Corona, Social Media आणि त्यातील सकारात्मकता!

Submitted by अस्मिता मोडक on 19 July, 2020 - 14:41

काही काळापूर्वी Facebook, whatsapp, instagram असे अनेक Social Media नव्याने सुरु झाले. सुरवातीला photos, videos, आचार-विचार यांची फार रेलचेल असे त्यावर ! मग मधल्या काळात ह्या मीडियाच्या नव्याचे ९ दिवस संपले आणि हे सर्व थोडं कमी झाले. पण हल्ली Corona च्या विश्वात पुन्हा हे चित्र बदलले आहे. सध्या बऱ्याच ठिकाणी अश्या चर्चा होतात कि Social माध्यमांवर माहितीचा, विचारांचा, कलेचा, नवनवीन उपक्रमाचा सुळसुळाट चालू आहे. Social Media इतका का खळबळून उठलाय याचे बऱ्याच वेळेला वाईट वाटते आहे. कित्येक लोक आपली कला या सर्व माध्यमांवर सादर करत आहेत, कविता वाचत आहेत, पाककृती करत आहेत, माहितीचे, विचारांचे देवाणघेवाण होत आहेत. यातील सर्वच योग्य आहे असे नाही. कित्येकांचा दावा आहे कि यातून चुकीची माहिती पसरण्याची शक्यता आहे आणि कित्येक कला चुकीच्या पद्धतीने जगासमोर आणल्या जात आहेत. पण…. याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन सुद्धा सध्याच्या परिस्थितीत ठेवणे तितकेच आवश्यक आहे.
हा आजार/रोग केवळ आपण पडलो, खरचटलं आणि जखम बरी झाली अश्या ७ दिवसांचा प्रवास नाही. हि परिस्थिती आपल्याला काही काळ पुढे अशीच ढकलावी लागणार आहे. अश्यावेळी "सामान्य माणूस" परिस्थितीशी जुळवून घेण्याचा असा प्रयत्न करत असेल तर ते फार काही चुकीचं नाही असा पण विचार आपण केला पाहिजे. माणूस हा social प्राणी आहे हे आपण म्हणतोच. आणि त्याला व्यक्तिस्वातंत्र्याची देखील तेवढीच मुभा आहे हे आपण मान्य केलं तर सध्याच्या social distancing च्या काळात जिथे दुसऱ्याशी जोडता येईल, एकत्रितपणा अनुभवता येईल असं सध्याचं Social Media हे एकच माध्यम आहे. मग अश्यावेळी सुद्धा त्याकडे पाठ फिरवावी का? कित्येक मुलाखतींमध्ये चर्चा होते कि असं किती काळ आपण Social Media वर स्वतःच्या कलागुणांना सादर करणार आहोत? आणि ते योग्य आहे का? खरे तर सध्याची परिस्थिती बघता असा प्रश्नच आता काही काळ विचारणे योग्य नाही. कारण माणसाच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सध्या दुसरा पर्याय नाही.
तसं पाहिलं तर पूर्वी हे सर्व होत नव्हतं का? कॉरोनच्या आधी कविता, गायन, नृत्य, लिखाण,पाककृती, चित्रकला असं बरच काही इथे सादर केलं जात होतं. फक्त ते नक्कीच कमी प्रमाणात होतं कारण माणसाच्या सर्जनशीलतेला वाव मिळवून देणारे इतर माध्यम सहज उपलब्ध होते. अश्या माध्यमातून या सर्व गोष्टी सहजरित्या दुसऱ्यापर्यंत पोहचवणे त्याला शक्य होत होते. आता ते थोड्या जास्त प्रमाणात होत असल्याने विशेष करून लक्षात येते कारण हेच एकमेव माध्यम आता आपल्यासाठी उपलब्ध आहे.
आज प्रसिद्ध व्यक्तिमत्वांकडून सुद्धा अनेक कला social media वर सादर केल्या जात आहेत आणि आपण त्यालाहि मोठी दाद देत आहोत. त्याचप्रमाणे सामान्य माणूस स्वतःच्या creativity साठी, स्वतःचा दिवभराचा शीण घालवण्यासाठी, त्याच्या आनंदासाठी social media वर स्वतःला मोकळं करायला बघत आहे. सध्याच्या परिस्थितीत तो स्वतःला सावरायचा प्रयत्न करत आहे, तो स्वतःची मनःशांती Social Media ला हाताशी धरून बघत आहे, सकारात्मकता शोधत आहे. अश्या दृष्टीने आपण या घटनांकडे बघू शकलो तर? सर्वांचाच हा दृष्टिकोन बदलण्याची सध्या काळाची गरज आहे.
याची दुसरी बाजू सुद्धा विसरून चालणार नाही. आपण जे Social Media वर सादर करणार आहोत ते सादर करण्याआधी ती जर एखादी माहिती असेल, लिखाण असेल तर ते चुकीचं नाही याची खात्री करणं आवश्यक आहे. गुरुकडून शिकलेली एखादी कला सादर केली जाणार असेल तर गुरुची संमत्ती मिळवणे आवश्यक आहे. पाककला, चित्रकला, नृत्य, गायन यात creativity ला मर्यादा नाहीत पण ते घडवताना आपण दुसऱ्या व्यक्तीचा चुकिचा वापर करत नाही हे ध्यानात ठेवणं आवश्यक आहे. सादर झालेली कला इतर कोणाची नक्कल नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यावर कोणी दिलेल्या सूचना सकारत्मक समजून त्या आपल्या कलेत सुधारणा होण्यासाठीची गुरुकिल्ली आहेत हे मनात कोरून ठेवणं गरजेचं आहे. आणि अर्थातच तज्ज्ञ आणि जाणकार व्यक्तींना अश्या चुका लक्षात आल्या तर निरपेक्ष वृत्तीने त्या व्यक्तीस त्या माहित करून देणं, समजावणं तितकंच महत्वाचं आहे. ती चूक सुधारताना आपुलकीची झालर लावली पाहिजे. अहंकाराची भावना दूर ठेवली पाहिजे.
Social Media कडे केवळ एक "सूळसूळाट" नं बघता, शिकण्याचं माध्यम म्हणून बघितलं पाहिजे. माणसाशी जोडला जाणारा दुवा म्हणून त्याला संबोधलं पाहिजे. एकमेकांमध्ये असणारे वाद -विवाद, हेवेदावे विसरून एकत्र येण्याचा मार्ग यातूनच शोधला पाहिजे. या Corona महायुद्धातून बाहेर येईपर्यंत हेच Social Media सामान्य माणसांसाठी मनःशांतीचे दार उघडं करू शकेल!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users