मायबोलीच्या पाककृती ग्रूपचे अँड्रॉईड अ‍ॅप प्रकाशीत झाले

Submitted by Admin-team on 3 December, 2020 - 23:13
maayaboli recipes app

मायबोलीच्या पाककृती ग्रूपचे अँड्रॉईड अ‍ॅप आजच प्रकाशीत झाले.

हे अ‍ॅप फक्त पाककृती विभागापुरते मर्यादित आहे. पण त्याचे फायदे
१. पाककृती बघण्यासाठी लॉगीन करण्याची गरज नाही.
२. पाककृतींशी संबंधित लिंक टिचकेसरशी एकत्र आहेत.
३. जेवायला रोज काय करायचे हे सुचवण्यासाठी सोपी सुविधा आहे. सध्या तिथे, याच ग्रूपमधलेच एक पान आहे. पण ही सुविधा अजून उपयोगी करण्याचे काम सुरु आहे.

मायबोली वर प्रत्यक्ष लिहिणार्‍यांपेक्षा , वाचनमात्र रहाणार्‍यांची संख्या दहापट आहे. अशा वाचकांना हि सुविधा उपयोगी पडेल अशी अपेक्षा आहे.
या विभागात पाककृती लिहिणार्‍यां लेखकांच्या पाककृती आणखी जास्त वाचकांपर्यंत पोहोचतील.


मायबोलीचे अँड्रोईड अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करता येईल.

तुमच्या सूचनांचे स्वागत आहे आणि अ‍ॅप मधे सुधारणा सुरूच राहतील.

तुम्हाला काही सूचना / अडचणी असतील तर इथेच कळवा म्हणजे वेळोवेळी योग्य ते बदल करता येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऍप इन्स्टॉल केले. छान वाटतंय.
बाकी प्रतिक्रिया, सूचना असेल तर लिहेन नंतर.

"लेखन काढले आहे" अशा शीर्षक असलेल्या पाकृही दिसत आहेत. तसेच शीर्षक आहे पण लेखन काढुन टाकलेल्या पाकृसुद्धा. यासाठी काही फिल्टर वापरून त्या ऍपवर दिसणार नाहीत असे काही करता आले तर बघा.

छान सुरुवात
मायबोलीवरील पाकृ खजिना जास्तीत जास्त वापरात येईल

@मानव पृथ्वीकर ,
तुमच्या सूचनेबद्दल धन्यवाद. हा बदल करायला सुरुवात केली आहे.
@ओजस
हो. नवीन पोस्ट केलेली पाककृती पण ॲप मध्ये दिसेल

वा मस्त, अभिनंदन.

आय ओ एस अ‍ॅप बनवण्याचीही योजना असल्यास आनंद होईल.

खूपच छान सोय. मस्त सुविधा आहे. रुचकर स्वादिष्ट मराठी खाद्यपदार्थ शोधायला आणि बनवायला फारच उपयुक्त. मनःपूर्वक आभार.

केले डाऊनलोड!

छान आहे!!
ह्यात केवळ रिसिपीज असू देत. बाकी आहार आणि पाकशास्त्र ह्या गटातील गप्पांची पाने नको.

धन्यवाद सगळ्यांना. अ‍ॅप उपयोगी वाटत असेल तर गुगल प्ले स्टोअर मधे तुमचा अभिप्राय आणि योग्य ते तारांकन द्या म्हणजे इतरांनाही त्याचा उपयोग होईल.
@विजय दिनकर पाटील, योकु IOS अ‍ॅपवर काम सुरु आहे.

ऍप मस्त आहे.वर्गीकरण पटकन मिळते.
ऍप वर एक रेसिपी उघडून मूळ लेखाची लिंक कॉपी पेस्ट आणि शेअर अशी काही सोय करता येईल का?
ज्यांच्याकडे अजून ऍप नाही त्यांना एक दोन रेसिपी लिंक शेअर करून ऍप कडे आकर्षित करायचे आहे.

मस्तच.
सगळा पाकृ खजिना एकत्र आला.

या app ची लिंक

Download केलं.
____________________

+++++++
१) वर्गवारी आवडली.
२) होमपेज पहिले पान जाण्यासाठी आणि शोध घेताना मागेपुढे जाण्यासाठी वेगळे बाण /दर्शक app च्या आतच दिले आहेत. फोनच्या ब्राउजरचा back /forward arrow वापरावा लागत नाही.
३) पाकृ शेअर करा ही लिंक मायबोली साइटच्या लेखाची आहे ती पाठवता येते. ( बाहेरच्या सभासदास app पाहावे लागणार नाही.)

---------–---
अन्नं वै प्राण: हे पाककृतीत गणले जाणार नाहीत पण खाद्यसंस्कृतीतले गाजलेले लेख कुठल्या विभागात दिले आहेत?

---------------------------
App भारी झाले आहे.

Pages