Indian Air Force

भारतीय आकाशात अवतरला अजस्त्र पक्षी

Submitted by पराग१२२६३ on 22 February, 2023 - 13:28

अलीकडेच बेंगळुरूजवळच्या यलहंका हवाईतळावर पार पडलेल्या Aero India 2023 हवाई प्रदर्शनात अमेरिकेच्या बी-1बी या व्यूहात्मक बाँबफेकी (Strategic Bomber) विमानांनी अचानक लावलेली हजेरी आणि त्याचबरोबर अमेरिकेच्या एफ-35 लाटनिंग-2 या पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांनी त्यात घेतलेला सहभाग या विशेष लक्षवेधक घटना ठरल्या. याच प्रदर्शनात रशियाच्या United Aircraft Corporation नं असं जाहीर केलं की, या कंपनीनं आपल्या नव्या Tu-160M या व्यूहात्मक बाँबफेकी विमानाचे नामांतर तेरेश्कोव्हा/Tereshkova (रशियन नाव – Tерешкова, रशियन उच्चार – तिरिष्कोवा) असं केलं आहे.

सुखोईवर ब्रह्मोस

Submitted by पराग१२२६३ on 22 April, 2022 - 11:08

भारतीय हवाईदलाच्या सुखोई-30 एमकेआय विमानावरून ब्रह्मोस या क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरात 19 एप्रिल 2022 ला यशस्वी चाचणी घेतली गेली. भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे विकसित केलेले ब्रह्मोस हे जगातील एकमेव स्वनातीत (सुपरसॉनिक) आणि लक्ष्यावर अचूक मारा करणारे क्रूझ क्षेपणास्त्र आहे.

ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारतीय भूदलात आणि नौदलात आधीच सामील करण्यात आलेले आहे. भारतीय नौदलातील युद्धनौकांवर ते तैनात करण्यात आलेले असून सध्या या क्षेपणास्त्राच्या पाणबुडी आवृत्तीचाही विकास केला जात आहे. त्याचबरोबर लढाऊ विमानांवरून डागता येऊ शकणाऱ्या आवृत्तीचा विकास आता पूर्ण होत आला आहे.

Subscribe to RSS - Indian Air Force