लहान मुलांचे वजन

Submitted by मी अमि on 26 June, 2015 - 06:16

माझ्या मुलाचे वय पावणे दोन वर्षे आहे आणि वजन ९.८ किलो आहे. इतके दिवस डॉक ना विचारले तेव्हा ते त्याचे वजन ठिक आहे वगैरे म्हणायचे. दुसर्‍या डॉक ना दाखवले तेही तसेच म्हणाले होते. यावेळच्या व्हीजीट मध्ये मी डॉक ना परत सांगितले की त्याचे वजन बरेच दिवसांपासून स्थिर आहे. तेव्हा ते म्हणाले की त्याचे वजन १ वर्षे ते २ वर्ष या काळात १.५ किलो वाढायला हवे होते. सध्या ते फक्त ६०० ग्रॅम वाढलय.

त्याचा आहार असा आहे: - सकाळि ७.३० ते ८ - नाचणी सत्व (दुध घालून)
सकाळी ११ ते १२ - पोळी भाजी, भात, अंड्याची बुर्जी/ ऑम्लेट, वरण/ ताक
दुपारी ३ ते ४ - रव्याची खीर/ गव्हाच्या पीठाची खीर/ फळांचा मिल्क शेक
संध्या काळी - ७ ते ७.३० - पोळी भाजी, भात,वरण
रात्री १० - मिश्र धान्याच्या पीठाची खीर (दुध घालून)

डॉ म्हणाले की संध्याकाळचे आणी रात्रीचे खाणे स्वॅप करा. पण रात्री १० वाजता जेवायला देणॅ आम्हाला योग्य वाटत नाही.

वजन वाढण्याचे काही उपाय/ सल्ले मिळू शकतील का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मुलीचे वजन १० पर्यंतच होते १ वर्षाची झाली तेव्हा..
आताही फार वाढल नाहिये.. १२-१३ च.. पण चपळ आहे.. बाकी काहीच प्रॉब्लेम नाही.. दिवस्भर खुप जास्त खेळ्ते दिवसा झोपतच नाही फक्त खेळाकडे लक्ष .. डॉक सांगताअत की थोड चीज दुध ई. वाढवा..
विशेष काही नाही म्हणुन.. सो हे नॉर्मलच असेल..

डॉ म्हणाले की संध्याकाळचे आणी रात्रीचे खाणे स्वॅप करा. > अजिबात नको.
नाचणीच्या सत्वात एक चमचा बदामाचे कूट, एखादा खजूर बारीक चिरुन / ८-१० काळ्या मनुका असे घालता येइल. दुपारी फळांचा मिल्क शेक नको. नुसती फळे खाऊ दे. दुपारचे खाणे खीरीऐवजी दुसरे काही देता येइल का? फळांचे तुकडे आणि जोडीला धिरडे वगैरे . चीज शक्यतो नको. कारण सॉल्ट आणि फॅट.
डॉक वापरतो तो तक्ता भारतीय मुलांसाठी आहे ना हे ही बघा. खूप अ‍ॅक्टिव असेल तर वजन जास्त वाढणार नाही.

>>नाचणीच्या सत्वात एक चमचा बदामाचे कूट, एखादा खजूर बारीक चिरुन / ८-१० काळ्या मनुका असे घालता येइ>>>> हो खीर आणि सत्वा मध्ये ड्राय फ्रूट पावडर (घरी बनवलेली) आणि खारिक पावडर मिक्स करते.
दुपारच्या खाण्याचे इतर पर्याय शोधेन पण दुपारी तो फार काही खायच्या मनस्थितीत नसतो.

दिवसभर मस्ती करत असतो. त्यामुळेही वजन वाढत नसावे.

पनीर तव्यावर थोडे शॅलो फ्राय करून देऊ शकतो का?

अमि, तो वारंवार आजारी पडतो का? किंवा त्याचं वजन कमी आहे म्हणून त्याच्यात काही उणीव जाणवते का? त्याचं वजन वयानुसारच्या तक्त्यात असलं की तो स्ट्राँग होईल असं वाटतं का? बाळाची शारिरिक, बौद्धिक आणि मानसिक वाढ व्यवस्थित असेल तर त्याचं वजन वाढवण्याचा अट्टहास कशासाठी?

त्याला फळ कधी खायला देतेस? तोज एक फळ (मिल्कशेक/ ज्यूस नाही) त्याच्या पोटात जायला हवं. वेलची केळं, चिकू (सालासकट तुकडे करून), डाळींबाचे दाणे, संत्रं-मोसंब्याच्या फोडी, पेअर, पीच, चेरी ही सध्याची मोसमी फळं त्याला देत जा. रात्री झोपायच्या आधी नुसतं दूध देत जा. मिश्र धान्यांचा वापर धिरडी, थालिपीठांसाठी करता येईल. भाज्या घालून केलेली धिरडी/ आंबोळ्या, थालिपीठं घरच्या लोण्या-तुपाबरोबर त्याला खायला देता येईल. अंजीर, खजूर, बदाम, जर्दाळू हा सुकामेवा तसंच दही ताकाचाही समावेश त्याच्या आहारात होऊ दे.

पनीर चालेल. पण पनीर ऐवजी कॉटेज चीज जास्त चांगले. त्यातले केसीन मसल बिल्ड करते. पनीर साठी दूध फाडतो तसेच विनेगर वापरुन करायचे पण ५ मिनीटेच निथळवायचे. फोर्कने मोठे तुकडे बारीक करुन घ्यायचे. मीठ घालायचे नाही - पारंपारीक पद्धतीत घालतात.

बाळाची शारिरिक, बौद्धिक आणि मानसिक वाढ व्यवस्थित असेल तर त्याचं वजन वाढवण्याचा अट्टहास कशासाठी?>>> हो माझ्या लेकीचे वजन कमी होते तर माझ्या डॉकनेही मला हेच सांगितले होते. ते म्हणाले की तुम्ही लोकं फक्त वजन वाढेले की बाळाची वाढ झाली अस म्हणता पण बाकी गोष्टी पण बघत चला.

बाळाची शारिरिक, बौद्धिक आणि मानसिक वाढ व्यवस्थित असेल तर त्याचं वजन वाढवण्याचा अट्टहास कशासाठी? >> +१. मूल अ‍ॅक्टीव्ह आहे ना? दमत्/थकत नाही ना? त्याची आकलनशक्ती चांगली आहे नां?? मग काळजीचे काही कारण नाही, माझी मुलगीही तशी बारीकच. पण ती उंच आहे. आम्हीही डॉ, ना विचारले होते ,तेव्हा त्यांनीच हे तीन प्रश्न आम्हाला विचारले. Happy

बाळाची शारिरिक, बौद्धिक आणि मानसिक वाढ व्यवस्थित असेल तर त्याचं वजन वाढवण्याचा अट्टहास कशासाठी?>> +१

मलाही डॉ हेच म्हणाले होते. वर पुस्ती जोडली आत्ता वजन वाढत नाही म्हणून चिंता करायची आणि जर चुकून वजन थोडं जास्त वाढलं तर मग कमी कराय्ला धावपळ करायची. त्यापेक्षा मूल हसतं खेळतं आहे मजा मस्ती करतं आहे धावतं पळतं आहे त्यात आनंद मानायला कधी शिकणार तुम्ही लोक..

अमि, एक लक्षात ठेवायचं, आंब्याच्या झाडाला आंबेच येतात, भोपळे येताना बघितलंयस का कुठे... तसंच असतं मुलांचं. आई-वडिलांची तब्येत हा मेन पॉईंट असतो मुलांच्या तब्येतीचा. आई वडिलांची चण नाजुक असेल तर मुलही तसंच नाजुक चणीचं असतं. तुझं बाळ वरच्या वर आजारी पडत नाहीय ना, खेळताना दमत नाहीय ना, मग उगाच वजन वाढवायच्या मागे नको लागुस. आपण मुलांचं वजन वाढवण्याच्या नादात आपलं वजन उगाच कमी करुन घेतो. भुक लागली की बरोबर खातात मुलं.

सर्वांचं म्हणणं पटलं. या विचारानेच इतके दिवस मी टेन्शन घेत नव्हते. पण त्या दिवशी डॉ म्हणाले की त्याचे वजन १.५ किलो वाढायला हवे होते. त्यामुळे काळजीत पडले.

त्याची बौद्धिक आणि मानसिक वाढ उत्तम आहे. दिवसभर अ‍ॅक्टीव्ह असतो. सतत आजारी नसतो पण जरा वातावरणात बदल झाला तर आजारी पडतो आणि लगेच वजन एकदम खाली जाते. मागे त्याला स्टमक इन्फेक्शन झाले त्याने इतका परीणाम झाला की पाठ आणि पोटाकडून बरगड्या दिसत होत्या.

सध्या खजूर आणि मनुका बारिक करून सकाळी नाचणी सत्वात मिसळून द्यायला सुरुवात केलीय.

उगाचच गुटगुटीत बाळसेदार बाळाचा हट्ट करू नये हे बरोबर. पण जर डॉ. म्हणतायत की वजन वाढायला हवं होते, तर त्यात काहीतरी तथ्य आहे की नाही? डॉ ने पण खाण्याचे पूर्ण कोष्टक बघूनच अदलाबदल करायला सांगितली असेल तर ते ही कसे काय चूक वाटतेय? या डॉ वरच विश्वास नसेल तर दुसरे डॉ बघा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार बदल करा. त्याची शारिरीक, बौध्दिक, मानसिक वाढ बरोबर आहे की नाही किंवा पुढे त्यात काही समस्या येऊ नयेत हे डॉ ला कळत असावे असे मला वाटते. डॉ ला न विचारता हा प्रश्न इथे केला असता तर वरचे सर्व सल्ले शिरोधार्य आहेत पण डॉ चे म्हणणे डावलून? बिग नो फ्रॉम मी.

सध्या मी ओळखीतल्या एका डाएटीशियनना विचारलय. त्यांनी खजूर, मनुका, चणे, गुळ, शिंगाडा पीठ याचे प्रमाण वाढवायला सांगितले आहे. त्याने फरक पडतो का ते पाहते. तो कुठलही फळ पुर्ण खात नाही. थोडंसं खाऊन इथे तिथे लोळवतो आणि मग फेकून देतो. म्हणून त्याला मिल्क शेक देतो.

अमि,
लहान मुलांसाठी एक सर्विंग
१/४ कप फळांचे तुकडे , ड्राय फ्रूट असेल तर एक टेबलस्पून, दूध /दही अर्धा कप, शिजवलेल्या भाज्या १ पळी, पोळी अर्धी, १ चमचा तूप, एक अंडे वगैरे . त्यापेक्षा जास्त वाढले तर मुल टाकते आणि आपल्याला मुल नीट जेवत नाही असे वाटत रहाते. दुसरे म्हणजे मुलाला नीट भूक लागल्यावर स्वतःच्या हातानेच खाऊ दे. ते अंगीही लागेल. मिल्क शेक वगैरे देवून मुलाने खाल्ले असे आपले समाधान होते पण हे सगळे तात्पुरते उपाय. त्याला भुकेपोटी नीट जेवायची सवय लागणे हे होत नाही. तुकडे करुन द्यायचे. एका जागी बसुन जेवण. त्यावेळी गप्पा, गोष्ट सांगणे वगैरे चालेल पण टिवी/कार्टुन वगैरे नको.

आशुडीच्या संपूर्ण पोस्टीला अनुमोदन.

एरवी डॉक्टर स्वतः मुलांचं वजन न वाढल्याबद्दल निश्चिंत असतात तेव्हा आपण डोक्याला काळजी करून घेण्यात अर्थ नाही हे पटतं. पण डॉक्टर 'वजन वाढायला हवं' सांगताहेत तेव्हा त्यात तथ्य असणारच!

>>डॉ म्हणाले की संध्याकाळचे आणी रात्रीचे खाणे स्वॅप करा.
ह्या स्वॉपिंगमागे कारण नाही का विचारलं? रात्रीच्या भरपेट जेवणानंतर जास्तं अ‍ॅक्टिव्हिटी न होता २ तासांत झोप लागली तर त्याच्याही वजनावर चांगला परिणाम होईल असं नाही का वाटत? १० वाजताऐवजी जेवणाची वेळ थोडी पुढे आणता येईल. (वजन घटवण्यासाठी डाएट करणार्‍यांना 'रात्री जेवल्यावर किमान दोन तास झोपू नका' हा सल्ला असतो म्हणून डोक्यात आलं.)

१ ते ३ वर्षांपर्यंत १००० ते १२०० कॅलरीजची गरज असते असं वंशवेल पुस्तकात वाचलं. अमि, तुम्ही वर लिहिलेल्या दिवसभराच्या डाएटमध्ये तितक्या कॅलरीज बाळाच्या पोटात जाताहेत हे डॉक्टरांना, डाएटेशिअनला विचारून घेऊ शकता. तुडतुड्या मुलांच्या अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये जवळपास तेव्हड्याच खर्चही होत असतील. Happy

एकूण काय, बाळांच्या वजनाच्या चिंता काही कधी संपत नाहीत. त्यांच्या लहानपणी वजन वाढत नाही म्हणून काळजी, मोठेपणी अती वाढतंय म्हणून. Happy

एकूण काय, बाळांच्या वजनाच्या चिंता काही कधी संपत नाहीत.<<< +++१

आमच्याकडे वजन वाढीची चिंता फारशी करत नाही कारण आम्ही दोघेही तुडतूडीत.
भरपूर दंगा करतय आणि नियमीत आहार घेतो आहे. त्यामधे काही बदल झाले तर पहावे लागते.

८ वाजता gahu peethachi tup va dryfruit koot ghalun lapashi
11 vajata poli bhaji bhat varan
2 vajata bhat dhood tup mixer karun
5 vajata jwarichi lapashi or dhood
6.30 la dhood poli churun
8 vajata kel or seb
10 vajata mugachi khichadi
vajan 17 kilo 3 varsh
ani sagalyat mi mug tup ghalat asate
२ ते ५ झोप
एकुण ५ वेलेला जेवु घालावे

माझा मुलगा वय एक वर्ष एक महिना वजन ११ किलो
आहार:-
सकाळी उठल्यावर ७ वाजता १-२ काळा खजुर दुध एक ग्लास + १ चमचा चैतन्यकल्प
८.३०-९ वाजता १ मोठा बोल कण्हेरी डाळ-तांदूळ भरड्याची
मग तो झोपतो २-३ तास
उठल्यावर १-१/२ पोळी-भाजी, १ वाटी भात वरण तुप लिम्बू
मग तो खेळत असतो आणि ३-३.३० वाजता पुन्हा झोपतो.
५ वाजता उठतो मग पुन्हा दुध+चैतन्यकल्प
७ वाजता १ मोठा बोल कोणतही सुप/ मिश्र धान्य लापशी/ खीर + एक फळ
९ वाजता १-१/२ पोळी-भाजी, १ वाटी मऊ भात + तुप+ मेतकूट.

मुग्धा, तन्मयी गुणी बाळं आहेत तुमची . भरपुर झोपतात. माझा मुलगा दिवसभरात १-२ तासच झोपतो. काही वेळा दिवसभर अजिबात झोपत नाही. रात्री ११.३०-१२ पर्यंत मस्ती करत असतो. जबरदस्तीने झोपवावे लागते.

मुग्धा, चैतन्यकल्प काय आहे?

चांगली वाढ होण्यासाठी एक पुरक आहार
अर्धा किलो गहू, पाव किलो नाचणी वेगवेगळे भिजत घालवे त्याला मोड आणून कडक उन्हात १-२ दिवस वाळवावे. पाव किलो पंढरपुरी डाळं धुवुन वाळवावे. ( वरील धान्य नुसती धुवून वाळवली तरी चालतील पण मोड आणल्यामुळे पौष्टिकता वाढते )
मंद गॅसवर वेगवेगळे भाजावे. मिक्सरवर दळावे, दळताना त्यात आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालावे.
असे पीठ करुन ठेवावे लापशी करताना त्यातले २ मोठे चमचे पीठ घेउन १ चमचा तूपावर भाजावे त्यात १ वाटी पाणी घालून शिजवावे. त्यात गुळ, आवडत असेल तर नारळाच दुध, वेलची/ जायफळ/ सुठं पावडर घालून खायला द्यावे. अथर्व सहा महिन्याचा असल्यापसून मी त्याला देते आवडीने खातो.

चैतन्यकल्प बालाजी तांबे च प्रॉडक्ट आहे. दुधात घालुन द्यायला. बाकी कोको बेस्ड पावडरींपेक्षा मला चांगल वाटल.

एक मोठा बोलभरून लापशी किंवा सूप प्यायल्यावर दोनच तासात तुमची मुलं एक दीड पोळी, एक वाटी भात वगैरे सगळं संपूर्ण जेवतात? मला कॉम्प्लेक्स यायला लागलाय. Uhoh (प्लीज एका जागी बसून जेवतात हे तरी लिहू नका मला घेरी येईल!)

एक मोठा बोलभरून लापशी किंवा सूप प्यायल्यावर दोनच तासात तुमची मुलं एक दीड पोळी, एक वाटी भात वगैरे सगळं संपूर्ण जेवतात? मला कॉम्प्लेक्स यायला लागलाय. अ ओ, आता काय करायचं (प्लीज एका जागी बसून जेवतात हे तरी लिहू नका मला घेरी येईल!) >>> +१११

माझा अथर्व दिवसभर खूप खेळतो पण जेवताना शक्य तेवढा एका जागी बसवायचा प्रयत्न मी करते, काहीतरी खेळण हातात देउन किंवा टीव्हीवर नर्सरी राइम्स दाखवुन.

1)mi vela palate
2)mixer karun or tasach ghalte
3)lapashi dyayala ata to evadha chota nahi
4)apan je khato te dete korad khavu ghalun or mixer karun
5)tv lavava lagato khatana nahitar apan bolav lagat
6) doodh tup mug hyavar jast bhar asto
7)mugachi khichdi doodh ghalun mixer karun dete yammi lagate
8)bhajya don time dete kashatahi ghalun tyamule vajan changale ahe
lahan astana premature low weight hota teva pasun mi mission weight critical var hote
pan ata kay zaly ki tyala dry food or apal ann khau ghalatana tras hoto
9)apan tyala compulsory khau ghalav jar weight vadayach asel tar
nahitar ajari padatat.
apan apli jababdari talun chalat nahi
10) adhi 1 vati dyav nantar vadhavav pan 5 6 velela ghalav

11) zop mahatvachi dupari zopat nasel zopavav apan sarv andhar karun tyachya sobat zopun zopatat ti tyachya activity kami karvyat ghevun basav
tin chaki cycle var basvav tyan eka jagi rahato

डॉ ने सुरुवाती पासून नुसते दुध द्यायचे नाहि असे बजावले होते. लॅक्टोज इन्टोलरन्स नाही आहे. पण डॉ नी सांगितलय म्हणून देत नाही. परिणामी त्याला प्लेन दूध दिले नाही. जे काही दूध जाते ते खीर वगैरे मधूनच जाते.

मला सुध्दा डॉक ने सांगितल होत प्लेन दुध दयायची गरज नाही अस. पण अथर्वला दुध फ़ार आवडत. आश्चर्य म्हणजे त्याला गायीच दुध अजिबात चालत नाही , आणि आवडतही नाही. त्यामुळे मी म्हशीच दुध देते.

डॉ. ने वरचं दूध द्यायचं नाही असं का सांगितलं होतं? काही कारण? म्हणजे आपण चहाऐवजी मुलांना सकाळ संध्याकाळ दूध देतो कपभर तसं नाही द्यायचं?

आशू, वरचं दूध नव्हे, 'नुसतं दूध देऊ नका' असं अमि आणि मुग्धाला सांगितलं होतं डॉकनी.
प्लेन दूध द्यायचं, साखर - बोर्नव्हिटा-कॉम्प्लान वगैरे न घालता.

Pages