बाणेर, औंध भागातील ऑर्थोपेडीक डॉक्टर्स सुचवाल का.

Submitted by mansmi18 on 6 February, 2016 - 23:22

नमस्कार,

वडिलांना (वय ७९) कंबरदुखी सुरु झाली आहे. बाणेर, औंध भागातील काही स्पेशलिस्ट/क्लिनिक्स कृपया सुचवाल का?

गुगलवर काही माहिती मिळाली आहे त्यवरील अनुभव असल्यासही कृपया लिहा.
सिनर्जी स्पाइन अँड ऑर्थोपेडीक सेटर (बाणेर रोड)
स्पायनॉलॉजी क्लिनिक औंध पुणे
मोडखरकर क्लिनिक औंध पुणे
डॉ सतीश मेढेकर - औंध
डॉ.अभय कुलकर्णी - औंध

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आदित्य बिर्ला ला डॉ दास्ताने आहेत ते चांगले आहेत, त्यांची औंध बाणेर भागात प्रायव्हेट प्रॅक्टीस आहे का चौकशी करुन सांगते

चिंचवडला निरामय हॉस्पिटलमधे डॉ. निर्मलकुमार ढुमणे आहेत.त्यांची औंध बाणेर भागात प्रायव्हेट प्रॅक्टीस आहे का चौकशी कराल का? मी १-२ दिवसात त्यांचा फोन नं. देईन.माझ्या आईचे नी-रेप्लेसमेंट त्यांनी केलंय.

फॅमिली डॉक्टर / जनरल प्रॅक्टीशनर नाही का ओळखीचा ?
ज्या भागात आपण राहतो तिथे रहायला आल्यानंतर ओळखीनेच या भागातले रेफरन्सेस मिळत जातात.

फॅमिली डॉक्टर / जनरल प्रॅक्टीशनर नाही का ओळखीचा ?>>> हे जास्त चांगले आहे.

स्पाइनॉलॉजीचा आमचा अनुभव खराब होता. पाठीचा एक्सरे काढताना थोडं वाकडं झोपवलं तिथल्या असिस्टंटने आणि नंतर एक्सरे आल्यावर सांगितल की स्पायनल कॉर्ड 'S' शेपची झाली आहे Lol
त्यासाठी मग फिजिओथेरेपीचे विविध पॅकेजेस सांगितली.

दुसरीकडे गेल्यावर असला एक्सरे पाहून डॉक्टर हसत होते थोडा वेळ.

पिंपळे सौदागर मध्ये डॉ. बोंद्रे आहेत, हिलिंग टच हॉस्पिटल मध्ये. चांगला आहे अनुभव.
दररोज संध्याकाळी ७:३०-८:३० असतात तिथे. त्यांची औंध-बाणेर मध्ये प्रायवेट प्रॅक्टीस आहे का ते बघतो.