पाककला

बापरेs

Submitted by Mi Patil aahe. on 8 December, 2018 - 05:11

स्वयंपाक करणं हा आवडीचा विषय होऊ शकतो का? की कामाचा विषय आहे?
स्वयंपाक म्हणजे स्वत: शिजवलेले अन्न च ना? की घरातल्या बाईने (स्त्री) बनवलेले ? की स्वयंपाक्याने तयार केलेले? की आणखीन काही असते?
स्वयंपाक नक्की कोण आवडीने करीत असेल? अन् कोण काम म्हणून करीत असेल?
स्वयंपाक नेमका कोणी करावा?
अणि का?
आवड म्हणून? नाइलाज म्हणून? काम म्हणून? पर्याय नाही म्हणून? की भूक लागली म्हणून?
स्वयंपाक मुळात का करावा लागतो?
भूकेमुळे?
करावासा वाटला म्हणून? की
करायला सांगितला म्हणून?
स्वयंपाक करायला कोण सांगत?

विषय: 
शब्दखुणा: 

पनिर फ्रँकी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 December, 2018 - 04:58

मुलच काय पण मोठेही रोज तेच तेच चपाती आणि भात खाऊन कंटाळतात. आहो करणार्‍यालाही रोज रोज तेच करायचा कंटाळा येतच असतो पण नाईलाज असतो बरेचदा. कारण नविन पदार्थ करायचा म्हटल की सामानाची जुळवा जुळव, तयारी करावी लागते. मग इच्छा असून पण सामान किंवा वेळ नसल्यामुळे कधी कधी ठरवलेले मनातले बेतच रद्द करावे लागतात. असो तर काय झाल त्या दिवशी असाच मुलिंना कंटाळा आला रोजच्या जेवणाचा मग म्हणाल्या आज काहीतरी वेगळ कर. आता काय वेगळ म्हटल की पहिला मी पुस्तकं काढून बसायचे पण आता घेतला मोबाईल आणि युट्युबवर सर्च केल पोटभरीचेच म्हणजे जेवणासारखे कोणते पदार्थ करता येतील ते.

विषय: 
शब्दखुणा: 

मस्तानम्मा यांच्या काही अस्सल देशी पाककृती

Submitted by atuldpatil on 5 December, 2018 - 03:21

हैदराबाद: जगातील सर्वात वयोवृद्ध 'युट्युबर शेफ' मस्तनम्मा यांचे निधन झाले आहे. आंध्र प्रदेशमधील गुंटूर या मूळ गावी वयाच्या 107 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झणझणीत चिकन आणि मटन बनवणारी युट्युबवाली आज्जी अशी त्यांनी जगाला ओळख होती. युट्यूब चॅनेल्सच्या माध्यमातून या आजी जगभर पसरल्या होत्या. विशेष म्हणजे केवळ 2 वर्षात या आजीच्या युट्यूब चॅनेलला 12 लाख सबस्क्राईबर्स मिळाले होते. आता, या सबस्काईब्रर्सची संख्या 1.2 मिलियन्स एवढी झाली आहे.

विषय: 

भोपळ्याच्या फुलांची भजी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 December, 2018 - 02:53

इतक्या दिवसांनी रेसिपी टाकतेय आणि मासे सोडून हिला फुलेच मिळाली का अस तुम्ही मनातल्यामनात नक्की म्हणत असाल ना. येतील येतील माशांच्याही अजून रेसिपी येतील लवकरच. पण बरेच दिवसांचा गॅप आधी पाना फुलांनी भरून काढुयात.

विषय: 
शब्दखुणा: 

तुमचा विकान्ताचा मेन्यू काय असतो?

Submitted by स्वप्नाली on 29 November, 2018 - 16:23

विक-डे मध्ये फारसे काही वेग ळे करायची सोय नसते, मुले सुद्धा तेच तेच खावून कन्टाळतात...
तेव्हा चला चर्चा करूया तुमचा विकान्ताचा मेन्यू (घरी केलेला ) काय असतो?

विषय: 

खिला-रे एग्ज कॅफे, पुणे ... एक रिव्यू

Submitted by उपेक्षित on 27 November, 2018 - 02:06

खूप दिवस झाले अंडा भुर्जी खावीशी वाटत होती किंवा अस म्हणा अंड खूप दिवसा पासून खाल्ल नव्हत अर्थात घरी आपण करतोच पण बाहेरची चव ही काहीतरी वेगळीच असते....

मग विचार केला की आता जावं कुठ.. आणि त्यात आपल्या पुण्यात खास फॅमिली ला घेऊन जावं असं फक्त एग च कुठल हॉटेल किंवा कॅफे नाहीये रादर कमी आहेत म्हटलं इट आऊट वर जाऊन विचारावं की चांगली भुर्जी कुठे मिळेल.. बघतो तर काय इट आऊट वरच खिला-रे एग कॅफे ची पोस्ट दिसली.. जहा चाह वहा राह
झाल तर मग खाली पत्ता दिला होताच जवळच कर्नाटक हायस्कूल पाशीचा पत्ता होता आणि पोस्ट वाचून वाटलं की हा गडी पण खवैया असेल..

शब्दखुणा: 

मायबोलीवरच्या नेहमी केल्या जाणार्‍या पाककृती

Posted
3 months ago
शेवटचा प्रतिसाद
3 months ago

हा बाफ तसा उगीच! परवा एकांशी बोलताना लक्षात आलं आपण माबोवरच्या काही पाकृ बरेचदा करतो. इतकच काय फक्त माबो रेसिप्या वापरून एखादा पार्टीचा मेन्यूही ठरवता येईल. आठवायला बसल्यावर बरेचदा केल्या जाणार्‍या / केल्या गेलेल्या खालच्या रेसिप्या आठवल्या. आठवल्या आहेतच म्हणून इथे लिहून ठेवतो आहे. कोणी पाहिल्या नसतील तर बघता येतील.

विषय: 
प्रकार: 

पौष्टिक सलाडः- मूग-पनीर

Submitted by अतरंगी on 23 November, 2018 - 03:38

तेल, साखर, मीठ या सर्वाच्या अतीसेवनाने होणारे होणारे नुकसान सर्वांनाच माहित आहे. ते वगळून पण ताटातील सर्व महत्वाचे घटक आणि त्यातून मिळणारे पोषक मुल्य मिळतील अशा सलाडच्या पाककृतींसाठी ही मालिका. ही सगळी सलाड आपल्या जवळच्या भाजी मंडईत मिळणार्‍या घटकांपासून आणि घरी बनवता येण्यासारखी आहेत.

मी ही रेसीपी कुठे तरी वाचली होती. त्यातले ( माझ्या दृष्टीने) अनावश्यक घटक वगळून मी हे सलाड बनवतो.

विषय: 

हुकुमशाही _ सविस्तर

Submitted by भास्कराचार्य on 16 November, 2018 - 12:10

लागणारा वेळ:
एखादे दशक.

लागणारे जिन्नस:

१. १ नावापुरती चिमूटभर लोकशाही.

२. १ सरकारच्या हातात सर्व नाड्या असलेली अमाप ताकद असलेली 'कल्याणकारी' अर्थव्यवस्था. डबघाईला आलेली असल्यास उत्तम. पण तशी नसली, तरी चालू शकते. ती योग्य तशी 'वाटून' घेता येते. मात्र ह्या परिस्थितीत पदार्थ शिजायला थोडा जास्त वेळ लागण्याची तयारी ठेवावी.

विषय: 

पौष्टिक सलाडः- मेथी

Submitted by अतरंगी on 16 November, 2018 - 04:17

तेल, साखर, मीठ या सर्वाने होणारे नुकसान सर्वांनाच माहित आहे. ते वगळून पण ताटातील सर्व महत्वाचे घटक आणि त्यातून मिळणारे पोषक मुल्य मिळातील अशा सलाडच्या पाककृतींसाठी ही मालिका. ही सगळी सलाड आपल्या जवळच्या भाजी मंडईत मिळणार्‍या घटकांपासून आणि घरी बनवता येण्यासारखी आहेत.

घटक क्र १:- मोड आलेली मटकी (एक मुठ)
घटक क्र २:- मेथी ( एक वाटी)
घटक क्र ३:- किसलेले गाजर ( अर्धी वाटी)
घटक क्र ४:- छोटे/ मध्यम आकाराचे डाळींब.
घटक क्र ५:- सुर्यफूल, कलिंगड, भोपळ्याच्या बिया, पाइन नट्स ( सर्व मिक्स करुन दोन ते तीन चमचे)

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - पाककला