आहाराविषयी मदत हवी आहे

Submitted by प्रिती विराज on 21 August, 2013 - 12:27

नमस्कार माबोकारानो,
माझ्या सासूबाई आजारी असतात. त्यांना आमवात आहे आणि सतत पाठीवर पडल्यामुळे मणक्याचे हाड तुटले आहे त्यात आणि dieteticsसुद्धा आहे.
dr. ने तिखट तेलकट तुपकट गोड पूर्ण बंद करायला लावले आहे पण त्यांना पूर्वीपासून चटपटीत खाण्याची सवय असल्यामुळे आत्ताच जेवण किंवा नष्ट खायला मागत नाहीत Angry
मला असे काही पदार्थ सुचवा कि ते कमीत कमी तेलात तिखटआत आर होतील आणि त्या खातील कृपया मदत करा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मावेमधे काही भाज्या तेल,तूप न वापरता, कमी तिखटाच्या, सलाडसारख्या करता येतात, मावे नसेल तर किंचित पाणी घालून पातेलीतपण करता येईल मी कोबी, फ्लॉवर, कांदा, भेंडी, मटार इ. एकत्र मावेमध्ये करते चाट मसाला, मिरपूड, किंचित ओवा, मीठ,जिरे,तिखट,(ह्यातले तिखट वगळता येईल). ह्यात तुम्ही ज्या भाज्या सासूबाईंना चालतील अशा आहेत त्या घ्या.

वेगवेगळी पीठे एकत्र करून कोबी,दुधी,मेथी यांच्या वड्यापण करता येतील ढोकळा करतो तश्या, थालीपीठ कमी तेल लावून करता येईल(भाजणी किंवा मिश्र पिठांचे), ज्या भाज्या किंवा जे पदार्थ खायचे असतील त्यांचे असे वेरिएशन करता येईल. ओटस चालत असेलतर थोडे ओटसपण टाकता येईल. कमी तेलाचा उपमा, पोहेपण चांगले लागतात.

डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच खालील पदार्थ द्या :

~ दुधी, काकडी, फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची, कांदा पात इत्यादी भाज्या करताना त्यांना ज्वारीचे / भाजणीचे पीठ लावून केल्या तर खमंग होतात.

~ मूगाच्या डाळीची सरसरीत खिचडी : मूग डाळीचे प्रमाण जास्त : हव्या त्यानुसार भाज्या घालता येतात : रुची वाढवायला त्यात थोडेसे आले किसून घालता येते. फोडणीत खडा मसाला (वेलची, दालचिनी, तमालपत्र, लवंग, मिरे) घालून परतल्यास स्वाद वाढतो. हवे असल्यास वाढताना वरून लिंबाचा रस पिळता येतो.

~ पिवळ्या मुगाची उसळ. ही मुळातच रुचकर लागते. आमसूल घालून स्वाद वाढतो.

~ काकडी, गाजर, मुळा, कोबी इत्यादींच्या किसून कोशिंबीरी, किंवा नुसते किसून त्यात चवीपुरते सैंधव - मिरेपूड - लिंबाचा रस.

~ रव्याचा तिखटमिठाचा सांजा / उपमा - ह्यात भाज्या घालू शकता.

~ नाचणीची ताकातली सरसरीत लापशी.

~ ताकातल्या पालेभाज्या, साधं वरण, कढी यांबरोबर पोळी कुस्करून.

~ ज्वारीच्या पिठाची उकड

~ भाजणीचे थालीपीठ

~ साळीच्या / ज्वारीच्या फोडणीच्या लाह्या - किंवा लाह्या आमटीत घालून किंवा नुसत्याच किंचित तुपावर भाजून त्यांना तिखट-मीठ लावून वर लिंबाचा रस पिळून - कोथिंबीर घालून

~ राजगीर्‍याच्या लाह्या ताक-मीठ-कोथिंबीर-मिरची घालून.

~ नाचणी/ ज्वारी - बाजरी मिक्स भाकरी व परतलेली / ताकातली / डाळ घालून केलेली पालेभाजी.

~ शोरबा (मूग डाळ + दुधी व इतर ऐच्छिक भाज्यांचे रुचकर, दाटसर सूप)

~ तोंडाला चव / रुची हवी असेल तर आमसुलाचे सार, किसलेले आले - लिंबाचा रस - शेंदेलोण - पादेलोण यांचे पाचक, ताजे ताक असेही देऊ शकता.

तिखटाच्या जागी चालत असेल ( अर्थात डॉक्टरांना विचारून ) तर पुदीना, लसूण, फेसलेली मोहरी, लाल कांदे, मुळा यांचा वापर करून बघा.
तेल / तूप पूर्ण बंद करायला सागितले आहे का ? पदार्थ अजिबात तेल / तूप न वापरता करून, जेवढे चालेल तेवढे तेल / तूप आयत्यावेळी पदार्थावर घालून द्या.

मुंबईत असाल तर अनेक दुकानांत ( माटुंगा स्टेशनसमोर आणि किंग्ज सर्कल जवळ ) असे खास पदार्थ मिळतात.
अधून मधून खायला ते चांगले असतात. हवं तर आधी डॉक्टरांना दाखवून घ्या.

धन्यवाद अन्जू ,अरुंधती कुलकर्णी , दिनेश. दा
किंग्ज सर्कल जवळ नक्की कोठे आहे सांगाल का ?