रंगभूमी

श्रीमती विजया मेहता - तेंडुलकरांची नाटकं

Submitted by चिनूक्स on 10 February, 2010 - 16:01

मी शाळेत होतो तेव्हा तेंडुलकरांच्या पुस्तकांशी ओळख झाली. रातराणी, कोवळी उन्हे, हे सर्व कोठून येते? हे ललित गद्य मी वाचलं होतं. आवडलंही होतं. तेंडुलकरांशी खरी ओळख मात्र जरा नंतर झाली.

श्री. सतीश आळेकर - नाटककार तेंडुलकर

Submitted by चिनूक्स on 1 February, 2010 - 13:23

भारतीय नाट्यसृष्टीला ज्या नाटककारांनी वेगळं वळण दिलं, त्यांत श्री सतीश आळेकर व श्री महेश एलकुंचवार अग्रभागी होते. तेंडुलकरांनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांच्या नाटकाचं कौतुक झालं, ते हे दोन नाटककार.

विषय: 

मुलखा वेगळी माणसं

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

९७ साली नगरला मराठी साहित्य संमेलनाला जायचा योग आला. संमेलनाचे अध्यक्ष होते, ना. सं. इनामदार. संमेलन नगर कॉलेजच्या परिसरात आयोजीत केले असल्याने आणि ना. सं ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध असल्याने, अध्यक्षांची ओळख करून देण्याची जबाबदारी नगर कॉलेजच्याच एका इतिहासाच्या प्राध्यापकांवर सोपवण्यात आली होती.

विषय: 
प्रकार: 

नटश्रेष्ठ भालचंद्र पेंढारकर - झाला अनंत हनुमंत

Submitted by चिनूक्स on 10 January, 2010 - 13:51

१ जानेवारी १९०८ रोजी, वयाच्या अठराव्या वर्षी, संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी ललितकलादर्श नाटकमंडळीची स्थापना केली. संगीत सौभद्र हे या कंपनीचं पहिलं नाटक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. संगीत मदालसा, संगीत दामिनी ही पुढची नाटकंही बरीच गाजली. वन्स मोअर घेत घेत केशवराव अख्खी रात्र प्रेक्षकांना गुंगवून ठेवत. आनंदराव मेस्त्री, बाबुराव पेंटर यांचं नेपथ्यही चर्चेचा विषय झालं होतं. १९१३ साली वीर वामन जोशी यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकात प्रथमच कंपनीनं लाल, मखमली पडदा वापरला. असे अनेक पायंडे कंपनीनं पुढे पाडले, अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले.

श्री. विनय आपटे - मित्राची गोष्ट

Submitted by चिनूक्स on 2 December, 2009 - 11:04

मित्राची गोष्ट या तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकाचं दिग्दर्शन श्री. विनय आपटे यांनी केलं होतं. त्यांच्या दिग्दर्शकीय कारकीर्दीचीच ती सुरूवात होती. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत असंख्य नाटकांचं दिग्दर्शन केलेल्या श्री. विनय आपटे यांना मित्राची गोष्ट हे त्यांच्या कारकीर्दीतलं सर्वांत महत्त्वाचं नाटक वाटतं.

सुप्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते श्री. विनय आपटे यांचं हे मनोगत...

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 

श्री. अवधूत परळकर - तेंडुलकर : जवळून जाणवलेले

Submitted by चिनूक्स on 15 November, 2009 - 17:44

श्री. विजय तेंडुलकर नक्की कसे होते, हा एक अतिशय अवघड प्रश्न. त्यांचं व्यक्तिमत्त्व इतकं बहुपेडी होतं की खरे तेंडुलकर कसे होते, हे समजून घेणं खूप कठीण आहे. नाटककार म्हणून जागतिक ओळख असलेल्या तेंडुलकरांनी चित्रपट, दूरदर्शन मालिका ही माध्यमं लीलया हाताळली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या दृक्-श्राव्य विभागाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. अनेक सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता.

मराठी नाटकातील दुहेरी / विविध भूमिका

Submitted by mangeshminal on 13 November, 2009 - 17:11

'व्हॉटस युअर राशी ?' चित्रपटात प्रियांका चोप्राने केलेल्या १२ भूमिका व 'शंभु माझा नवसाचा' या २००६ साली प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटात राजेश शृंगारपुरेने केलेल्या १२ भूमिका याविषयी बातम्या वाचनात आल्या. त्या अनुषंगाने मराठी चित्रपटातील दुहेरी / विविध भूमिका संकलित करण्यासाठी चित्रपट विभागात नवीन धागा सुरू केला.
त्याच्या प्रतिसादात काही जणांनी मराठी नाटकातीलही दुहेरी / विविध भूमिका कळवल्या आहेत.

मराठी नाटकातील दुहेरी / विविध भूमिका संकलित करण्यासाठी हा धागा सुरू करत आहे.

आपल्याला माहित असलेल्या दुहेरी / विविध भूमिका कळवत रहा.

प्रत्येक नोंदीसाठी खालील माहिती जमा करता येईल.

विषय: 

श्रीमती सुहास जोशी - 'कन्यादान'

Submitted by चिनूक्स on 26 October, 2009 - 15:53

कन्यादान या तेंडुलकरांच्या नाटकाबद्दल श्रीमती सुहास जोशी यांच्याशी बोलायचं ठरवलं आणि योगायोगानं त्याच वेळी दोन आत्मचरित्रं वाचनात आली. श्रीमती सुधा वर्दे यांचं गोष्ट झर्‍याची आणि श्रीमती यशोधरा गायकवाड यांचं माझी मी ही ती दोन आत्मचरित्रं. म्हटलं तर वेगळी, पण बरीचशी सारखी. सुधाताई वर्दे महाराष्ट्राला परिचित आहेत त्या सेवादलाच्या एक नेत्या म्हणून. सेवादलाचं आणि सेवादलाशी जोडलेल्या कलापथकाचं कामच सुधाताईंनी आयुष्यभर केलं. सुधाताईंचं हे पुस्तक आहे ते त्यांच्या व श्री. सदानंद वर्दे यांच्या सहजीवनाबद्दल. पक्षानेच त्यांचा हा विवाह ठरवला.

आयुष्यावर बोलु काही....:) भाग २

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

गेल्या आठवड्यातील सिडनी येथे झालेल्या आयुष्यावर बोलु काही ह्या कार्यक्रमाचे काही क्षणचित्रेआम्ही प्रसारित करित आहोत... चॅनेल मायबोली..... वीजे चंपक Happy

मनोगत १
http://www.youtube.com/watch?v=NCVKbA98scQ

मनोगत २
http://www.youtube.com/watch?v=apNEQ7d7who

सरी वर सरी
http://www.youtube.com/watch?v=empq-GCTtSA

डिपाडी १
http://www.youtube.com/watch?v=LReB9LUsKLg
डिपाडी २
http://www.youtube.com/watch?v=3ufATtaVWFI

अग्गोबाई
http://www.youtube.com/watch?v=m-_qxjPWzog

अग्गोबाई २
http://www.youtube.com/watch?v=v7LstsMcdZQ

अग्गोबाई३

प्रकार: 

आयुष्यावर बोलु काही!..सिडनी

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

मागील शनिवारी सिडनी ला आयुष्यावर बोलु काही... चा कार्यक्रम झाला! खरे तर, सिडनीतील मायबोलीकर दाद ह्यांना भेटण्याचे निमित्त करुण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो

DSC00758.JPG
अग्गोबाई ढग्गोबाई
***
DSC00759.JPG
सुपरमॅन सुपरमॅन
वरुन चड्डी
आतुन प्यां s s s ट

श्री संदीप ह्यांनी चड्डी हा शब्द अन वस्तु ह्यांना पर्याय शोधण्याचे त्यांच्ये प्रयत्न सांगितले, अन शेवटी चड्डी ला पर्याय नाही असे ठाम मत व्यत केले!

***

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - रंगभूमी