आरोग्य

चिकुन्गुनिया सद्रुश नवीन विषाणुजन्य आजार

Submitted by स्मिता श्रीपाद on 10 October, 2016 - 01:31

गेल्या काही महिन्यांपासुन पुण्यात चिकुन्गुनिया सदृश एक नवीनच प्रकारचा विषाणुजन्य आजार पसरला आहे.
माझ्या माहितीतल्या घरटी एकातरी व्यक्तीस हा आजार झालेला मी ऐकला/पाहिला.
याची लक्शणे साधारण खालील प्रमाणे असतात :

- थंडी वाजुन अतिशय तीव्र स्वरुपाचा ताप येणे ( १०२ ते १०४ )
- सांधे,स्नायु दुखणे
- ताप उतरला की ३-४ दिवसांनी अंगावर रॅशेस येणे
- क्वचित जुलाब्/उलटी असा त्रास

ताप १-२ दिवसात कमी होतो. पण थकवा बराच राहातो.
डेंगु आणि चिकुन्गुनिया दोन्हीच्या टेस्ट निगेटीव्ह येतात.पण प्लेटलेटस काही प्रमाणात कमी होतात.

विषय: 

कानाचे ओपरेशन (stapedectomy) Be careful

Submitted by deshmukh_v on 3 October, 2016 - 14:20

वय: ३५
लिंग: पुरुष
व्यवसाय:

मला मागच्या २-३ वर्षापासुन कमी ऐकु येत होते. डॉक्टरनी ऑडिओमेट्री टेस्ट करून सांगितले कि stapedectomy करावी लागेल.
आणखी 1 var

विषय: 

वजन कमी करताना/आरोग्याची काळजी घेताना

Submitted by सई केसकर on 28 September, 2016 - 13:19

मागच्या काही लेखांमध्ये मी कार्ब्स, त्यांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम आणि इंटरमिटंट फास्टिंग बद्दल लिहिलं होतं. ते लेख वाचून आलेल्या कॉमेंट्स आणि इमेल वाचून मला हा पुढचा फॉलोअप लेख लिहावासा वाटला. वजन कमी करताना काही प्रॅक्टिकल गोष्टी खूप उपयोगी पडतात. कारण हा खूप दूरचा प्रवास असतो आणि कधी कधी मानसिक बळ खचून जातं. काही सध्या गोष्टी पाळल्या तर हा प्रवास तितका बोचरा वाटत नाही.

१. तुम्हाला वजन कमी करायचे आहे का?

विषय: 
शब्दखुणा: 

सायकॉलॉजिकल काउंसेलर्स

Submitted by मी अमि on 26 September, 2016 - 08:25

दादर माटुंगा बांद्रा माहिम या परिसरातील समुपदेशकांबद्दल माहिती हवी आहे. जवळच्या नात्यातील एका व्यक्तीला डिप्रेशन सिंड्रोम्स दिसत आहेत. कृपया कोणाला एखाद्या चांगल्या समुपदेशकाबद्दल माहिती असल्यास सांगा. धन्यवाद.

इंटरमिटन्ट फास्टिंग/ अनुसूचित लंघन

Submitted by सई केसकर on 26 September, 2016 - 06:55

एप्रिल २०१६ पासून मी १० किलो वजन कमी केले. वजनाशी माझं जन्मो जन्मी चे (कटू) नातं आहे. आणि प्रसूती नंतर बायकांना दिवस रात्र भेडसावणारा हा एक महत्वाचा विषय आहे. त्यामुळे त्याबद्दल लिहून कदाचित बाकीच्यांना मदत होईल असं वाटल . गेल्या दहा वर्षांत सतत व्यायाम आणि त्या वेळी जो योग्य आहार सांगितला जायचा, तो घेऊन मी वजन वाढीशी लढा देत होते. पण गर्भधारणे पूर्वीचा हा सगळा लढा माझ्या मनात फक्त माझ्या दिसण्याबद्दल होता. त्यामुळे त्याचे गांभीर्य मला फारसे कळले नव्हते. इथे आधी हे सांगायला हवं की कित्येक लठ्ठ व्यक्ती कुठल्याही प्रकारची शारीरिक व्याधी न होता अतिशय चांगले आरोग्य जगत असतात.

विषय: 

पेरिओडाँटिस्ट चे नाव सुचवा

Submitted by नलिनी on 23 September, 2016 - 11:19

मुंबईत किंवा पुण्यात तुमच्या ओळखीचे कींवा माहितीतले (चांगले) पेरिओडाँटिस्ट सुचवा.

विषय: 

साखर संघर्ष :भाग २

Submitted by सई केसकर on 21 September, 2016 - 12:53

साखरेचे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल लिहिता लिहिता मला २०१० साली मी वाचलेल्या एका पुस्तकाची आठवण झाली. हे पुस्तक म्हणजे (कु)प्रसिद्ध अमेरिकन लेखिका एलिझाबेथ ॲबट यांचे शुगर: ए बिटरस्वीट हिस्ट्री. ॲबट यांचे 'हिंदू' नावाचे पुस्तक भारतात खूप वादग्रस्त ठरले होते. पण साखरेवरचे हे संशोधन वाचून तरी त्यांच्याबद्दल मला आदरच वाटला होता. साखरेचा शरीरावरील परिणाम जसा कटू आहे, तसं तिचं जगात प्रस्थापित झालेलं वर्चस्वदेखील कडवट आहे.

विषय: 

साखर संघर्ष :भाग १

Submitted by सई केसकर on 21 September, 2016 - 06:35

एखादी व्यक्ती लठ्ठ आहे असं दिसलं की न मागितलेले अनेक सल्ले तिच्याकडे फेकण्यास सुरुवात होते. लठ्ठ माणूस काहीतरी चूक करतो आहे, त्याचा त्याच्या जिभेवर ताबा नाही, आणि त्यांनी आपल्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा ओढवून घेतला आहे, हे बारीक असलेल्या किंवा राहणाऱ्या लोकांचंच नव्हे तर कधी कधी डॉक्टरचं सुद्धा म्हणणं असतं. लठ्ठपणामुळे डायबेटीस, उच्च रक्तदाब, ह्रिदयविकार असे अनेक रोग होतात हे विधान सर्रास केले जाते. आणि त्याचा दोष हा आत्तापर्यंत मेद जास्त असलेल्या (तूप,तेल,मांसाहार, अंडी) खाद्य पदार्थांना दिला जायचा. गणित अगदी सोपं होतं. ज्या खाद्यपदार्थात मेद आहे त्यानेच मेद वाढते.

विषय: 

ह्युमन क्लोनिंग

Submitted by उडन खटोला on 16 September, 2016 - 12:47

(मूळ लेखक झपाटलेला फिलॉसॉफर,यांच्या पूर्वपरवानगीने इथे प्रकाशित )

काही दिवसापूर्वी क्लोजर टू गॉड हा हॉलीवूडपट पाहिला . आणि मनात विचारशॄन्खला सुरू झाली ...
http://www.imdb.com/title/tt3457486/

विषय: 

पुस्तक सुचवा

Submitted by वेल on 14 September, 2016 - 10:17

माझ्या वहिनीला तिच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ नातेवाईकांना पुस्तके द्यायची आहेत. तिचे वडिल कॅन्सर सरव्हायवर होते. कॅन्सर अथवा तत्सम जीवघेण्या समजल्या जाणार्‍या आजारांतूनही पॉझिटिव्हली बाहेर आलेल्यांचे चरित्र असे काही पुस्तक द्यावे असा विचार आहे.

डॉ. अभय बंगांचे "माझा साक्षात्कारी हृदयरोग" हे तशाप्रकारचे एक पुस्तक.
डॉ. मनोज भाटवडेकरांचे एक पुस्तक आहे, ते आर्थायटीसच्या त्रासातून कसे बाहेर पडले. (नाव आठवत नाही. कोणाला माहित असल्यास सांगा.)

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - आरोग्य