पाककला
अवघी विठाई माझी (४) - स्नो पीज / शुगर स्नॅप्स

सध्या भारतात बाजारात हिरवे वाटाणे (पूणेकरांसाठी मटार ) यायला लागले असतील.
हिरव्या वाटाण्याची उसळ म्हणजे आपली खासियत. झालेच तर पॅटीस, करंज्या, वड्या,
गुपचूप बटाटे.. नूसत्या यादीनेच तोंडाला पाणी सुटते.
आपल्याकडे बाजारात दोन प्रकारचे वाटाणे दिसतात. एक पुणेरी आणि दुसरे दिल्लीचे.
दिल्लीचे जरा जास्तच गोड लागतात. सोलता सोलता कोवळे दाणे तोंडात टाकायचा
मोह होतोच. या जातीच्या साली पण मांसल असतात आणि त्याची भाजी पण करतात.
पण ही भाजी करताना, त्याचा चामट पातळ पापुद्रा काढणे, अत्यंत जिकिरीचे होऊन
चिप्स, डिप्स, अॅपेटायझर्स
लहानसहान पार्ट्या, गेटटुगेदरसाठी बरेचदा अॅपेटायझर्स ची सोय करावी लागते. तेच ते सालसा, ग्वाकमोले खाउन करुन पण कंटाळा येतो. तुम्ही वेगवेगळे काही डिप्स अॅपेटायझर्स करत असाल तर त्याच्या रेसिपी योग्य जागी टाकुन इथे लिंक्स द्या फक्त.
अवघी विठाई माझी (३) - वेलवांगे - Chayote

या वरच्या फ़ोटोतल्या भाजीबद्दल जरा गंमतच आहे.
हि भाजी, मुंबईत अनेक भाजीवाल्यांकडे असते. पण मराठी लोक ती घेताना वा खाताना दिसत नाहीत.
तशा, टिंडे, (ढेमसे), लसोडे( भोकरे) परवर याही भाज्या मुंबईत विकायला असतात, पण त्यादेखील
मराठी लोकांत फ़ारशा खाल्या जात नाहीत.
आमच्या शेजारच्या दाक्षिणात्य मामींनी ही भाजी आणलेली मी बघितली होती. त्यांनी अर्थातच तिचे
सांबार केले. नाव विचारले, तर त्यांनी चक्क वांगे म्हणून सांगितले. सांबारातच घातल्याने, भाजीची
वेगळी अशी काही चव लागली नव्हती.
घरच्या घरी बनवलेले ready to eat
कधी कंटाळा येतो तेव्हा आयतं खायला, कधी आपल्याला पिकनीकला जायचं असतं तेव्हा, कधी बाहेरगावी जाणार तिथे कुठे करत बसणार म्हणुन, जेवण नीट न येणार्या/वेळ नसणार्या नवर्याला/मुलाला खायला पटकन मिळावं म्हणुन तुम्ही घरी कधी करता का असं रेडी टु इट?
असल्या घरी करता येउ शकणार्या व टिकणार्या पाककृती इथे येउद्या. 
अवघी विठाई माझी (२) - लीक

लीक हि भाजी आपल्याकडे मिळत नाहीच बहुतेक, तिला भारतीय नाव आहे का
हे मला माहीत नाही. पण हि भाजी आपल्याकडे होऊ शकेल असे मला वाटते.
कांदा ज्या भागात होईल, तिथे या भाजीची लागवड करता येईल.
लीक आणि कांदा तसे एकाच लिली कूळातले, पण कांदा आणि लीकची तूलना
करणे म्हणजे, कांदा आणि लसूण यांची तूलना करण्यासारखे आहे, कारण हे तिन्ही
एकाच कूळातले असले तरी, त्यांच्या स्वादात खुपच फ़रक आहे.
कांद्यापेक्षा, लीक बरेच गोडसर चवीचे असते. आपण कांद्याची जशी भाजी करतो, (म्हणजे
सात्विक, तामसी, राजसी पदार्थ
मला आपल्या आहारातील कुठले पदार्थ सात्विक, तामसी, राजसी असतात त्यांची नावे हवी आहेत. दुसरे असे की काही पदार्थ हे आपण कुठल्या वेळी खातो यावर ते सात्विक, तामसी, राजसी पदार्थ आहेत हे ठरत असतात. जसे की मी वाचले आहे दुध हे सकाळी सत्विक असते. आंबा हा सकाळी सात्विक असतो. कृपया इथे या विषयावर माहिती लिहा.
काही सुचना:
# इथे विनोद निर्मिती करु नका.
# इथले संदर्भ घेऊन इतर वाफंवर वा कुणाच्या विपूत विनोद निर्मिती करु नका.
कोल्ड कट सँडविचेस/रॅप्स(Wraps)
तुम्हाला माहिती असलेल्या, आवडणार्या कोल्ड कट सँडविच/रॅप्स बद्दल इथे लिहा. त्यात वापरलेले घटक पदार्थ कुठल्या ब्रँडचे, कुठल्या दुकानातुन आणलेत ही माहिती दिलीत तर उत्तम 
मिरची ठेचा उर्फ तोंपासू फॅन क्लब
इथे मिरच्यांच्या चटण्या, ठेचे, तिखट्या इ. तोंपासु पाककृत्या येउदेत.
मातृदिन : माझ्या आईच्या पध्दतीचा आंब्याचा शिरा
आंब्याचा शिरा:
लागणारा वेळ:
अर्धा तास
साहित्यः
१ वाटी जाड रवा
पाऊण वाटी सजुक तूप
१ वाटी साखर
२ वाटी हापुस अंब्याचा पल्प ( फ्रेश किंवा कॅन मधला)
दीड वाटी गरम दूध
काजु, भिजवलेले साल काढलेले बदामाचे काप, बेदाणे. (प्रमाण आवडी प्रमाणे)
सजावटः
ड्राय फ्रुट्स थोडे मिक्स करायला आणि थोडे सजावटीसाठी ठेवावे.
आंब्याचा सिझन असेल तर आंब्याच्या फोडी.
क्रमवार पाककृती:
१.अर्धी वाटी तूपावर रवा मंद आचेवर खमंग भाजून घ्या.
त्यात दीड वाटी गरम दूध घालून रवा छान फुलवून घ्यायचा.
