!!संसार!!

Submitted by चंद्रमा on 14 July, 2020 - 17:45

"कधी-कधी तुझ्याकडे बघून,
जागविली खूप सारी स्वप्नं!
असेल छानसं घरकुल आपलं;
अन् खळाळलेल्या चेहऱ्यावर तुझं हसणं!!

या छानश्या गोजिरवाण्या घरात,
असेल प्रेम हे आराध्यदैवत!
सुख नांदेल चहूबांजूंनी;
जर मिळाली तुझी सोबत!!

आले जरी दुःख वाटेमध्ये,
करावा लागला संकटाचा सामना!
यश पडेल मार्गामध्ये;
करुन भगवंताची कामना!!

करावी लागली जरी,
चाकरी नोकरी!
छोटं-मोठं काम हाताशी घेत;
मिळविल मी सुखाची भाकरी!!

शिळा जरी असला,
भाकरीचा तुकडा!
अविट गोडी चाखेल त्याची;
बघून मी तुझा सुंदर मुखडा"!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users