मराठी उद्योजक या ग्रूपबद्दल माहिती प्रकाशित झाल्यापासून अनेक जणांनी यात सामिल होण्याबद्दल विचारणा केली आहे. या ग्रूपमधे सामील होण्याचे निकष आणि पुढील पायर्या. सभासदत्वासाठी कुठल्याही स्वयंसेवकाशी संपर्क साधण्याअगोदर कृपया खालील गोष्टींची पूर्तता करुनच संपर्क करावा
१. फक्त मायबोलीच्या कार्यरत सभासदांना या ग्रूपचे सभासद होता येईल. जे सध्या सभासद नाहीत ते आधी मायबोलीचे सभासदत्व घेऊन मग ग्रूपच्या सभासदत्वसाठी अर्ज करू शकतील.
ईमु पालन : ईमु ह्या पक्षाला खुप मागणी आहे,त्यांचा वापर मांस, लेदर , तेल तसेच अंडी मिळवण्यासाठी होतो.
प्रकल्पाचा खर्च अंदाजे
दहा जोड्या : ३००,०००
जमीन १-२ एकर : ४००,०००
कुंपण : १००,०००
सालगडी : ७५,०००
पशुखादय (१ वर्ष) : १००,०००
--------------------------------------------
एकून अंदाजे ९,७५,००० ~ १०,००,००० रू
हा पक्षी १८ महिन्यानंतर अंडी देण्यास सुरुवात करतो.
एक जोडी प्रत्येक हंगामात १०- २० अंडी घालतो. म्हणजे एकून १००- २०० अंडी.
दहा-पंधरा वर्षे नोकरी केल्यानंतर स्वतः चे वेगळे अस्तित्व निर्माण करावेसे वाटते. एका मायबोलीकराने तर तब्बल साडे तीन महिन्यांच्या नोकरी च्या अनुभवावर स्वतः ची कंपनी सुरु केली अन ते आज एक यशस्वी उद्योजक गणले जात आहेत! 'स्वः निर्मीती चा आनंद काही वेगळाच असतो' हे अनुभवाने माहिती झालेले असते. अश्या वेळी आपल्या सारखे कुणी आसपास आहेत का हे बघणे गरजेचे असते. असतील तर आनंद होतो. 'एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ' ह्या संतवचनाची आठवण होते.
आकाशातून पडणारी वीज हा ऊर्जेचा एक लोळच असतो. या लोळातील ऊर्जा, असंख्य ऊर्जाकणांनी बनलेली असते. या प्रत्येक कणांवर किमान काही परिमाणात ऊर्जा असतेच असते. किमान ऊर्जेपेक्षा जास्त ऊर्जा धारण करणारे कण अतिरिक्त ऊर्जेच्या प्रमाणानुरूप गतीमान तरी असतात किंवा विद्युत भार तरी धारण करत असतात. अशा कणांतील ऊर्जा, त्यांना त्यांच्या वस्तुमानामुळे, विद्युत भारामुळे आणि गतीमुळे प्राप्त झालेली असते. वस्तुमानाने सर्वात लहान, किमान ऊर्जा धारण करणार्या, तसेच किमान विद्युत भार धारण करणार्या अशा कणाला "विजक" म्हणतात. वीज तयार करतो तो (वीज+ कण) "विजक". विजकांचा अभ्यास करणार्या शास्त्रास "विजकविद्या" म्हणतात.
ओबामाची नुकतीच संपलेली आशिया भेट, त्याचा उद्देश, आशियातील चीनच्या रोलबद्दल केलेली वक्तव्ये याबद्दल प्रसारमाध्यमांत बरीच चर्चा चालू आहे. चीनहे भारत पाकिस्तान संबधात हस्तक्षेप करावा असे थेट विधान केले नसले तरी तसा अर्थ त्यातून निघू शकतो. स्टेटमेन्ट असे आहे-
नमस्कार,
आज सोन्याने नवा उच्चांक गाठला. $११०० प्रति आउन्स..(रुपयांच्या हिशेबात अंदाजे १७२३३ रु तोळा...)
इ.स २००५ मधे $४६० प्रति आउन्स असलेले सोने आज जवळपास दुपटीने वाढले आहे. डॉलरचे अवमुल्यन, भारतात वाढत असलेली मध्यमवर्गाची आर्थिक सुबत्ता अशी बरीच कारणे दिली जात आहेत.
अमेरिकेचे डेफीसीट पाहता डॉलर मधे काही बळ येण्याची शक्यता (नजीकच्या काळात तरी) कमीच वाटतेय.
काय वाटते तुम्हाला? इथुन पुढे आणखी वाढेल का हा बुडबुडा आहे आणि कुठल्याही क्षणी फुटेल? (क्रूड तेल १४० वरुन ७० वर आले तसे)?
सगळ्यांच्या मताचे स्वागत्..(जाणकारानी विस्तृत लिहिलेत तर माझ्या सारख्या अज्ञजनाना मदत होइल).