याआधी मी एक प्रश्न विचारला होता " इंटरनेट हे व्यसन आहे का ?"
मला वाटतं हा प्रश्न मला पडला तेव्हाच आपल्याला हे व्यसन लागलंय याची जाणीव झाली होती. सोशल नेटवर्किंग साईटस नको म्हणून मायबोलीवर आलो खरा.. पण मायबोलीमधे तर एखाद्याला व्यसनाधीन करण्याची दहापट क्षमता आहे असं दिसलं. एकतर नेटवर जितक्या मराठी वेबसाईटस आहेत त्यामधे मायबोलीवरचं साहीत्य हे सर्वात जास्त दर्जेदार असतं. मग हळूच आपल्यालाही काही तरी लिहावंसं वाटतं. लिहून झालं कि कोण काय म्हणतंय हे पहायला तासा दोन तासाने यावंसं वाटतं. मग इतरांच्या धाग्यावर प्रतिक्रिया. या प्रतिक्रियेवर देखील काही प्रतिक्रिया आलीय का हे पहावंसं वाटतं. हळूहळू हे चक्र मेंदूच्या एका भागात फिरू लागतं आणि आपण व्यसनाधीन होतो. म्हणूनच अगदी कमी लिहायचं ठरवलं. पण असं करून चालत नाही. भांडणाच्या धाग्यात जसं जोपर्यंत तुमची पोस्ट तिथं नाही तोपर्यंत तुमचे कपडे पांढरेशुभ्र राहतात तसंच हे व्यसन सुटण्यासाठी एकही पोस्ट न लिहीता अनेक दिवस काढण्याचा सराव करावा लागतो. ( हे किती अवघड आहे हे एखादा अट्टल दारूबाज सांगू शकेल ).
पण एक आहे मित्रांनो, इच्छा प्रबळ होती आणि त्या जोरावर हे निभावून नेलं. ठरलेल्या वेळेवर चहा मिळाला नाही कि जसं डोक्याला मुंग्या येतात तसं झालं खरं पण मागे हटलो नाही. आणि काय आश्चर्य...
कित्येक फायदे दिसू लागले.
१. डोळे आणि चेहरा ओढलेला वाटायचा, आता फ्रेश वाटतं.
२. स्नायूंमधे जडपणा आला होता. तो गेला.
३. सकाळी लवकर उठलं तरी मायबोली चालू करायचो, त्या जागी आता पंधरा किमी चालणं होतं.
४. उगाचच ट ला ट जोडत कविता बंद झाल्या. जेव्हां आख्खीच सुचेल तेव्हां पाहू असं ठरवल्यावर एकही पुन्हा माख्या वाटेला गेली नाही. त्यामुळं परतफेडही बंद
५. मुलांशी खेळायला वेळ मिळू लागला. आता त्यांना आईबरोबर बाबाही आवडतो.
६. छोट्या छोट्या सुखांसाठी वेळ मिळू लागला.
७. पेंडींग कामं पूर्ण झाली.
८. सर्व कागदपत्रं नीट लावून झाली. सगळ्या वस्तू आता जागच्या जागी सापडतात. कामावर जायला उशीर होत नाही.
९. कामाचा झपाटा वाढला.
१०. पुन्हा तरूण झालो
११. सर्वात महत्वाचं म्हणजे बायको खूष आहे !
आता हे सांगायला आलो खरा ..परत शून्यापासून सुरूवात होऊ नये म्हणजे मिळवली.
छान
छान
त्या जागी आता पंधरा किमी
त्या जागी आता पंधरा किमी चालणं होतं.>>> किती तास लागतात???
झकासराव सकाळी दीड तास
झकासराव
सकाळी दीड तास संध्याकाळी दीड तास. रस्ता एकच आहे .
भावना पोहचल्या...! अगदि
भावना पोहचल्या...!
अगदि बरोबर आहे, इथले बरेचसे आयडी(दुसर्याना सतत तत्वज्ञान सांगणारे) दिवसभर स्वत:च्या कार्यालयाने(ऑफिस) दिलेले काम-धंदे सोडून दिवसभर मायबोली वर पडुन असतात, यांना फुकटात मिळालयन नेट कनेक्शन मग बडवा कळफलक हे अस दिवसभर चालू असते इथे. ह्यालाही व्यसनच म्हणतात, फक्त दुसर्याच्या पैश्याने केलेले.
सकाळी दीड तास संध्याकाळी दीड
सकाळी दीड तास संध्याकाळी दीड तास>> ओक्के.
मला वाटल ५ च्या जागे १५ लिहिलत की काय चुकुन.
सकाळी तीन तास कुठले आपल्याकडे आरोग्यासाठी.
उत्तम सुरु आहे तुमच.

कीप इट अप..
वा, वा अभिनंदन. म्हणजे आता या
वा, वा अभिनंदन.
म्हणजे आता या प्रतिक्रिया पहायलाही, इथे येणं होणार नाही तर !
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/25474
मायबोली १ व्यसन आहे हे खरे
मायबोली १ व्यसन आहे हे खरे आहे !
खरे आहे व्यसन आहे. पण नेट बंद
खरे आहे व्यसन आहे. पण नेट बंद असेल तर मात्र विसरायला येत.
कामे आटोपण हे महत्वाचे आहे. पेंडीग मी ठेवतच नाही.
@मंदार_जोशी: http://www.maayb
@मंदार_जोशी:
http://www.maayboli.com/node/31880
डॉक्टर..मी पण विसरून गेलेलो
डॉक्टर..मी पण विसरून गेलेलो रिक्षा स्टँड. पण त्याचा व्यसनाशी काय संबंध ?
> पण त्याचा व्यसनाशी काय
> पण त्याचा व्यसनाशी काय संबंध ?
ते बहुधा रिक्षाच्या व्यसनासंबंधी बोलत असावेत.
(No subject)
किरण, ते मंजो यांनी लगेच
किरण, ते मंजो यांनी लगेच रिक्षा फिरवली त्यांना होतं हो.