इलॅस्टिक वापरलेला मास्क, सतत वापरून हळूहळू सैल होऊ लागतो, आणि नाडीवाला खाली घसरू नये म्हणून शिवताना जरा घट्ट शिवला, जास्त वेळ ठेवावा लागला तर नकोसा होतो म्हणून हा अजून एक प्रकार शिवून पहिला 'रुमाल मास्क'
साहित्य-
शिलाई मशीन, दोरा, कात्री, कापड
लेकीला नकोसा झालेला शर्ट वापरला आहे, मऊसूत कॉटन कापड आणि फिका रंग..अजून काय हवं!

गणेश स्तवन आंतरजालावरून कॉपी केलेलं आहे

आत्ता मागील काही वर्षा पासून, पुस्तक वाचन तसं फारच कमी झालं आहे. Lockdown च्या काळात परत सुरु करेल, असं म्हणता म्हणता राहूनच गेलं.
आत्ता हे बुकमार्क्स केलेच आहेत तर त्या साठी तरी नवीन पुस्तकं विकत घ्यावी लागणार असं वाटतेय.
गणपती सजावटीचं राहिलेलं सामान वापरून हे सगळं केलं आहे.
लागणारे साहित्य :
1. कार्डबोर्ड पेपर
2. रंगीत पेन्स
3. कुंदन

आवडतं गाणं स्वाक्षरात लिहिण्याचा एक प्रयत्न !
वि.सू.: अक्षरास हसू नये :)
*श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा* sharadgब गट

|| श्री गणेशाय नम: ||
ब गट - मोठयांसाठी
हा मी बनवलेला ओरिगामी बुकमार्क. काल काही शोधाशोध करत असताना जुनी डायरी सापडली . ती चाळत असताना तिच्यात असलेले पेपर डिव्हायडर चांगलेच जाड आहेत अस लक्षात आलं आणि मायबोलीवरील बुकमार्क स्पर्धा आठवली.
हा ओरिगामी बुकमार्क पूर्णपणे त्या जाड कागदाचा बनवला असून बाकी सजावटीसाठी घरात असलेले रंगीत कागद आणि स्केचपेन वापरलेले आहेत . ह्या प्रकारच्या बुकमार्क्सना पेपर कॉर्नर बुकमार्क्स असेही म्हणतात .
हा ओरिगामी बुकमार्क
ब गट-
हे बाप्पाचे चित्र बनवायला मी खालील साहित्य वापरले.
पेन्सिल्स: hb 2b 4b 6b EE
ब्रशेस आणि पेपर स्टंप
इरेझर

.

नुकतेच एका गणपती डेकोरेशन ऑर्डर साठी मी बनवलेला गणपती बाप्पा!
आणि हे खेडेगाव थीम साठी बनवलेले मिनिएचरस्

.

.

स्पर्धेचे स्वरूप:- निरनिराळ्या वस्तू उदा. बटाटा, भेंडीचे काप, फोमशीट इ. विविध आकारात कापून तसेच फुले पानांचे ठसे इ. त्याचे एक मुक्त हस्त चित्र तयार करणे. वेगवेगळ्या लांबीचे जाडीचे धागे रंगात बुडवून कागदावर ठेवून कागद एक बाजूने मिटून अलगद धागा ओढून चित्र तयार करण्याची पद्धत सुद्धा यात समाविष्ट आहे. स्पर्धेचा हेतू ‘नावीन्य शोधणे’ हा आहे.