कला

रॅपिड स्केच

Submitted by रिषिकेश. on 3 June, 2020 - 14:35

लॉकडाउन मुळे आपल्याला समजले प्राण्यांना पिंजऱ्यात ठेवून कसे वाटत असेल ते. आतातरी त्यांच्यावर थोडी दया करा. त्यांना अमानुषपणे असे मारू नका. त्यांनाही आपल्यासारख्या भावना असतात. नाहीतर हीच वेळ आपल्यावर यायला वेळ लागणार नाही.
IMG_20200604_000340.jpg

नवऱ्याला वाढदिवसाची भेट म्हणून काय द्यावे ह्यासाठी विविध पर्याय

Submitted by किल्ली on 1 June, 2020 - 12:18

धाग्याची प्रेरणा:
https://www.maayboli.com/node/65034

तर मंडळी आमची anniversary आणि ह्यांच्या (म्हणजे आमचे अहो) वाढदिवसाचा महिना जवळ येतोय.
Gift काय द्यावे ते सुचवा.
दोन occasions असल्याने दोन gifts तयार ठेवावी लागतात. एरवी मी काहीतरी विचार करून जमवते व्यवस्थित पण पुरुष मंडळींना काय द्यावं हा नेहमीच पडणारा प्रश्न आहे.

(बरं विचारायला जावं तर iphone, ipad, ray ban अशी उत्तरे येतात . एवढं माझं बाई budget नाही. )

मुलींना किती काय काय देता येतं ना!

शब्दखुणा: 

कविता -आयुष्याचा ताळेबंद

Submitted by रजनी भागवत on 30 May, 2020 - 15:45

असेच एकदा बसल्या बसल्या
विचार आला मनी
मनुष्यजन्माच्या प्रवासाची करू
गोळाबेरीज या क्षणी..

बेरीज ,वजाबाकी,गुणाकार नी भागाकार
याचा ताळेबंद बसता बसेना
आणि आयुष्याचे गणित माझ्या
काहीकेल्या सुटेना...

बेरीज म्हणजे अधिक
तर वजा म्हणजे उणे
अधिक क्षणां पेक्षा जास्त
उण्यानेच भरले माझे रकाने......

सुखाचा गुणाकार जमेना
आणि दुःखाचा भागाकार येईना
आणखी काय सांगू मैत्रिणींनो
आयुष्याचे गणित माझे
मला काही उमजेना
मला काही उमजेना........

रजनी भागवत

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

तुमचे आवडते शाहरुख चे सीन्स

Submitted by कटप्पा on 28 May, 2020 - 16:39

बटाट्याच्या धाग्यावर वीरू मी आणि ऋन्मेष गप्पा मारत असताना विषय निघाला कुछ कुछ होता है चा .
चित्रपटात सलमान ने शाहरुख ला अभिनयात कच्चा खाल्ला आहे हे सगळ्या भारतीयांना माहित आहे . हा चित्रपट काजल च्या सुरुवातीच्या ओव्हरऍक्टिंग मुळे आणि शाहरुख च्या संतुलित अभिनयामुळे लक्षात आहेच पण त्यापेक्षा जास्त लोकांना काय आवडले तर रघुपति राघव राजाराम गाण्यात नदीच्या पुलावरून शाहरुख ने केलेली रनिंग . त्या धावेची तुलना मी दिवार आणि शोले मधल्या बच्चन च्या धावण्याशी करेन .

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कला