जीवनशैलीतील बदल..आवश्यकता? का? कसे

Submitted by स्मिता द on 11 March, 2016 - 06:17

जीवनशैलीचे बळी हे अनेकदा आपल्या वाचनात ऐकण्यात येते. आज आपली जीवनशैली खरेच आरोग्याच्या आधारावर योग्य आहे. आजचा आपला आहार , विहार याबाबत खरतर नव्याने विचार करायची अन बदल करायची आवश्यकता निर्माण झालीये.
काय असावी आपली सुयोग्य जीवन शैली?..काय काय करणे गरजेचे आहे?. काय योग्य अन काय अयोग्य? यावर चर्चा व्हावी..अनेक अभ्यासु लोकांचे सल्ले मिळावे हा हेतू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान धागा. चान्गले , आनन्दी , सकारात्मक जीवन जगण्यासाठी काय करता येईल, वैगरे .. वाचायला आवडेल.

अक्षय कुमारचे अनुकरण करावे - लेट नाईट पार्टीज् टाळतो, रात्री ९ ला झोपतो, पहाटे ४ ला उठतो. परिणाम - फिट तंदुरुस्त शरीर. वयाच्या पन्नासाव्या वर्षीही पुरेपुर उत्साह आणि ऊर्जा.

क्लिओपात्रा..:) धन्स...मला ही आवडेल..:)

बिपीन चंद्र हर..:) अगदी मोजक्या शब्दात मांडलेले तुम्ही..धन्यवाद

विठठल..धन्यवाद..शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त हवेच..पण आपल्याला त्या साठी काय काय करता येईल त्त्याचा विचार करुया आपण..:)

उत्तम जीवन शैलीत क्रमानुसार खालील गोष्टी महत्त्वाच्या
१) व्यायाम .... नियमित...... कमेत कमी २४० मि वय ५० पर्यंत दर आठ्वड्यात आणि त्या नंतर दर वर्षास २० मिनिटे कमी करीत १५० वर स्थित प्लस २ ते तीनदा साधे व्यायाम ( बेंडिंग एक्सरसाई़एस इ.)
२) वेळेवर झोप : ७ ते ८ तास...... १०-३० नंतर झोपणे वर्ज्य आधीच झोपायचे ( याचा अर्थ १०-३० नंतर जागे राहणे हा नाही)
३) वरील दोन गोष्टींमुळे चित्तवृत्ती खूप उल्हासित राहते. रोजचा तणाव रोज क्लीयर होतो व एक सेन्स ऑफ अचिव्हमेंट मिळते.
४) १० ते १५ मिनिटे एकांता त एकाग्र होवून बस णे व आपल्या श्रध्देनुसार प्रार्थना, हे शक्यतो झोपण्या आधी केल्यास खूप शांत वाटते
५) आहार- साधा, कमी तेल तुपाचा पण अधून मधून चमचमित खायला इंड्ल्ज करण्यास हरकत नाहीए.
६) ऑपिस आपल्या मुळे चालते आहे ही भावना त्यागणे. लेट गो
७) एकत्र जेवणे, काही संगीत, वाचन, इ. करणे
जीवनाकडून, आप्तेष्टांकडून फारश्या अपेक्षा न ठेवणे.
आपली सौंदर्य स्थाने स्वतः ओळ्खण्याचा जाणीव पूर्वक प्रयत्न करणे
मी वरील गोष्टी स्वानुभवाने लिहिल्या आहेत
आणि सर्वात महत्त्वाचे .... बाल सुलभ कुतुहल जागे ठेवणे अन मस्त राहणे

अक्षय कुमारचे अनुकरण करावे - लेट नाईट पार्टीज् टाळतो, रात्री ९ ला झोपतो, पहाटे ४ ला उठतो.
>>>>
कित्येक लोकं रात्री ९ वाजता कामावरून घरी परत येत असतील Sad

आज आपली जीवनशैली खरेच आरोग्याच्या आधारावर योग्य आहे.

या वाक्यापुढे "का?" राहिले बहुतेक.

नंतर लिहितो.

आधीच्या धाग्यावर सुचवल्याप्रमाणे पुन्हा एकदा नोंदवतो.
डॉ. अभय बंग लिखित "माझा साक्षात्कारी हृदयरोग " या पुस्तकातील जीवनशैली संबंधी प्रकरणं वाचण्यासारखी आहेत. अद्याप वाचलेले नसल्यास नक्की घेऊन वाचावे असे आहे.

जालावर थोडक्यात वाचण्यासाठी ही लिंक उपयुक्त वाटली. अर्थात गुगळल्यावर लाखो मिळतील.
http://www.ideafit.com/fitness-library/holistic-approach-health

तरुण वयात आणि ठराविक वयापर्यंत धकाधकीच्या जीवन शैलीचा, चुकीच्या आहाराचा विशेष परिणाम जाणवत नसावा. जाणवू लागेल तेव्हा बघु असे बरेच लोक म्हणतात. म्हणजे जाणवायला लागले तेव्हा अनिष्ट परिणामाची सुरवात होते आहे, तेव्हा लगेच बदल करुन असे परिणाम टाळता येतील असे विचार असतील. पण जेव्हा हे परिणाम दिसायला लागतात तेव्हा उशीर झालेला असू शकतो. अभय बंग यांच्या की अजून कोणाच्या पुस्तकात वाचण्यात आले की कधी अचानक जेव्हा उच्च रक्तचाप अथवा हृदय विकाराची सुरवात, हायपरलिपिडेमियासुद्धा इत्यादि तक्रारी उद्भवतात म्हणजे कळतात तेव्हा अशा रोगांची सुरवात बहुतेक वेळा कित्यके वर्षे आधी झालेली असते. म्हणजे काही झालं पुढे तर तेव्हा बघु हे म्हणणे उचित नाही.

जीभेला चटकदार म्हणा की जे काय आवडतं तेच नेहमी खाणं, म्हणजे काही गोष्टींचा अतिरेक आणि काही गोष्टी आवश्यक असुनही कमी / क्वचितच खाल्या जाणे अशा असंतुलीत आहाराने परिणाम होत असणारच.
तसेच कामाच्या स्वरुपानुसार आणि शहरातील धकाधकी याने सतत मानसीक ताण, शिणवा याने सुद्धा परिणाम होत असणारच.
बैठे काम, शरिराची कमी हालचाल, वेळी अवेळी खाणे वगैरे यावर अधिक लिहायला नकोच.

तेव्हा जीवनशैलीत बदल हा नक्कीच खुप फायद्याचा आहे - नियमित व्यायाम, संतुलीत आहार, खाण्याच्या वेळा पाळणे, विनाकारण जागरण टाळणे, व्यवस्थित झोप, मनशांतीचे उपाय करणे (ध्यान, योगनिद्रा, विरंगुळा इत्यादि).

अभय बंग यांचे ते पुस्तक मी वाचले आहे (बहुतेक विकत घेऊनच वाचलय....आता प्रत सापडणार नाही याची खात्री..... Sad )

धन्यवाद रेव्यू, कापोचे, विट्ठल, मानव , लिंबू, .ऋन्मेऽऽष .:)

हो शारिरीक व मानसिक या दोन्ही आघाड्यावर शांतता , समाधान आवश्यक आहेच. शारिरीक व्यायाम , सोबत मानसिक व्यायाम ( जसे साधना, ध्यान इ. ) या सर्वच बाबींचा विचार व्हायला हवा. सूर्यनमस्कार जरी रोज घातले ना तरी सर्वांगसुंदर व्यायाम होईल. डॉ. उनकुले यांचे खास सूर्य नमस्कारावर पुस्तक आहे एक..

@ रेव्यु....जीवनाकडून, आप्तेष्टांकडून फारश्या अपेक्षा न ठेवणे.
आपली सौंदर्य स्थाने स्वतः ओळ्खण्याचा जाणीव पूर्वक प्रयत्न करणे
मी वरील गोष्टी स्वानुभवाने लिहिल्या आहेत
आणि सर्वात महत्त्वाचे .... बाल सुलभ कुतुहल जागे ठेवणे अन मस्त राहणे >>>> हे फार भावले..अतिशय समर्पक

@ कापोचे..हो अतिशय सुरेख पुस्तक आहे ते. खरेतर आजच्या आपल्या जीवनशैलीत बदल करायला त्याचा नक्कीच उपयोग होईल.
@ मानव .. जीवनशैलीत बदल हा नक्कीच खुप फायद्याचा आहे - नियमित व्यायाम, संतुलीत आहार, खाण्याच्या वेळा पाळणे, विनाकारण जागरण टाळणे, व्यवस्थित झोप, मनशांतीचे उपाय करणे (ध्यान, योगनिद्रा, विरंगुळा इत्यादि)>>>>>> १०० % अनुमोदन..

लिंबू , विठ्ठल खरेच ते पुस्तक संग्रही असावे व अनुसरण करावे असे आहे.

चांगला विषय असलेला धागा व प्रतिक्रिया पण चांगल्या आहेत,

हे माझ्या वैयक्तिक नोट्स मधून.......

निरोगी शरीरासाठी:
१. नियमित व्यायाम करा
२. नेहमी सकस आहार घ्या. भरपूर नाश्ता, मध्यम लंच, आणि कमी डीनर अशी खाण्याची सवय उत्तम. महत्वाचे: वेळेवर खात जा. जंक फूड शक्यतो टाळा.
३. भरपूर झोप घ्या (चोवीस तासात कमीत कमी सात तास झोप हवीच), भरपूर पाणी प्या (दिवसभरात कमीत कमी तीन लिटर)
४. दररोज पोट साफ करण्याची सवय लावा. सकाळी उठल्या उठल्या सर्वात प्रथम अर्धा लिटर कोमट-गरम पाणी पिल्यास पोट साफ व्हायला मदत होते (स्वानुभव). तसेही, सकाळी पाणी पिणे हे अनेक दृष्टीने आरोग्यदायी असते.

निरोगी मनासाठी:
१. सतत कार्यमग्न रहा (शरीरासाठी जसा व्यायाम तसे मनासाठी काम महत्वाचे)
२. मैत्रीभाव, कष्टाळू वृत्ती, प्रामाणिकपणा, खिलाडूवृत्ती, हास्यविनोद करण्याची वृत्ती, निरपेक्ष मदत करण्याची वृत्ती हे सदगुण म्हणजे निरोगी मनासाठी उत्तम आहार.
३. केवळ कामातच सगळे आयुष्य घालवणे हे पण चुकीचे. आयुष्यातील आनंद घेण्यासाठी पण वेळ खर्च कराच.
४. जसे शरीरासाठी पोट साफ करून "कालचे खाल्लेले" शरीराबाहेर टाकणे महत्वाचे तसे "कालचे घडलेले" मनाबाहेर टाकणे तितकेच महत्वाचे. नेहमी "आज"मध्ये जगत रहा. कोणाविषयी किंवा कशाविषयी कधीच पूर्वग्रह बाळगू नका.

शेवटी: आपण कमवलेल्या भौतिक वस्तूंची (पैसे, घर, बंगला, गाडी इत्यादी) कधीच प्रौढी मिरवू नका. या गोष्टी एका क्षणात नाहीशा होऊ शकतात. पण कमवलेली माणसे, सचोटी, निरपेक्ष मदत करण्याची वृत्ती, प्रयत्नांवरील विश्वास याच गोष्टी अखेर कामी येतात. त्यांचा अभिमान जरूर बाळगा व या गोष्टींना कधीही अंतर देऊ नका. (ज्यांनी "एअर लिफ्ट" पहिला आहे त्यांना या वाक्याचे महत्व लगेच कळेल)

Happy अतुल पाटील..अगदी समर्पक आणि योग्य शब्दात मांडले तुम्ही. खरच..मानसिक आणि शारिरीक शुध्दता आणि त्यासाठी काही गोष्टी कटाक्षाने पाळणे महत्त्वाचे..

जसे शरीरासाठी पोट साफ करून "कालचे खाल्लेले" शरीराबाहेर टाकणे महत्वाचे तसे "कालचे घडलेले" मनाबाहेर टाकणे तितकेच महत्वाचे. नेहमी "आज"मध्ये जगत रहा. कोणाविषयी किंवा कशाविषयी कधीच पूर्वग्रह बाळगू नका.

पण कमवलेली माणसे, सचोटी, निरपेक्ष मदत करण्याची वृत्ती, प्रयत्नांवरील विश्वास याच गोष्टी अखेर कामी येतात. त्यांचा अभिमान जरूर बाळगा व या गोष्टींना कधीही अंतर देऊ नका.>>>>>>> या दोन्ही विचारांना + १००...खूप सुरेख विवेचन..:)

जीवनशैलीचा विचार करायला गेलो तर आहार , विहार, आचार असे अनेक भाग येतील. आहाराचाच विचार करावयाचा झाला तर त्यात ऋतुचर्या..प्रत्येक ऋतुमानाप्रमाणे आहार शैली असावी. कारण प्रत्येक हवामानात योग्य अपायकारक अशा प्रकारे पदार्थाचे वर्गीकरण आपल्या आयुर्वेदाच्यामध्ये केले गेले आहे. वर सगळ्यांनी अतिशय समर्पक पद्धतीने सुचवले आहे. खाणे, खाण्याच्या वेळा हे मात्र अगदी पाळायलाच हवे असे मला वाटते. सकाळी न्याहारी भरभक्कम असावी. असा मला डॉ. सल्ला दिला. त्यांनी मला अहाराचा एक तक्ता पण करून दिला. त्या नुसार सकाळी रोजची आन्हिके झाल्यावर प्रथम पाणी पिणे..नंतर योग करणे, सूर्यनमस्कार करणेच करणे. नतर थोड्या काळाने दूध , काही सुकी फळे जसे अंजीर, बदाम, अक्रोड इ दिलेल्या प्रमाणात घ्यायचे. साधारण 9 – 9.30 दरम्यान पोटभर ब्रेकफास्ट करावा ज्यात उपमा, उकड इ पदार्थ असावे असे सुचवलेले.
साधारण 12 ते 1 दररम्यान आपले दुपारचे जेवण असावे त्यात पालेभाजी, डाळ, सॅलड , असावेच..साधार्ण चार च्या दरम्यान फळे, फुटाणे असे पदार्थ खावे..आणि रात्रीचे जेवण मात्र शक्यतो 8 – 8.30 पर्यंत घ्यावे. जेवण हलके असावे जसे सुप, कढण, पुर्णान्न खिचडी इ.
मी हा प्रयोग केला अन खरोखर मला बराच फायदा झाला. अर्थात ऋतुमानानुसार जेवणात बरेच पदार्थ वर्ज्य करावे लागतात. त्याचा आपण सखोल पणे विचार करायला हवा. Happy

आता यात अनेक प्रकारे तुम्ही भर घालू शकाल. कारण प्रत्येकाचे अनुभव अधिक चांगले असतील. मते अभ्यासु असतील. या साध्या सोप्या आहारचर्येत आपण भर घालावी ही विनंती . खूप काळाच्या आड गेलेले पदार्थ आहेत जे खरेच सकस, आणि आरोग्यपूर्ण होते ते सुचवाल अशी अपेक्षा आहे. तुमच्या अशाच सकारात्मक प्रतिक्रियांच्या अपेक्षेत. ..:)

@अन्जू@, @स्मिता२०१६: धन्यवाद. हो आहाराविषयी मलासुद्धा जाणून घ्यायचे आहे.

अतुल पाटील..हो खरतर आपल्या जगण्यातला मुख्य गरज अन्न ही आहे. आणि योग्य आहार आणि योग्य वेळी आहार या गोष्टी खरतर खूप मॅटर करतात. उलट अतिशय महत्त्वाचा भाग आहे योग्य आहार आणि योग्य वेळ

आताचे पहा म्हणजे हे मला वाचनातून आणि डॉक्टरांच्या सल्ल्यातून मिलाळेय. सध्या वसंत ॠतु..( बरोबर ना..मला अजुन फारसे नीटसे कळत नाही यातील )

पचनास हलके पदार्थ खावेत. मूग, तांदळाचे पदार्थ
आहारात ताक व दुधाचा वापर असावा
पालेभाज्याचे सूप प्यावे
आले आणि मध घ्यावे
पाणी अधिक प्यावे
अतिथंड पदार्थ टाळावे.

दिनचर्ये मध्ये
योगासने
फिरणे
मालिश, कोमट पाण्याने अंघोळ
दुपारी झोप टाळावी.
आता हे मला डॉक्टरांनी सांगीतलेले..यात अजुनही तज्ञ व्यक्ती भर घालू शकतील. अजुन काही वाचायला मिळावेत.जाणुन घ्यायला आवडेल. Happy