लेखन

Black and White

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

'नील'... जॉन जवळ-जवळ धावतच नीलच्या अॉफिसमध्ये शिरणार तेवढ्यात त्याला लक्षात आलं की अॉफिसचा दरवाजा अोढून घेतलेला होता. दार उघडून जॉन आत शिरला आणि क्षणभर त्याला काही सुचेनासं झालं - इतकं की आपण नीलकडे का आलो ते सुद्धा तो विसरायच्या बेतात होता. समोरचं दृश्य पाहून त्याला हसावं की वैतागावं हेही कळेना... अॉफिसमधल्या मोठ्ठ्या मॉनिटर वॉलवर एरवी जेम्स वेब किंवा चंद्रा दुर्बिणीवरुन येणारं चित्र आणि जवळच भल्यामोठ्या व्हाईटबोर्डवर मोठ-मोठी समीकरणं यात हरवलेला नील हे नेहमीचं दृश्य.

विषय: 
प्रकार: 

एवेएठि मे २०१२

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

थोबाडपुस्तकाचे रोखे बाजार येऊन त्यावर नवीन खटले सुरू झाले तरी एवेएठिचा वॄत्तांत नाही या घटनेवर काही बाराकरांनी, त्यातून काही हजर असलेल्यानी, आणि बहुतेक एवेएठिचा काहीच संबंध नसलेल्यानी चर्चा करायला सुरूवात केली असून, वृत्तांतच नाही तर 'त्याला साधे गटग म्हणावे, एवेएठिचा दर्जा कशाला?' असा नाराजीचा सूर लावला आहे, अशी खात्रीलायक बातमी हाती आली आहे.

प्रकार: 

इंटरनेटचं व्यसन : आता सगळं ठीक आहे..

Submitted by असो on 16 May, 2012 - 04:34

याआधी मी एक प्रश्न विचारला होता " इंटरनेट हे व्यसन आहे का ?"

सिनेमा सिनेमा- वक्त

Submitted by शर्मिला फडके on 10 May, 2012 - 16:09

वक्त- ’साठ’वण सिनेमांची

पन्नासच्या दशकातल्या दो बिघा जमीन, कागझ के फ़ूल, मदर इंडिया, देवदास इत्यादी गाजलेल्या सिनेमांनी त्या दशकाच्या चेहर्‍यावर ’सिरियस’ ठसा उमटवला. कदाचित हे गांभीर्य जरा अतीच झालं म्हणूनही असेल, पण त्याच्या पुढच्या दशकाने आपला पूर्ण मेकओव्हरच करुन टाकला. सिनेमांमधे रंग आले आणि त्या रंगांचा उत्फ़ुल्लपणा अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकारांच्या कामगिरीत आपसुक उतरला.

सिनेमा सिनेमा- पाकिझा

Submitted by शर्मिला फडके on 5 May, 2012 - 15:01

पाकिझा- साहेबजानचा प्रवास.

पाकिझा म्हणजे मीना कुमारी.
पाकिझा म्हणजे ते स्वप्न जे साकार करायला कमाल अमरोही चौदा वर्ष धडपडत होता.
पाकिझा म्हणजे अस्तंगत गेलेलं ते युग ज्यात काव्यात्मकता, तरलता, रोमॅन्टिसिझम आणि काही प्रमाणात भाबडीही वाटू शकणारी सामाजिकता हा सिनमांचा मुख्य गाभा होता.
पाकिझा म्हणजे लता मंगेशकर या गानसम्राज्ञीची अवीट गोडीची गाणी आणि गुलाम महंमद या दुर्लक्षित गुणी संगीतकाराचा अप्रतिम स्वरसाज.
पाकिझा म्हणजे तवायफ़-कलावंतिणींच्या बदनाम दुनियेचं करुण-राजस रुप.
पाकिझा म्हणजे मीना कुमारीच्या अभिनय कारकिर्दीला आणि तिच्या आयुष्यालाही मिळालेला पूर्णविराम.

शब्दखुणा: 

कॅम्पातल्या (अर्थात पुणे कॅन्टॉन्मेन्ट एरीआच्या) आठवणी !

Submitted by दीपांजली on 5 May, 2012 - 03:29

कॅम्प अर्थात पुणे कॅटोन्मेन्ट एरीआ:
पुण्यातला माझा अतिशय लाडका भाग आणि अनेक सुंदर आठवणींनी भरलेला !
पहिल्यांदा कॅम्प ला गेले ते आई बाबां बरोबर साधारण पाचवी किंवा सहावीत असताना.. अगदी वेगळ्याच दुनियेत गेल्या सारखं वाटलं होतं.. वेगळीच लोकं, वेगळीच दुकानं , सगळं वेगळच वातावरण, ख्रिसमस म्हणून आई बाबांनी कॅम्प मधे नेलं.. नंतर 'सुप्रिया' मधे जेवायला आणि आईच्या आव्डत्या 'निड्ल वुमन' दुकानात , ते माझं पहिलं कॅम्प दर्शन !
त्या नंतर आई बाबां बरोबर जेंव्हा जेंव्हा गेले ते ख्रिसमस च्या वेळी किंवा वेस्टएन्ड ला सिनेमा पहायला !

विषय: 

अो चाँद जहाँ वो जाये...

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

दोन बहिणी... खरं तर चार; पण याच दोघींवर सगळ्यांच प्रेम आणि लक्ष केंद्रित होतं. अर्थात त्याला कारणंही अनेक आहेत, पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यासारखं या जगात कोणी नाही... याआधी झालं नाही आणि पुढचं कोणी पाहिलंय? मजा म्हणजे त्या दोघींमध्येही फारसं साम्य नाही. दोघींची गाण्याची जात निराळी, अदा निराळी, पेशकारी निराळी; इतकंच काय, पण दोघींच्या आवाजातला दर्दही निराळा...

प्रकार: 

रेखाचित्रांसाठी मदत हवी आहे

Submitted by साजिरा on 24 April, 2012 - 06:39

माझ्या एका (वैयक्तिक) कामामध्ये काही रेखाचित्रे लागणार आहेत. आधीच केलेल्या कॉपीरायटिंगला अनुसरून चित्रे- असं त्याचं साधारण स्वरूप आहे. या कामात आपल्यापैकी कोण आणि कशी मदत करू शकेल? (हे काम जाहिरात क्षेत्रातलं नाही.)

स्केचेस शक्यतो कृष्णधवल असतील. पेन्सिल स्केचेसही चालतील. मला हवी असलेली स्केचेस कशी असावीत याचा विचार केल्यावर प्रकाश संतांच्या पुस्तकांतली स्केचेस नजरेसमोर आली. पण अगदी 'तशीच' असणं आवश्यक नाही, हे आहेच.

देव

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

एकदा स्वप्नात देव आला
जागेपणी आमची भेट होण्याची तशी शक्यता नाहीच
खरं तर मी अोळखलंच नाही,
तेव्हा त्यानीच आपली अोळख करुन दिली
थोडं अवघडुन मी म्हटलं, सॉरी हं, मी अोळखलं नाही
आपली कधी भेटही नाही झाली आणि परिचयही नाही
तो नुसताच हसला
घरी आलेल्या पाहुण्याला म्हणावं तसं म्हटलं,
बसा की, मी पाणी घेऊन येते
पाणी घेऊन गेले तर तो इकडे-तिकडे बघत होता - उभ्याउभ्याच
विचारलं, काय झालं?
म्हणाला, भेट झाली नाही, परिचय नाही म्हणालीस,
पण स्वयंपाकघरातच छोटंसं देवघर केलंयस,
गणपती-देवीच्या मूर्ती-वॉल हॅंगिंग-घड्याळंही दिसताहेत.

एक क्षण मी गडबडलेच,
मग सावरुन म्हटलं

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - लेखन