लेखन
सुहृद - भाग ३
********** तसच आपल्या काय अपे़क्षा आहेत, याचा जरा अंदाज आला असता तर....."
बागेत जाता जाता जाई हळूच सुनिताकडे पाहून पुटपुटली, "तू जाऊ नकोस हं कुठे, आमच्या बरोबरच थांब..."
सुनिताने जाईकडे बघत डोळे मोठ्ठे केले!! तिला जाम हसू यायला लागल होतं, कसबस गंभीर राहण्याचा प्रयत्न करत ती जाईला हळू आवाजात म्हणाली, "चक्रमच आहेस!! मी काय करू तिथे?? कबाबमें हड्डी! अनिकेत काय खातोय का तुला??"
"अग पण... अस काय ग... थांब ना..."
"गप ग...!! अनिकेत मारेल मला!! वेडी आहेस का तू?? मी आहे पलीकडेच..... तू बोलून घे, काय? कळल नं?"
सुहृद - भाग २
************ आज प्रत्यक्ष भेट होणार होती......
ठीक साडेचार वाजता, अप्पा आणि सुनिता दिक्षितांकडे आले.अनिकेत आणि त्याचे आई वडिल येणार, तेह्वा दोन्ही कुटुंबाना ओळखणारे म्हणून अप्पांनी आपल्या घरी त्यावेळी हजर रहाव, अशी दिक्षितांनी विनंती केली होती, त्याप्रमाणे अप्पा आले होते. काही हाताखाली मदत लागली तर, म्हणून सुनिताही आली होती.
"येऊ का सर?? वैनी?? झाली का तयारी सगळी?? सुनिता बेटा, तू जा जाई काय करतेय बघ बर..." अप्पांनी सुनिताला जाईकडे पिटाळल.... "सर, वैनी, कसलीही काळजी नको!! सगळ छान होणार बघा..."
सुहृद -भाग १
पहिल्यांदाच कथा लिहायचा प्रयत्न करतेय, पाहू कितपत जमतय!! गाजराची पुंगी, वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली!!
**************************************************************
दीक्षित मास्तरांच्या घरी जरा लगबग सुरु होती. आज त्यांच्या लेकीला, जाईला, बघायला येणार होते. घरात सर्वात जास्त अस्वस्थ मास्तरच होते! खर तर, त्यांच्याच शेजारी रहात असलेल्या कुलकर्ण्यांनी हे स्थळ आणल होत, म्हणजे तस माहितीच असणार होत…
डोझम्माचे बारसे
आई
आणि मी
अर्पण
थोडंसं काहीतरी लिहावं..
कट्टा
Pages
