रोज मुलांच्या डब्यात काय द्यावे हा आईंना पडणारा रोजचाच प्रश्न. त्यात फक्त काय करायचं हा प्रश्न नसतो तर ते मुलांना आवडायला हि हवं. कधीतरी मुलांनी पूर्ण फस्त करून रिकामा डब्बा परत आणला कि कोण आनंद होतो आयांना ते त्याचं त्याच जाणो…
तर मैत्रिणींनो असाच सोप्पा, चटकन होणारा आणि मुलांना आवडणारा असा चॉकलेट डोसा एकदा करून मुलांना देऊन बघा आणि आणखी एक पदार्थ यादीत सामील झाल्याचा आनंद उपभोगा.
पदार्थ :
मैदा ५ चमचे
साखर २ ते ४ चमचे (आवडीप्रमाणे गोडाचे प्रमाण घेणे)
कोको पावडर २ चमचे
दुध एक कप
बटर २-३ चमचे
बटर आणि दुध सोडून सगळे पदार्थ एकत्र मिक्स करावे (हवे असेल तर चवीला चिमुटभर मीठ घालता येईल) त्यात थोडे थोडे दुध घालून डोस्याच्या पीठा एवढे कंसीस्टन्सी चे मिश्रण भिजवावे
आणि नोंस्टिक तव्यावर बटर पसरून पीठ ओतून डोसे बनवावे.
या डोस्यांवर चॉकलेट सॉस घालून किंवा नुसतेच गरम गरम खायला ध्यावे ….
>भिजवलेल्या पिठात थोडे वितळलेले लोणी घालता येईल पण तसे केल्यास काही वेळाने पाती थोड कडक येते.
>लगेच खायचे असेल तर ठीक आहे पण डब्यात द्यायचे असेल किंवा काही वेळाने खायचे असेल तर डोसे फार भाजू नये जरा नरमच ठेवावे अन्यथा कडक येतात.
तर असे चॉकलेटी डोसा करून मुलांना खायला द्या आणि नंतर त्यांची प्रतिक्रिया इथे नक्की कळवा.
पॅनकेक म्हणू शकतो.
पॅनकेक म्हणू शकतो.
मस्तच होतात. आवडली डीश.
मस्तच होतात. आवडली डीश.
अरे वा .. सोप्पिये
अरे वा .. सोप्पिये
He tar ek prakarache pancake!
He tar ek prakarache pancake! dose mhanatlyamule Dal tandul asalele dosech
Dolyasamor aale!
मुलांनाच का, मला पण आवडतील.
मुलांनाच का, मला पण आवडतील.
me dosa nahi khallelaa, paN
me dosa nahi khallelaa, paN chocolate sAnDawich khalley. chaangle laagate. basically i love chocolate. but that sandwich was little too much.
वाचून एकदम तोंपासु असणार असंच
वाचून एकदम तोंपासु असणार असंच वाटतंय
मला मनापासून पडलेला एक प्रश्न (यात धागाकर्तीवर कुठलीही टीका करायचा उद्देश नाही) -
असा मैदा, लोणी/बटर, वारंवार खाणं - विशेषतः मुलांच्या दृष्टीने - कितपत योग्य आहे? दूध सोडलं तर या अशा पाककृतींमधे नक्की किती पोषणमूल्यं असतात?
त्याऐवजी कणकेच्या/ज्वारीच्या गोड धिरड्यांमधे चॉकोलेट फ्लेवर मिसळला तर कसा लागेल? मुळात चॉकलेट फ्लेवर ज्यात त्यात मिसळून आपण मुलांना त्याची जास्तच सवय लावतो असं तर होत नाही ना?
(चॉकलेट आवडत असलं तरीही मला मुळात चॉकलेट, टोमॅटो केचप अशा सगळ्या पदार्थांना एकसुरी चव आणणार्या फ्लेवर्सविषयीच प्रॉब्लेम आहे, ते एक असूद्यात.)
पॅनकेक पेक्ष्याही क्रेप्स
पॅनकेक पेक्ष्याही क्रेप्स म्हणता येतील. क्रेप्स करुन त्यात न्युटेला पसरवुन वर स्ट्रॉबेरीचे काप खुप छान लागतात.
१ कप मैदा/ गव्हाचे पीठ
१ अंड
चिमुट्भर मीठ
ह्याच पाणीटाकुन पातळ बॅटर करुन बटर वर क्रेप्स करायचे
अॅग्री विथ वरदा.
अॅग्री विथ वरदा.
Varada +1. Tu mhanatey te
Varada +1. Tu mhanatey te lihun khDala hota. ekhadevelee change mhaNun asa padarth dyayala harakat nahee. paN mulana khaNe detana poshaNmulyancha vichar vhava!
Crepes>>>>+1
चॉकोलेट डोसा "ईडली" नावाच्या
चॉकोलेट डोसा "ईडली" नावाच्या एका रेस्टॉरंटमध्ये खाण्याचा योग आला. डोशाच्या पीठात चॉकोलेट सीरप घालून केलेला. मुलीला आवडला.
वरती प्राप्तीने दिली आहे ती पॅनकेकची कृती वाटती आहे.
फोटो?
फोटो?
वरदा नेहेमीच मैदा वगैरे नको
वरदा नेहेमीच मैदा वगैरे नको खायला द्यायला हे खरय तरी कधीतरी वेगळ काहीतरी खायला द्यायचं अस वाटतं तेव्हा मात्र खूप प्रश्न पडतात. नेहेमीच्या मेनू साठीचा नाहीये हा पण त्या 'कधीतरी' च्या मेनू साठी ट्राय करता येतो
pancake साठी अंडी वापरतात.
pancake साठी अंडी वापरतात. त्यामुळे नुसत्या नावानेही Vegetarian लोक बघणार नाही असा विचार करून हे वेगळे नाव आणि मी जिथून पहिल्यांदा ऐकले त्यांनीही मला डोसा असेच नाव सांगितले होते