पाककला

घराची किंमत

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

'घरापासून दूर राहिल्यावर घराची किंमत कळते', म्हणतात.

आता, म्हणताना जरी 'घराची किंमत' असं म्हणायची पद्धत असली, तरी इथे 'घर' म्हणजे काय, तर आई-बाबा, भाऊ-बहिणी, काही आवडीचे मित्र-मैत्रिणी वगैरे सगळं आलंच. ते तर महत्त्वाचेच, पण घर म्हटलं की तितकंच महत्त्वाचं म्हणजे रोज न चुकता तिनतिनदा मिळणारा आयता पौष्टीक आहार. इष्टसमयी प्रगट होणारे चहापोहे निराळे, आणि ही कामं 'न सांगता' करून देणार्‍या 'आई' या व्यक्तीकडून आपली आवडनिवड जपली जाणं हे सगळं म्हणजेच ते 'घराची किंमत' असावं बहुधा.

प्रकार: 
शब्दखुणा: 

अंडे व्हेज की नॉन-व्हेज.........?

Submitted by उदयन. on 28 January, 2012 - 02:27

अंडे व्हेज की नॉन-व्हेज.........?

हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे........

काही शाकाहारींच्या मते अंडे नॉन-व्हेज आहे......कारण त्यासाठी आपल्याला अंड फोडावे लागते त्यामुळे येणार्या जिवाची हत्या होते.... एकाला मारुन खाणे हे चुकीचे असल्याने अंड नॉन-व्हेज आहे........

परंतु काही अशे ही लोक आहेत जे अंडे व्हेज मानतात....त्यांच्या मते अंडे हे व्हेज आहे........जीव जन्माला यायच्या आधीच अंडे फोडल्याने काहीही चुकीचे नाही आहे...........जसे पाण्यातले जिव पिताना जिव जंतु पोटात जातात तसेच ही प्रक्रिया आहे..........

आपणास काय वाटते............????????

विषय: 

अ‍ॅपल पाय - एक प्रयत्न

Submitted by अव्यक्त on 9 January, 2012 - 22:42

या वेळेस नविन वर्षाच्या स्वागतासाठी अ‍ॅपल पाय करुन पहावे असे ठरवले. त्याला कारण म्हणजे अ‍ॅल्टन ब्राउनची टिव्ही/इंटरनेट वरची रेसिपी व ऑफिसमधे त्यावर झालेली चर्चा आणि त्याबद्दल सहकार्‍यांनी दिलेले प्रोत्साहन.

अ‍ॅल्टन ब्राउनची रेसिपी ईथे मिळेल. तिच पाककृती वापरली असल्यामुळे नेह्मीच्या विभागात न देता प्रत्यक्ष पाय बनविताना आलेले अनुभव, केलेले बदल लिहावेत असे वाटले व त्याबरोबर काही प्रकाशचित्रे टाकली आहेत.

Apple Pie M - 1.jpg

विषय: 
शब्दखुणा: 

श्रीमती वीणा कुलकर्णी : फळप्रक्रिया (कॅनिंग) व्यवसाय (माझा छंद, माझा व्यवसाय)

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 14 December, 2011 - 04:12

कॅनिंग किंवा फळप्रक्रिया म्हटले की प्रथम नजरेसमोर येतात ते हवाबंद डबे. एखादा अन्नपदार्थ विशिष्ट प्रक्रिया करून हवाबंद डब्यात सील करून जास्तीत जास्त टिकविण्याच्या पद्धतीला कॅनिंग असे म्हटले जाते. फळांवर वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्यांपासून सॉस, सरबते, पावडरी इत्यादी टिकाऊ प्रकारांत त्यांचे रुपांतर करण्याचा व्यवसाय हा जसा घाऊक प्रमाणात चालतो तसाच तो घरगुती स्वरुपातही करता येतो.

खोट्टे (फोटोसह)

Submitted by नंदिनी on 13 December, 2011 - 05:55

माझे आजोबा जेव्हा महाराष्ट्रामधे (बारामती साखर कारखाना!!!) आले तेव्हा आजूबाजूच्या बायका इडली म्हणजे उकडलेल्या भाताचा गोळा असं म्हणायच्या म्हणे. नंतर मुंबई-पुण्याकडे उडप्याचं हॉटेल म्हटलं की इडली-दोसा हे समीकरण फिक्स झाले. हळूहळू मात्र आठवड्याच्या नाश्त्यामधे एकदा तरी इडली-सांबार्-चटणी असा बेत बनायला लागला. मराठी धिरडी-घावणाच्या सोबत हे दोन पदार्थ आणून बसवण्यात या हॉटेलवाल्यांचा मोठा हात आहे. मात्र ही इडली आणी दोसा इथेच या भागातील खाद्यपरंपरा संपत नाही. मंगळूरमधे कोकणी, केरळी, कानडी तसेच ख्रिश्चन अशा विविध खाद्यपद्धतींचा संगम झालेला आहे. फक्त इथे हॉटेल्स चांगली नाहीत.

विषय: 

स्वयंपाकघरातल्या युक्त्या

Submitted by आरती on 26 November, 2011 - 12:18

युक्ती सुचवा / सांगा या बाफचा हेतु, आत्ता मला कहितरी युक्ती सांगा किंवा आत्ता मला मदत हवी आहे असा आहे असे समजुन मी हा नविन धागा सुरु करते आहे. पुर्वी असा एक धागा मायबोलीवर होता (असे मला आठवते).

अशा पण काही टिपा (अनेकवचन Happy ) असतात ज्या 'हँडी' सापडल्या पाहिजेत. अगदी छोटीशीच टिप असते पण काम खुप सोप्पे होते त्यामुळे.
उदा. (काजुकतली चा बाफ) काजुची पुड करण्या आधी ते थोडावेळ फ्रिजमधे ठेवावेत.

विषय: 

आप्पे / येलापे

Submitted by प्रिति १ on 7 November, 2011 - 07:03

आप्पे / येलापे ;-

लागणारा वेळ ; ४० मिनिटे.

लागणारे जिन्नस ;- १ वाटी उडीद डाळ, १ वाटी तांदुळ, १/२ वाटी पातळ पोहे, थोडी कोथींबीर, १ चमचा हरभरा
डाळ, थोडे नारळाचे काप., १ ईंच आले, १ मिरची.थोडे मीठ.

चटणीसाठी ;- १/२ नारळ, १ चमचा पंढरपुरी डाळ, ४-५ हिरव्या मिरच्या, १ बुटुक चिंच, मीठ, चवीला थोडी साखर.

कॄती ;- आदले दिवशी सकाळी उडीद डाळ आणि तांदुळ भिजत घालावेत. रात्री ते बारीक वाटुन घ्यावेत.
वाटताना त्यातच १/२ वाटी पोहे मिक्स करावेत. मग सकाळी त्यात थोडी कोथींबीर घालावी. व १ ईंच आल्याचा
तुकडा आणि १ मिरची वाटुन घालावी. व मीठ घालावे.

विषय: 

मावा कपकेक

Submitted by ज्ञाती on 11 October, 2011 - 22:17

साहित्य

खवा १०० ग्रॅम
साखर १ कप
मैदा १ +१/४ कप
अन्सॉल्टेड बटर १ स्टिक
बेकिंग पावडर अर्धा टेबलस्पून (साधारण दीड ग्रॅम)
वेलची पूड पाव टीस्पून
मीठ चिमूटभर
अंडी २

कृती
१. मैदा, बेकिंग पावडर, वेलची पूड, मीठ एकत्र करुन दोनतीनदा चाळून घ्या.
२. बटर पूर्णपणे वितळवून घ्या. बटर, साखर आणि खवा हॅडमिक्सरने एकत्र फेटून घ्या.
३. बटर, साखरेच्या मिश्रणात एकेक अंडी फोडून घाला. प्रत्येक अंडे घातल्यानंतर चांगले फेटून घ्या.
४. आता हळूहळू मैद्याचे मिश्रण अ‍ॅड करत फेटत जा.

विषय: 

ओरिसा: दालमा

Submitted by सावली on 23 August, 2011 - 21:50

हि एक अक्षरशः नेहेमी केली जाणारी ओरिसा मधली पाककृती. मला तर वाटतं किमान दिवसाआड तरी करतच असावेत. त्या त्या मोसमात उपलब्ध असलेल्या भरपुर भाज्या आणि डाळ यांचा वापर असलेली हि पाककृती साध्या शब्दात सांगायची तर "भाज्या घातलेले वरण" अशीच आहे. पण तरिही तीला एक खास चव आहे.

लागणारा वेळ:
साधारण ३० मिनीटे ( भाज्या चिरण्याच्या वेगावर अवलंबुन आहे)

लागणारे जिन्नस:

लागणारे जिन्नस मोसमाप्रमाणे बदलता येतात साधारण पणे टोमॅटो सोडुन सगळ्याच फळभाज्या वापरता येतील. सगळ्या भाज्या अगदी मोठ्ठ्या मोठ्ठ्या फोडी करुन घ्याव्यात छोट्या फोडीचा लगदा होतो.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - पाककला