यूह नीड ए सायकिअ‍ॅट्रीस्ट !

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 March, 2016 - 15:48

आजचीच ताजी घटना. संध्याकाळची वेळ. किंचित उशीराची. ट्रेनचा जेमतेम भरलेला डबा. सारे प्रवासी आपल्या परतीच्या प्रवासाला लागलेले. काही पेपर वाचत होते, काही मोबाईलवर लागले होते, तर काही बस्स उगाचच टिवल्याबावल्या करत होते. सारेच गर्दीत हरवलेले चेहरे. बस्स एक मुलगा सोडून.

दोनतीन ज्युनियर कॉलेजवयीन मुलांचा छोटासा ग्रूप होता. दोन मित्र शांतपणे बसलेले. आणि त्या एका उभ्या असलेल्या मुलाची टकळी चालू होती. पोरगा मराठी होता. चुरूचुरू बोलत होता. त्याच्या बडबडीची भाषा ओळखीची वाटत होती. कॉलेजच्या गप्पा, पोरींचे विषय, सरांची मस्करी, क्रिकेटच्या चर्चा रंगल्या होत्या. नव्हे तो एकटाच बोलत होता.

अचानक माझ्या समोर बसलेल्या एका माणसाला अचानक काय झटका आला देवास ठाऊक. पण वळला आणि त्याच्या मागे असलेल्या त्या बडबड करणार्‍या मुलाकडे बघून किंचाळला, "डू यू हॅव अ‍ॅनी प्रॉब्लेम ???"

सौथेंडीयन अ‍ॅक्सेंट !

मुलगा कावरा बावरा ..

तसा तो माणूस थ्री ईडियट्समधील वायरसच्या आवेशात पुन्हा किंचाळला, "डू यू हॅव अ‍ॅनी प्रॉब्लेम?"

मुलगा पुन्हा कावरा बावरा ..

नो प्रॉब्लेम .. नो प्रॉब्लेम ..

त्याचेही ईंग्लिश माझ्यासारखेच धन्य आहे हे मला पहिल्याच फटक्यात समजले.

"व्हाई आर यू शाऊटींग ??"

शाऊटींगचा मला माहीत असलेला अर्थ कर्रेक्ट असेल तर त्यावेळी तो माणूसच शाऊटींग करत होता.

आणि राहीला प्रश्न त्या मुलाचा तर कुठल्याही अ‍ॅंगलने त्याचे बोलणे हा गोंगाट वाटत नव्हता.

तरीही, ओके ओके .. बोलत तो मुलगा शांत झाला. बिचारा !.

त्याच्या बरोबरचे मित्रही साधेच असावे. कोणीही उलटून नडला नाही. तो माणूस मोठ्या रुबाबात पुन्हा आपल्या मोबाईलमध्ये बिजी झाला. टिंग टिंग, टिंग टिंग. कसलासा गेम खेळत होता. विथ म्युजिक. खरे तर मला असे साऊंड ऑन ठेवून गेम खेळणार्‍यांची प्रचंड चीड येते. एकवेळ मोबाईलवर मोठ्या आवाजात लावलेली गाणी परवडतात. पण या विडिओगेम्सचा आवाजाने एकदा इरिटेट व्हायला सुरुवात झाली की ईरीटेट होतच राहते.

असो, तर त्यानंतर मी त्या मुलाकडे पाहिले. त्याची माझी नजरानजर झाली आणि तो ओशाळत हसला. मी सुद्धा हसलो. आता मी त्या माणसाकडे पाहिले. त्याची आणि माझीही नजरानजर झाली. त्या मुलाचे ओशाळलेपण कमी व्हावे, त्या माणसाला त्याने काही तीर मारला नाही याची जाणीव करून द्यावी, किंवा जे काही झाले ते मला रुचले नाही किमान एवढे तरी त्याला समजावे या हेतूने मी त्याच्याकडे बघून हसलो. पण जरा कुत्सितपणेच. तसा तो मलाही म्हणाला, ""व्हाई आर यू स्माईलिंग ??"

मी पुन्हा हसलो. पण आता मात्र प्रसन्नपणे हसलो. एखाद्यावर हसण्यासारखे दुसरे चिडवणे नाही जगात.

"एनी प्रॉब्लेम?" त्याने वैतागत पुन्हा विचारले.

मी माझ्या चेहर्‍यावरचे हास्य तसेच कायम ठेवत म्हणालो.., यूह नीड ए सायकिअ‍ॅट्रीस्ट !

- ऋन्मेष ’ -

..................

बरेच दिवस मनात होते बोलावे कोणाला तरी , आज ओठांवर आले Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयशप्पथ ऋ! मी पण एका बयेला असं म्हणाले होते ट्रेन मधे.

खरे तर मला असे साऊंड ऑन ठेवून गेम खेळणार्‍यांची प्रचंड चीड येते.>>>+१००००००
ज्जे बात!

पाय स्वच्छ असतील >> ?? Uhoh म्हणजे अगदी डेटोलने किंवा गोटॉलने Wink धुवुन लोक पाय समोरच्या सीट्वर ठेवत असतील असा तुमचा समज दिसतोय.

मस्तच रे.. Lol
बसचा प्रवास करताना हमखास कधी मधी एखाद्याचे गाणे ऐकन सुरु असतं.. कानफडात मारायची इच्छा होते.. बिनडोक कुठले.. बर सुशिक्षित सुजान नागरिक तर बरेचदा १२ तासाच्या पुणे यवतमाळ प्रवासात सुद्धा जोराने गाणे लावून बसतात तेव्हा तर सनीच्या 'उठा उठा के पटकुंगा' डायलॉगची आठ्वण येते.. Angry

Lol
खारघर - वडाळा ट्रेन प्रवसात एकीने असाच ताप दिलेला. गाणी पण काय? हम यार है तुम्हारे दिलदार है तुम्हारे हमसे मिला करो Happy पासुन तिच्या मोबाइल्ने जी कोकलायला सुरुवात केलेली ती- मैया यशोदा, एबीसीडी - आय लव यु, अशी बरीच होती, मी वडाळ्याला उतरले तरी सुरुच.

अग्निपंख | 3 March, 2016 - 15:14 नवीन

त्या 'यूह' मध्यल्या extra 'ह' चं काय प्रयोजन आहे?

तो खास ऋन्मेऽऽष टच् आहे. उदा. हाल्फ असे लिहिणे. हल्ली हा टच् मायबोलीवर लोकप्रिय होऊ पाहतोय. रसप यांनी त्यांच्या आताच्या नीरजा या चित्रपटपरीक्षणाच्या लेखात चक्क लेंग्थ असा शब्द वापरलाय.

प्रकाशजी, काही नाही म्हणाला. काही सुचलेच नाही त्याला. अवाक झाला असावा किंवा कदाचित पटलेही असावे.

हो, मनीमोहोर. असे अनुभव येतात. ताकदीच्या किंवा मोठ्या ग्रूपच्या जीवावर दादागिरी करणे, आपल्यापेक्षा छोट्यांना राग देणे हे बरेचदा चालते.
मुळात तो मुलगा एवढ्या मोठ्या आवाजात बोलत नव्हताच. बहुधा याच्या गेमच्या कॉन्स्ट्रेशनला बाधा येत असावी. पण तेच यापेक्षा मोठा गोंधळ सिनिअर कॉलेजच्या मुलांनी घातला असता तर याची काय बिशाद त्यांना ओरडायची.

@ यूह .. तर प्रत्येकाचा ईंग्लिश बोलायचा एक एक्सेंट असतो.. माझा लिहायचा आहे.

@ गाणी लावणे - तर हेडफोन लावायला सांगायचे. आवाज कमी करा अशी रिक्वेस्ट करायची. आवाज कमी करत असताना किती करतोय हे रोखून बघायचे. मग शक्यतो बराच कमी केला जातो. मग त्या हळू आवाजात गाणी ऐकायची त्या व्यक्तीला सवय नसल्याने बोअर होत बंद करतो.

@ सीटवर पाय, प्रत्येकाचे कन्सेप्ट वेगळे असू शकतात. मी नंगे पाव ठेवतो बिनधास्त. बरेचदा सीट खराब होण्याऐवजी तिच्यावरची धूळ आपल्या पायांनी साफ होते. चप्पल घालून पाय ठेवणारे मात्र डोक्यात जातात. तसेच कोणी पायावर पाय ठेवून बाजूच्या व्यक्तीला लागायची शक्यता निर्माण करतात अश्यांची चीड येते.

एकदा मी नंगे पाव समोरच्या सीटवर ठेवले होते. एका ज्येष्ट गृहस्थांना ते रुचले नाही आणि खेकसलेच माझ्यावर. मी सॉरी बोलत पाय खाली घेतले. खेकसल्याचाही राग नाही कारण त्यांचे वय माझ्या तिप्पट होते.

सीटवर पाय ठेवण्याबद्दल नेमकी आत्ता एक पोस्ट वाचनात आली थोपू वर..

The Logical Indian

An Indian went to Japan & being his regular habit of resting the feet on opposite seat, he did the same while travelling in a train.
An elderly man came to him, took his feet onto his lap and sat on the seat. The Indian was awestruck.
He asked the gentleman "Sir, why did you leave your seat & come here to keep my feet on your lap and sit?"
The man answered, "mister, you have insulted us by misusing our public property. I was very angry at you for that. But you're a guest to our country. I cannot insult you in public. You are habituated to rest your feet on the opposite seat of bus or train you travel. And I cannot see my country's property being misused. So in order to save our public property & at the same time not to cause inconvenience to a guest, I took your feet on to my lap".
The Indian felt ashamed & apologised to the gentleman.
The old Japanese man said to the Indian, "We treat the government's property as our own as they are provided from public money. We respect the facilities & don't misuse them. If you can make this habit, you don't have to be insulted like this when you visit other countries'. The elderly gentleman gave a soft-spoken slap.
[Forwarded Message]

कोणीतरी एकदा असच एका जापानी व्यक्तीबद्दल सांगितलं होतं, तो नेहमी जाणार्‍या गाडीमधलं सिट कव्हर फाटलेलं पाहुन दुसर्‍या दिवशी सुइ दोरा घेउन आला आणि ते सिट त्याने शिवलं.

रच्याकने..सिटवर ((सार्वजनिक ठिकाणाच्या) पाय ठेवणार्‍यांना पण मनोविकारतज्ञाची गरज आहे का? Wink

ट्रेनमधे माझ्या समोर दोघे मैत्रीणी बसलेल्या. सीटा फुल. फोर्थ सीटसकट. त्यातल्या एकीने माझ्या सीटवर माझ्या बाजुलाच पाय ठेवला. अगदी पाय जरा हलला किंवा मी जरा हलली तर्‍ ट्च होइल असा. मी म्हणाले पाय खाली घ्या ना. (मी सुरवात शांतपणेच रीक्वेस्ट करुन करते :-)) तर ती म्हणे लागला काय तुम्हाला? उगीच काय? आणि तिच्या मैत्रीणीला संगायला सुरवात. बघ तर पाय टच पण झाला नाही तरी बिलते वैगेरे दोघी मिळुन राग कीव मिश्रित कटाक्ष वैगेरे.:राग:
मग मी म्हणाले, मी माझा पाय वर करुन तुझ्या चेहर्‍याच्या बाजुला धरते आणि वर म्हणते लागला नाही ना मग काही बोलायचं नाही. चालेल काय? Lol

जर्मनीत हॉटेलात उष्ट उरलं तर दंड आहे असे फॉर्वर्ड सुद्धा फिरत असतात (जे खरे नाही).

पण अनेक ठिकाणी सीटवर पाय ठेवल्यास दंड होतो.
http://www.sydneytrains.info/travelling_with/conditions_of_travel/fines

मी नंगे पाव ठेवतो बिनधास्त. बरेचदा सीट खराब होण्याऐवजी तिच्यावरची धूळ आपल्या पायांनी साफ होते >> घरी धुळीची साफ सफाई करताना पायानेच करतोस का रे?? जर तुला कोणितरी पाय ठेवलेल्या सीटवर बसायला काही वाटत नसेल तर यूह नीड .....

"We treat the government's property as our own

एक्झॅक्टली !
आपणही तेच करतो. घरी नाही का सोप्यावर बसताना समोरच्या टीपॉयवर तंगड्या पसरतो. बस्स तोच कम्फर्ट मिळवतो या धकाधकीच्या जीवनात.

अनवाणी पाय ठेवले तर काही वाटत नाही.
एकदा तर पावसाळ्याच्या दिवसात एक मुलगी मस्तपैकी मातीची सॅन्डल वाले पाय समोरच्या सीटवर टेकवुन बसली होती. तिला पण मी बोलले होते. दुसर्‍याना पण बसायचं आहे हे कळत नाही का? बिचारीने लगेच पाय खाली घेतले मला घाबरुन. Lol

चप्पल / बुट काढुन, पुढची सीट रिकामी असेल तर पाय ठेवायला हरकत नसावी.
प्रोव्हायडेडः मोजांचा वास येत नाहीय.

Pages