अमेरिका प्रवासासाठी आरोग्य विमा - Visitor Insurance in US

Submitted by webmaster on 8 February, 2017 - 14:25

अमेरिकेत प्रवास करणार्‍यांसाठी लागणारा आरोग्य विमा
Visitor Insurance in US
या अगोदरची चर्चा इथे पाहता येईल.

http://www.maayboli.com/node/5874

http://www.maayboli.com/hitguj/messages/103388/1529.html?1210878246

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आम्ही नेहमी व्हिजिटर्स कवरेज / इन्शु बाय वरून घेतो. पण म्हटलं विचारावं काही नविन ऑप्शन आहेत का ?
आई बाबांच्या वयाच्या लोकांना काही ना काही प्रि एक्झिस्टिंग कंडिशन्स असतातच आणि त्या असल्या की कव्हरेज काही धड नसतं. नुस्ता मनाच्या समाधानासाठी समजायचा तो इन्शुरन्स.

@ राया, मैत्रेयी
खरे आहे. हा इन्शुरन्स केवळ मनाचे समाधान म्हणुन. सुदैवाने मला अजून तरी माझ्या वा बायकोच्या आई-वडिलांना इथे दवाखान्यात घेउन जायला लागले नाहिये. सासु-सासरे दोघेही डायबेटिक आहेत. त्यामुळे बहुतेक काहिही झाले तरी ते प्रि-एक्झिस्टिंग खाली येईल Sad
सासरे ७०+ असल्याने कॉम्प्रिहेन्सिव फारच महाग पडतो.
तुम्ही लोकं कॉम्प्रीहेन्सिव घेता की लिमिटेड कवरेज?

ट्रॅव्हलर इन्शुरन्स मधे काँप्रेहेन्सिव्ह असा पर्यायच मला अजून दिसला नाही. आम्ही बरीच वर्षे आयसीआय लोम्बार्डचा घेत होतो, कारण त्यांच्या फाइन प्रिन्ट मधे emergency treatment for pre-existing conditions कव्हर्ड असायचे. ते आता काढून टाकले आहे. त्यामुळे नंतर एकदा इन्शुबाय वरून इथलाच एक घेतला होता.

मी पण प्रि एग्जिस्टिंग कंडिशन्स कवर्ड आहे असा बघूनच घेतला इन्शुरन्स. भारतातून इन्शुरन्स घेणे मी रेकमेंड करणार नाही कारण ओळखीच्यांमध्ये एकाना खुप त्रास झाला क्लेम फाईल करुन पैसे मिळवायला की काहीतरी.
मी इथून घेतला होता. वापरला तर नाही सुदैवाने त्यामुळे बाकी काही सांगू शकत नाही. कोणाला चांगले /वाईट अनुभव असतील तर सांगा कृपया.
https://purchase.imglobal.com/Quote/Patriot_Platinum/pre-quote

www.kvrao.org/
हाही इन्शुरन्स प्रि एक्झिस्टिंग कंडिशन्स अ‍ॅक्सेप्ट करतो असे लिहिले आहे. थोडा महाग आहे अर्थात .
कुणी हा वापरला असेल / माहिती / अनुभव असतील तर लिहा!

बुवांनी दिलेला तसेच केवीराव फारच महाग इन्शुरन्स आहेत. पण कॉम्प्री आहेत. ५००० डिडक्टिबलला १५०० प्रिमियम पडतोय ७०+ वय असेल तर Sad
केवीराव तर ४/५००० मध्येच बोलतो एकदम