 जागांवर रोखला जाईल. नसल्यास 80 जागा मिळू शकतात.
3) काँग्रेस-42 ते 45 सीट
4) शिवसेना (ठाकरे) - 40 ते 42 सीट
5) शिवसेना(शिंदे)-2 ते 4 सीट
असे पक्षीय बलाबल राहील..
लोकसभा निवडणूक
म वि आ ..40 ते 42 सीट
भाजप - 6 ते 8 सीट
महाराष्ट्रात मुख्यमंत्री राष्ट्रवादि चा राहील.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

एकंदरीत कल पाहता प्रत्येक मतदारसंघात ज्या उमेदवारास जास्त मते मिळतील ते निवडून येऊ शकतात,
ज्यांचे जास्त उमेदवार निवडून येतील त्यांना सरकार स्थापनेचा दावा करता येईल असे वाटते.

विधानसभेत तुम्ही म्हणता तसं होऊ शकतं. भाजपचे कोअर मतदार फडणवीस वर प्रचंड नाराज आहेत. त्यात २०२४ पर्यंत जर करमुसे प्रकरणात न्याय झाला नाही तर गृहमंत्री म्हणून ते फेल्युअर असेल. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीला नक्कीच स्कोप आहे. अजितदादा सीएम होऊ शकतात.
लोकसभेला मात्र जसं दिल्लीत झालं तसं होऊ शकतं. लोक लोकसभा आणि विधानसभेला वेगवेगळ्या प्रकारे मतदान करू शकतात. मोदींना पर्याय नाही आणि त्यांची लोकप्रियता अबाधित आहे हा एक मुद्दा. आणि रागा चं नेतृत्व पवारांपासून प्रकाश आंबेडकर ते पृथ्वीराज चव्हाण हे सगळे इगो बाजूला ठेवून मनापासून स्वीकारणार का हा प्रश्न आहे.

आचार्य Lol

काँग्रेसला ४०-४२ जागा विधासभेतही जास्त वाटतात. सगळी लढत एका बाजूला भाजप-शिंदे गट व दुसर्‍या बाजूला मविआ यांचे जे काही गट बांधले जातील त्यातच होईल. जो कमी बिनडोकपणा करेल तो सत्तेवर येइल. एकूण पुढचे वर्ष दीड वर्ष महाराष्ट्रात अपमानांचे पेव फुटणार हे नक्की. सगळा महाराष्ट्र २००-३०० वर्षांपूर्वी कोण काय होते/नव्हते, कोण काय म्हणाले यात गुंतवला जाईल. नवे संस्थानिक व छत्रपती निर्माण होतील. काही लोक धार्मिक पुंगळ्या सोडून मते मागतील, तर काही जातीय.

हा महाराष्ट्र एकेकाळी पुरोगामी होता.

फारएण्ड Lol

जोपर्यंत भाजपला नाही पण मुख्यमंत्र्याला न मागता पाठिंबा देणारे पक्ष आहेत, पहाटेच शपथविधीस एका इशार्‍यावर निघणारे नेते आहेत, पाच पाच वर्षे कधी सत्ताधारी बोलवतात म्हणून वाट पाहणारे विरोधी पक्षनेते आहेत तोपर्यंत भाजपला काळजी नाही.

रागाने आपण पंतप्रधान।पदाचे उमेदवार आहोत हे कधी जाहीर केलं?

Submitted by भ्रमर on 9 March, 2023 - 22:

अरेच्चा! आता इतकी ती भारत जोडो यात्रा काढून जर रागा उमेदवार नसेल तर ते म्हणजे प्री वेडिंग फोटो शूटवर लाखो रुपये खर्च करून लग्नच न करण्यासारखं होईल. Lol
जोपर्यंत दुसरा उमेदवार जाहीर होत नाही तोपर्यंत रागा हेच गृहीत धरलं जाणार.
बाकी मनमोहनांचे वारसदार डॉ रघुराम राजन highly qualified आहेत. ते असतील तर मोदींची मतंही फिरवू शकतील. पण तमिळ ब्राम्हण असल्यामुळे त्यांना संधी मिळणार नाही.

उमेदवारी निवडून येण्याच्या शक्यता पगारेनी अचूक वर्तवल्या आहेत असे सध्या तरी दिसतंय .
जात पात न मानणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात ब्राह्मण फडणवीस मुख्यमंत्री पदावर पूर्वी बसले होते हाच मोठ्ठा धक्का आहे .

पण आता पुन्हा फडणवीस निवडून सुद्धा येणार नाहीत हा पगारेंचा आत्मविश्वास अगदी योग्य वाटतो , कारण पुरोगामी महाराष्ट्रातील बहुसंख्याक लोकं फडणवीस वर नाराज आहेत ,पण जातपात हे कारण नक्कीच नाही !
त्यामुळे म वी आ चे आमदार भरपूर संख्येने निवडून येतील , कारण महाराष्ट्र पुरोगामी आहे .
राहिला म वी आ च्या मुख्यमंत्री पदाचा प्रश्न !
मला तरी त्या पदासाठी फक्त संजय राऊत च योग्य वाटतात .
संयमी भाषा हा त्यांचा महत्त्वाचा गुण !
त्याच प्रमाणे क्रिमिनल रिपोर्टर ते सामना संपादक ते राज्यसभा खासदार हा प्रवास त्यांनी ज्या झपाट्याने केली आहे ते पाहता त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र देखील झपाट्याने
नक्कीच प्रगती करेल .

पुढील हज्जार वर्षे भाजपा महाराष्ट्रावर राज्य करेल. पगारे सर, तुम्ही जनतेला जाणलंं नाहीये.

नाही हो!
उठा मुख्यमंत्री पदावर होते , आता. उर्वरित सेनेतील वजनानुसार रौतांचा हक्क आहे !
त्यासाठी महाराष्ट्रातील राजकारणातील मुलीची मुहूर्तमेढ पुढे ढकलायला सर्वात जास्त सीरियस पुरोगामी असलेले काका एका पायावर तयार आहेत .
एक वेळ कुंपणवरील दादाची समजूत काढतील पण मुख्यमंत्री फक्त राऊत च होणार !
ते दादाच्या मुलाला लोकसभा निवडणुकीत मुळशी मतदार संघात काकाने पाडले वैगेरे भाजप ने पसरलेल्या अफवा आहेत हो , दादाचा जात पत न मानणाऱ्या म्हणजेच ब्राह्मण कधीच टार्गेट न करणाऱ्या पुरोगामी काकावर पूर्ण विश्वास आहे .
आणि दादाची कारकीर्द काकाच घडविणार याची दादाला देखील खात्री आहे , म्हणून सुळेंच्या महाराष्ट्रातील राजकारणासाठी दादाचा पूर्ण पाठिंबा आहे .
ते दादा वीस पंचवीस आमदार घेवून भाजप कडे प्रयाण करील या सुध्दा भाजप ने पसरवलेल्या वावड्या आहेत .
मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होईल पण कदाचित त्यावेळी दादा भाजप बरोबर असेल ही पण कोणीतरी अफवा पसरवली वाटत......

फुटाफुटी झाली आहे आणि महाराष्ट्रात अमराठी लोक आणि मतदार खूप आहेत. ते कुणाला मतं देतात यावरच पुढचं चित्र उमटेल. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे बरेच मतदार संघ पक्के आहेत त्यात बदल होण्याची शक्यता कमी. अमराठी मतदारांना कोण व्यक्तिगत भुलवत होते का पक्षाला मत देत होते हे लवकरच कळेल.
निवडून येतील ते आमदार,खासदार. बाकीचे संपादक.
रागांना पंप्र करायचे स्वप्न हे खरे होणार नाही अशी चिन्हे आहेत. प्रतिस्पर्धी फार आहेत. बंगालच्या मौसमी आहेत. (एवढेच काय कोण पंप्र झाल्यास कोण राष्ट्रपती होणार याचीही रांग लागली आहे.)
चालून चालून दमलेल्या खासदाराची गोष्ट असे गाणे सुद्धा येईल.

अदनान सामीचे 'लिफ्ट करा दे' गाणं गुप्तपणे वाजत आहे घराघरांतून.

<< आचार्य Lol
काँग्रेसला ४०-४२ जागा विधासभेतही जास्त वाटतात. सगळी लढत एका बाजूला भाजप-शिंदे गट व दुसर्‍या बाजूला मविआ यांचे जे काही गट बांधले जातील त्यातच होईल. जो कमी बिनडोकपणा करेल तो सत्तेवर येइल. एकूण पुढचे वर्ष दीड वर्ष महाराष्ट्रात अपमानांचे पेव फुटणार हे नक्की. सगळा महाराष्ट्र २००-३०० वर्षांपूर्वी कोण काय होते/नव्हते, कोण काय म्हणाले यात गुंतवला जाईल. नवे संस्थानिक व छत्रपती निर्माण होतील. काही लोक धार्मिक पुंगळ्या सोडून मते मागतील, तर काही जातीय.
हा महाराष्ट्र एकेकाळी पुरोगामी होता.
Submitted by फारएण्ड on 9 March, 2023 - 10:55 >>

------- पुढचे वर्ष दीड वर्षे महाराष्ट्रात अपमानांचे पेव फुटणार असा उल्लेख वाचला. पण आता तर कोशारी गेला आहे मग असे जाणतेपणी महाराष्ट्राच्या आदर्शांचा (फुले, आंबेडकर, शिवाजी महाराज) अपमान कोण करणार?

फुले दांपत्य यांच्या बद्दल कोशारीचे वक्तव्य. वयाच्या १३ व्या वर्षी लग्नाबद्दल टिपणी केलेली आहे.
https://youtu.be/bY4fgU-jekk

कोशारीचे शिवाजी महाराजांबद्दल केलेले वक्तव्य.
https://youtu.be/PTkqYCazrgs

शिवाजी महाराज हे आता जुने आदर्श झाले आहेत असे अजून एक बिनडोक विधान.
छिंदम याने शिवाजी महाराजां बद्दल केलेले वक्तव्य.
या सर्वांअमधे एक सुसुत्रता आहे.

अर्थात महाराष्ट्रातल्या जनतेने या सर्वांकडे दुर्लक्ष करायचे. मागचा पुढचा संदर्भ बघायचा.

महाराष्ट्र पुरोगामी होता कारण येथे फुले, आंबेडकर, शिवाजी महाराज, आगरकर, कर्वे... यांचे विचार रुजले, पसरले. हे पुरोगामित्व टिकविणे आजच्या पिढीच्या हातात आहे. अर्थात गोमुत्र, गोबर (विचार) आणि पुरोगामित्व एका ठिकाणी नांदू शकत नाही.

थोडे विषयांतर होत आहे पण महाराष्ट्राबाहेर उ प्र, प बंगाल, आणि दिल्ली मधे काय परिस्थिती आहे?

तिकडे गौतमचा "दास " म्हटल्यावर अंगाची लाही लाही झाली. मग सर्व यंत्रणा कामाला लागते, आसाम पोलिस हे दिल्ली मधे धडकतात. विमानात बसलेल्या ( अपमानास्पद वक्तव्य करणार्‍या ) प्रवाशाला अटक होते. कित्ती मोट्ठा अपमान.
https://www.timesnownews.com/india/congress-leader-pawan-khera-arrested-...

पवन खेरा यांना अटक करतांना लावण्यात आलेली कलमे ( तपासून बघता येतात )
IPC 153 B imputations, assertions prejudicial to national interest
500 punishment for defamation
504 intentional insult with intent to provoke breach of peace)

पण आता तर कोशारी गेला आहे मग असे जाणतेपणी महाराष्ट्राच्या आदर्शांचा (फुले, आंबेडकर, शिवाजी महाराज) अपमान कोण करणार? >>> त्याकरता प्रत्यक्षात अपमान करावा लागत नाही. कसलेही विधान अपमान म्हणून अ‍ॅम्प्लिफाय करता येते. रोजचे पेपर्स वाचले तरी सहज सापडतील.

आता इतकी ती भारत जोडो यात्रा काढून जर रागा उमेदवार नसेल### अडवाणीने रथयात्रा काढली पण बोहल्यावर चढले वाजपेयी

कोमात गेलेल्या माणसाला बाजूने रथयात्रा गेली काय किंवा प्रेतयात्रा गेली काय सगळ सारखच.

यात्रा काढा. एकी करा. निवडणुका लढा. होणार काय? GPL खाऊन जखमा चाटत बसणार. शेवटी बीजेपीच जिंकणार यात काय संशय.
“Insanity is doing the same thing over and over and expecting different results.”

अंदाज बांधणं हा करमणुकीचा खेळ आहे. घोडामैदान लांब नाही. खेळच खेळायचा असल्यास हजेरी लावतो.

शक्यता १ - २०२४ ला मार्च एप्रिल मधे लोकसभेच्या निवड्णुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका सहा महिन्यांनी आहेत. जर केंद्र सरकारकडे प्रचारासाठी पुरेसे मुद्दे असतील, ट्रंप कार्ड असेल तर विधानसभेच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुकांसोबत व्हाव्यात असा त्यांचा प्रयत्न असेल. तसे झाल्यास देशात जे वातावरण बनवतील त्याच मुद्द्यांवर राज्यातल्या निवडणुका होतील. याचा फायदा कदाचित भाजपला होईल.

शक्यता २ - विधानसभेच्या जागा २८८ आहेत. जर निकाल दोलायमान राहिला आणि राष्ट्रवादी + शिवसेना (उबाठा) + काँग्रेस + वंचित + इतर पक्ष यांच्या आघाडीला काठावरचे बहुमत मिळाले तर सरकार स्थापन होईल. पण ते सरकार अस्थिर असेल. या सरकारमधे कुरबुरी झाल्या तर कोणत्याही क्षणी अजित पवार, काँग्रेसमधल्या काही आमदारांचा गट जो आताही शिंदेगटाचे आमदार माघारी वळले तर पाठिंबा द्यायच्या तयारीत आहे, इतर पक्षांचे किरकोळ आमदार हे केव्हांही भाजप आघाडीला पाठिंबा देऊ शकतात.

शक्यता ३ - महाआघाडीला इतक्या जागा मिळतील कि सरकार बनवण्यासाठी आमदारांची खरेदी करणे ही अव्यवहार्य गोष्ट होईल.

शक्यता ४ - भाजप आघाडीला निर्विवाद बहुमत मिळेल. ही शक्यता अवघड वाटत असली तरी असे होणारच नाही याची खात्री देता येत नाही.

शक्यता ५ - निवडणुकीनंतर, आधी महाविकास आघाडी फुटून ते स्वतंत्र लढतील किंवा भाजपच्या आघाडीत जातील.

निवडणुकी अगोदर जागावाटप हे प्रकरण मोठे वादळ निर्माण करेल.
मग ते शिंदे bjp चे जागा वाटप असेल किंवा.
राष्ट्रवादी,काँग्रेस , सेना ठाकरे गट ह्यांच्या मध्ये असेल.
ह्या टप्प्यावर युती,आघडी फुटू शकतात.
वेगळे लढून नंतर एकत्र येण्याची पण एक शक्यता गृहीत
धरावी लागेल

निवडणूक वगैरे असू द्या पण सध्याची वर्तमानपत्रे बघता राज्यातले सगळे नेते फक्त वाचाळपणा करण्यात मग्न आहेत असे वाटते. महाराष्ट्रात एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा दुसरी कुठलीच समस्या नाही असे वाटते आहे Lol

ते चर्चेत राहण्यासाठी.
एक मेकावर आरोप करण्या व्यतिरिक्त कोणताच मुद्धा आता सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाकडे नाही..
निवडणूक जाहीर झाली की विधायक टीका टिप्पणी केल्या जातील.

जेवण अगोदर टाईमपास साठी शेव आणि शेजवान चटणी देतात ना तसे आहे हे.

### अडवाणीने रथयात्रा काढली पण बोहल्यावर चढले वाजपेयी
नवीन Submitted by भ्रमर on 10 Marc

रथयात्रा १९९० मध्ये काढली होती. अटलजींना नॉमिनेशन १९९६ मध्ये भेटलं. त्यामुळे दोन गोष्टींचा संबंध नाही. राहुलजी मात्र २०२४ च्या जस्ट आधी यात्रा काढत आहेत.
अर्थात अटलजींना भाजपने पीएमपदाचा उमेदवार म्हणून "अबकी बारी अटलबिहारी" असं अधिकृत नॉमिनेशन दिलं होतं. तसं काँग्रेसवाले रागा सोडून दुसऱ्या कोणाला देत नाहीत तोवर राहुलजी हेच नाव समोर आहे.
पण भ्रमर तुमचा रागाच्या उमेदवारीला आक्षेप काय आहे? तुम्हाला आवडत नाही का? इथले इतर काँग्रेसी तर पार अगदी 'ते कसे गं ते कसे देव्हाऱ्यातील देव जसे' झोनमध्ये असतात Lol
बरं राहुलजी सोडून विरोधकांकडून दुसरा कोण उमेदवार तुम्हाला सुचतोय?

राहुलजी सोडून विरोधकांकडून दुसरा कोण उमेदवार>>
राखी सावंत! किंवा दाढी नसलेला कोणताही चेहरा. पंतप्रधानाच रोज प्रवचन तर ऐकायचे आहे . मग जरा चांगला चेहरा असला तर बरच आहेकी. भासन क्काय पैसा टाकला कि कोणीही लिहून देईल. नाहीतर आपला चॅॅटGPT आहेच की.
गॅॅस सिलिंडरचा दर, दर तीन महिन्यांनी पन्नास रुपयांनी जंप मारतोय. म्हणतोय मी युक्रेन मधून स्वस्तात आलो आहे. म्हणतोय "ये तुला तुडवतो." त्याच्याशी कशी कुस्ती खेळायची त्याबद्दल चर्चा करा.

Pm पदाचा चेहरा बघून लोक मत देतात असे काही तरी मिथ्य पसरवले जात आहे.
म्हणजे आमच्या कडे मोदी आहेत तसे तुमच्या कडे कोण असा प्रश्न विचारता येतो.
पण bjp निवडून आली तरी मोदी च पंतप्रधान होतीलच ह्याची काय शास्वती.
बाकी पण पक्षात इच्छा बाळगून असणार च

मोदी नाही तर दुसरा कोणता चेहरा bjp कडे पंतप्रधान पदासाठी आहे.
तर योगी .
अशी पण कुजबुज असते

प्रमुख पक्ष पीएम पदाचे उमेदवार म्हणून काही मायबोलीकरांना उचलणार आहेत अशी चर्चा आहे.

अडवाणीने रथयात्रा काढली पण बोहल्यावर चढले वाजपेयी >>>>>>>>
मग राहुल कोणाला बोहल्यावर चढवणार आहे ?
वर whitehat यांनी लीहाल्याप्रमाने विरोधी पक्ष राहुल ला पंतप्रधान पदाचा उमेदवार मानत नसताना भारत तोडो यात्रा काढून प्री वेडिंग शूट चा खर्च का करतोय तो ?

भाजपने ७५+ असणार्‍यांना तिकीट न देण्याचं धोरण आखलं आहे. तसेच पीएम पदाचे वय यावर या पक्षाने जनसंघाच्या काळापासूना भूमिका घेतली आहे. त्याप्रमाणे भाजपा ७५ पेक्षा जास्त वय असणार्‍या नेत्याला पीएम या पदावर राहू देणार नाही असे धोरण त्यांनी मध्यंतरी जाहीर केले होते. त्याचाच भाग म्हणून ७५+ उमेदवारांना तिकीटच नाकारले गेले होते.

https://economictimes.indiatimes.com/news/elections/lok-sabha/india/part...

शिंदे गट हा निवडणुकी नंतर अस्तित्वात नसेल असा एक अंदाज आहे.
४० पैकी ४ पण निवडून येण्याची शक्यता कमी आहे.
स्वतः शिंदे ची जागाच धोक्यात येईल.

Pages