2280 साल उजाडले तोपर्यंत, मानवाने विज्ञानाच्या मदतीने अनेक अभूतपूर्व असे शोध लावले होते. अर्थात त्यात रोबोटची पण मदत होतीच. त्यापैकी एक म्हणजे "लुनार बेस अल्फा". चंद्रावर स्थायिक होण्यासाठी, तिथे घरे बांधण्यासाठी आणि तिथला संपूर्ण आणि सविस्तर अभ्यास करण्यासाठी मानवाने हा बेस चंद्रावर स्थापन केला होता. अनेक रोबोट्स या बेसवर वैज्ञानिक आणि तांत्रिक कामं करत होते. या सर्वांमध्ये 'ओरिक्स' नावाचा "अल्ट्रा एआय" या तंत्रज्ञानाने बनलेला (संपूर्ण विकसित झालेली कृत्रिम बुद्धिमत्ता) ह्यूमनॉईड रोबोट होता ज्याच्यात मानवांप्रमाणे भाव भावना आणि विचार कटण्याची शक्ती होती.
एका कथेवर ऋन्मेष सरांचा खालील प्रतिसाद आहे.
"कित्येक संकल्पना विज्ञानाने सिद्ध झाल्या नाहीत तरी त्यावर लिहिलेल्या कथा विज्ञानकथा म्हणूनच धरल्या जातात असे मला वाटते. मग त्या परग्रहवासींबद्दल असोत वा टाईम ट्रॅव्हेलबद्दल. या कथेतील शरीर गायब होणे भूतखेतांसारखे न दाखवता मांडणी विज्ञानकथेसारखीच केली आहे असे या भागावरून वाटले म्हणून तसे म्हटले".
जो माणूस झोपलेला असतो त्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान त्याच्या कुशीत झोपलेले असते. जो माणूस आळस झटकून उभा राहतो त्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान उभे रहाते. जो माणूस चालत असतो त्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान त्याच्या बरोबर चालत रहाते. जो माणूस पळत असतो त्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान त्याच्या पाठोपाठ पळत असते.
-------- इति प्रसिद्ध जपानी तत्वज्ञ मी (१५२४-१५९७)
पृथ्वीवरचा निसर्ग-बिंदू वेगाने आकाशात चालला होता. तो काळोख्या अनंत आकाशात एका अज्ञात ठिकाणी खूप दूरवर पोहोचल्यावर त्यापासून पाच बिंदू वेगळे झाले- पृथ्वी, अग्नी, वायू, पाणी आणि आकाश! ही पंचमहाभूते एका महत्त्वाच्या चर्चेसाठी आणि निर्णय घेण्यासाठी एकत्र आले होते. ते पाचही बिंदू तरंगत होते.
शंभू शेवाळे हा माझा परम मित्र. पुण्यात असतो. मी मुंबईला बँकेत नोकरीला लागलो आणि मध्यमवर्गीय मानसिकतेतून आपला संसार सांभाळायला लागलो. माझी पत्नी घर सांभाळते आणि मला आठ महिन्यांचा मुलगा आहे. शंभू लहानपणापासून संशोधक वृत्तीचा. त्या वृत्तीमुळेच तो आज मोबाईल अॅप्लीकेशन बनवणार्या एका कंपनी चा मालक बनला आहे. अजूनही तो स्वतः अनेक अॅप बनवत असतो.
डॉ. जयंत नारळीकर यांचा 'सूर्याचा प्रकोप' हा विज्ञान कथासंग्रह वाचला.
विज्ञान कथांच्या माध्यमातून, वैज्ञानिक माहिती व संकल्पना हसत खेळत समजावून सांगण्याची त्यांची हतोटी वाखाणण्यासारखी आहे.
उदाहरणार्थ, 'सूर्याचा प्रकोप' ह्या कथेत, 'सोलर कॉन्स्टंट' मध्ये तात्पुरती वाढ होण्याची त्यांनी वर्तविलेली शक्यता व त्याची कारणमीमांसा.