भुर्जी सॅन्ड्वीच

Submitted by विवन on 7 July, 2013 - 13:52

तसे हे दोन्ही पदार्थ कॉमन आहेत आणि आमच्या घरच्यांच्या आवडतेही पण म्हंटलं ह्यावेळी हे एकत्र करुन बघुयात. एक करुन बघितलं ते हिट झालं म्हणून उरलेल्या भुर्जीचेही तसेच केले. नक्कीच जमले असावेत कारण बायकोने उत्साहाने फोटो काढले, इथे पोस्ट करुया का असं विचारताच टाईप करण्याचीही जबाबदारी उचलली म्हणून हे इथे आलं.

साहित्य

भुर्जीसाठी

६ अंडी
३ कांदे बारिक चिरुन
३ हिरव्या मिरच्या (बारिक कट करुन)
फोडणी साठी तेल, मोहरी, हळद, तिखट, कढीपत्ता
गरम मसाला १ चमचा
कोथिंबीर
मीठ

सॅन्डवीच साठी

स्लाईस ब्रेड
अमुल बटर/तुप

कृती

भुर्जी करण्यासाठी पॅन मधे तेल घालून ते गरम झालं की फोडणी करुन घ्यावी.

त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. कांदा गुलाबीसर झाला की त्यावर कोथिंबीर आणि गरम मसाला घालावा, थोड परतून मग त्यात अंडी फोडुन घालावीत

चवी नुसार मीठ घालाव

हे सर्व चांगलं परतत रहायचं, सतत ढवळत्/परतत/चालवत राहिल्याने भुर्जी मधे गुठळ्या होत नाहीत.

मिश्रण कोरडं झालं की भुर्जी तयार झाली.

सॅन्डवीच करताना ब्रेड च्या स्लाईस वर भुर्जी पसरवून त्यावर दुसरा स्लाईस ठेवून तुप्/बटरचा हात फिरवलेल्या टोस्टर मधे हे सॅन्डवीच ठेवून टोस्ट करा. पिझ्झा कटरने कट करा आणि टोमॅटॉ सॉस किंवा हिरव्या चटणी सोबत खा. सोबत मॅन्गो माझा असेल तर अजून मजा येईल.

६ अंडयांच्या भुर्जी मधे १०-१२ सॅन्डवीचेस होतात. तसा नेहमीचाच मेन्यु आहे तेच कॉम्बीनेशन आहे भुर्जी पाव पण हे असं केलं तर लहान मुलही व्हरायटी म्हणून आवडीने खातात.

तर मग पुढच्या वेळी भुर्जी पावचा बेत आखाल तेव्हा हे भुर्जी सॅन्डवीच नक्की करुन बघा आणि सांगा कसं वाटलं ते.

1.JPG (भुर्जी)

2.JPG3.JPG5.JPG7.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षे अफाट होती चव सानिकाने भुर्जी पाव नक्को मलाचा सुर लावलेला करण्यापुर्वी पण ह्या अवतारातला भुर्जीपाव और चाहीये म्हणत .गट्टम झाले असच ऑमलेट सॅ. पोळीरोल तिला आवडेल अशी व्हेरीएशन्स पण तो छान करतोकरतो

लले येस्स त्यानेच केलय

विश्वेश, फोटो सेव्ह करुन ठेवण्याची परवानगी देणार का? आणि परवानगी नाकारल्यास वविला असे सँडविच बनवुन आणावे लागतील Proud

मस्त आहे

विश्वेश, फोटो सेव्ह करुन ठेवण्याची परवानगी देणार का? >>> बिल्कुल देउ नका.. सगळ्या धाग्यांवर वैभ्या नुसते फोटोच वाटत असतो Biggrin

आई नसताना घरात नॉनवेज खायचा मूड आला तर हा आमचा(बाबा व मी) फेव पदार्थ.
हे खावून वर मँगोला पिवून झोपायचे. Happy
चक्क बर्‍याच वर्षात केली नाहीये... करायला पाहिजे.

धन्यवाद इतक्या साध्या आणि नेहमीच्याच पाककृतीलाही मनापासून दाद दिल्या बद्दल Happy

वैभव, तुझं फोटोंनी पोट भरत असेल तर जरुर सेव्ह करुन ठेव

जो एस वरच्या रेसिपीत अंड्याच्या ऐवजी पनीर कुस्करुन/ किसुन/ चुरा करुन घालायचं (मी तरी असच करते)

अंड्याच्या ऐवजी पनीर कुस्करुन/ किसुन/ चुरा करुन घालायचं >>> मग सोपं आहे करायला हरकत नाही.