मर्म

पर्ण

Submitted by चंद्रमा on 28 July, 2020 - 16:09

खिन्नता पसरली अशी,
खिन्न मनावर!
जणू वादळ आले;
बहरलेल्या पानावर!!

फुटली होती नवीन,
टवटवीत पालवी!
पण या आक्राळकंदनाने;
संपूर्ण कायाच कालवी!!

जणू चैतन्याच्या अंकुराने,
घेतला होता जन्म!
पण या दैत्यरुपी वादळाने;
त्याचे आयुष्यच केले निम्न!!

अखेर प्रारंभाचा प्रारब्ध झाला.
आले नशिबी त्याच्या,
हे जीवघेणे मर्म!
गळून पडले धरणीवरती;
मुसमुसलेले ते पर्ण!!

विषय: 

गहन हे मर्म दु:खाचे

Submitted by अनन्त्_यात्री on 22 September, 2017 - 03:22

गहन हे मर्म दु:खाचे
उमजणे कठिण किती असते
साचले युगांचे सगळे
निमिषात अश्रुरूप घेते

उफराटे गणित विषाचे
समजणे कठिण किती असते
मरण्यास पुरे इवलेसे
जगण्यास कितीही कमी पडते

शब्दांच्या निबिड अरण्यी
जग पुन्हा पुन्हा अडखळते
"अमरत्व" शब्द पुसताना
शेवटी मरण का हसते

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मर्म