स्केचेस

पुनश्च हरिओम....

Submitted by विशाल कुलकर्णी on 28 April, 2017 - 02:57

खुप वर्षांपुर्वी चित्रकला, स्केचेस करायचो. कामाच्या व्यापात सगळे काही मागे राहून गेले होते. आता बर्‍याच वर्षांनी पुन्हा एकदा पेन हातात घेतलाय.
हो, पेनच. पेन्सिल न वापरता थेट शाई पेन वापरून स्केचेस करावी म्हणतोय. इथे काही खाडाखोड करता येत नसल्याने, मुळातच जपून काम करावे लागते आणि त्यामुळे नेटके आणि नेमकेपणाची सवय लागेल अशी आशा आहे.

रेखाचित्रांसाठी मदत हवी आहे

Submitted by साजिरा on 24 April, 2012 - 06:39

माझ्या एका (वैयक्तिक) कामामध्ये काही रेखाचित्रे लागणार आहेत. आधीच केलेल्या कॉपीरायटिंगला अनुसरून चित्रे- असं त्याचं साधारण स्वरूप आहे. या कामात आपल्यापैकी कोण आणि कशी मदत करू शकेल? (हे काम जाहिरात क्षेत्रातलं नाही.)

स्केचेस शक्यतो कृष्णधवल असतील. पेन्सिल स्केचेसही चालतील. मला हवी असलेली स्केचेस कशी असावीत याचा विचार केल्यावर प्रकाश संतांच्या पुस्तकांतली स्केचेस नजरेसमोर आली. पण अगदी 'तशीच' असणं आवश्यक नाही, हे आहेच.

ग्रॅफाईट आणि रंगीत पेन्सिल्स- सफरचंद

Submitted by वर्षा on 13 June, 2011 - 16:08

रंगीत पेन्सिल्स वापरुन चित्र काढण्याआधी चित्रातील छाया-प्रकाशाचा अंदाज यावा म्हणून आधी ग्रॅफाईट पेन्सिलने सराव केला.
Apple B&W resize-1.jpg

गडद्/फिकट रंगकामाच्या जागा निश्चित झाल्यावर, सफरचंदाचा आकार बदलू नये या हेतूने सफरचंदाची फक्त आउटलाईन ट्रेसिंग पेपरसदृश्य कागद वापरुन ट्रेस केली. त्यानंतर रंगकाम केले.
तरी टिपिकल सफरचंदी रंग करता आला नाही. मूळ चित्रात सफरचंद जास्तच लालभडक (केशरीकडे झुकणारे) आहे. म्हणून मी गुलाबी+लाल अश्या दोन्ही पेन्सिल्स वापरल्या. तरी मला पाहिजे तो रंग जमला नाही. असो. Happy

गुलमोहर: 
Subscribe to RSS - स्केचेस