खिन्नता पसरली अशी,
खिन्न मनावर!
जणू वादळ आले;
बहरलेल्या पानावर!!
फुटली होती नवीन,
टवटवीत पालवी!
पण या आक्राळकंदनाने;
संपूर्ण कायाच कालवी!!
जणू चैतन्याच्या अंकुराने,
घेतला होता जन्म!
पण या दैत्यरुपी वादळाने;
त्याचे आयुष्यच केले निम्न!!
अखेर प्रारंभाचा प्रारब्ध झाला.
आले नशिबी त्याच्या,
हे जीवघेणे मर्म!
गळून पडले धरणीवरती;
मुसमुसलेले ते पर्ण!!
या सेट मधले आणखी काही नविन नमुने
हे सर्व एका कस्टम ऑर्डर साठी गणपतीच्या देखाव्यासाठी बनवले...

.

रोवळी काही मनासारखी जमली नाही मला
.
नियोवाईज कॉमेट फोन मधून घेतलेला फोटो...
अचानक दिसला रात्री...

काही काळापूर्वी Facebook, whatsapp, instagram असे अनेक Social Media नव्याने सुरु झाले. सुरवातीला photos, videos, आचार-विचार यांची फार रेलचेल असे त्यावर ! मग मधल्या काळात ह्या मीडियाच्या नव्याचे ९ दिवस संपले आणि हे सर्व थोडं कमी झाले. पण हल्ली Corona च्या विश्वात पुन्हा हे चित्र बदलले आहे. सध्या बऱ्याच ठिकाणी अश्या चर्चा होतात कि Social माध्यमांवर माहितीचा, विचारांचा, कलेचा, नवनवीन उपक्रमाचा सुळसुळाट चालू आहे. Social Media इतका का खळबळून उठलाय याचे बऱ्याच वेळेला वाईट वाटते आहे.
"कधी-कधी तुझ्याकडे बघून,
जागविली खूप सारी स्वप्नं!
असेल छानसं घरकुल आपलं;
अन् खळाळलेल्या चेहऱ्यावर तुझं हसणं!!
या छानश्या गोजिरवाण्या घरात,
असेल प्रेम हे आराध्यदैवत!
सुख नांदेल चहूबांजूंनी;
जर मिळाली तुझी सोबत!!
आले जरी दुःख वाटेमध्ये,
करावा लागला संकटाचा सामना!
यश पडेल मार्गामध्ये;
करुन भगवंताची कामना!!
करावी लागली जरी,
चाकरी नोकरी!
छोटं-मोठं काम हाताशी घेत;
मिळविल मी सुखाची भाकरी!!
सध्या बागेत खूप फुले येत आहेत. विविध फुलांची सजावट करून त्याची रांगोळी फार सुंदर दिसते. या लेखनाच्या धाग्यावर काही रचनांचे फोटो देत आहे.

------------

------------

----------