चंप्या दुधवाला....!

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मायबोलीवर प्रकाशित झालेल्या
'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे' (http://www.maayboli.com/node/12292) आणि
वांगे अमर रहे ! (http://www.maayboli.com/node/12438)
या लेखांवर लिहिताना वाचताना मला माझा शेतीबद्दल चा एक अनुभव मांडावासा वाटला!

सन २००६ मध्ये पी.एच.डी. (रसायनशास्त्र) चा अभ्यासक्रम/संशोधन संपवुन मी भारतात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी तयारी करायला पुण्यात आलो. पण दुर्दैवाने, माझ्या छोट्या पुतण्याला कॅन्सर झाल्याने मला अभ्यास अर्धवट सोडुन त्याच्या उपचाराकडे लक्ष द्यावे लागले. चाणक्य मंडळ, पुणे अन टाटा हॉस्पिटल, मुंबई च्या खेट्या मारण्यात माझे लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचे स्वप्न कामी आले Sad मे २००७ ची पुर्व परिक्षा मी नापास झालो! आख्या आयुष्यातील नापास चा एकमेव शिक्का माझ्या माथी बसला! (सविस्तर: स्व..देश पुस्तक. ग्रंथाली प्रकाशन)

त्यानंतर जुन २००७ ला माझे लग्न झाले. Happy नोकरी अर्धवट करत होतो. पण मन रमत नव्हते. स्व्तःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचे वेड लागले होते. आय ए एस चे स्वप्न धुळीस मिळाले अन मग भले लट्ट पगाराचे नोकरी हाती असुनही मन स्थिर नव्हते. रसायन अन ऑषध उद्योगात काही करायला लागणारे मोठे भांडावल हाती नव्हते..... मग गावी काही करावे म्हणुन चाचपणी केली. बारामतीच्या सह्याद्री अ‍ॅग्रो ने आमच्या तालुक्यात दुध संकलन व शितकरण केंद्रे चालु करण्याचे योजले आहे असे समजले. आमच्या कुटुंबाचे एक हितचिंतक श्री नानाभाऊ कराडे ह्यांनी मला सविस्तर माहिती दिली... अन ७ ऑगस्ट २००७ ला बारामतीला सदर कंपनी बरोबर करार केला!

या पुर्वी दुध संकलनाचा व्यवसाय एका भावाने केलेला होता, पण त्यात त्याला तब्बल १० लाखाचा तोटा झालेला होता. त्यामुळे घरुन कुणीही ह्या उपक्रमाला आर्थिक पाठबळ देउ करित नव्हते! एकला चलो रे.......!

गावाकडील शेतकृयांकडुन्/दुध उत्पादकांकडुन दररोज दोन वेळा दुध जमा करणे व ते ३ डिग्री तापमानाला थंड करुन टॅन्कर (सह्याद्री अ‍ॅग्रो ने पाठवलेला) ने बारामतीला पोहच करणे हे कामाचे स्वरुप.

दुध संकलन व शीतकरन केंद्र चालु करण्याचा खर्च होता साधारण पाच लाख रुपये. जागा स्वतःचीच (व्होल वावर इज आवर) असल्याने फक्त कंपनीनी दिलेल्या आराखड्याप्रमाणे इमारत बांधणी चा खर्च होता. खिशात होते सत्तर हजार रुपये! काम तर सुरु केले.... मग पाया बांधुन झाल्यावर पैसे संपले:)
त्याचवेळी खुप पाउस पडला अन बांधकम जवळपास एक महिना बंद ठेवावे लागले! माती, वाळु, विटा ई ची वाहतुक पावसाने रस्ते ओले केल्याने बंद झाली होती..... त्यामुळे महिनाभर सवलत मिळाली! पैसे संपल्याचे कुणाच्या लक्षातही आले नाही Happy

तालुक्यातील तीन बॅन्काकडे कर्जाची मागणी केली. तारण देऊनही दुध संकलन केंद्रा साठी च्या पुर्वीच्या अनुभवावरुन एकाही बॅन्केने कर्ज दिले नाही. मग एका मित्राकडुन काही पैसे घेतले, अन काही कंपन्यांमध्ये काम करणार्या मित्रांनी त्यांच्या पर्सनल लोन सेवेचा वापर करुन ( व्याज दर १९%) मला तीन लाख रुपये जमा करुन दिले!

पाउस थांबला अन काम सुरु झाले!

दत्त जयंतीच्या दिवशी २३ डिसेंबर २००७ ला दुध संकलन अन शितकरन केंद्राचे उद्घाटन केले! जो भाउ दुधातील माहितगार होता, त्याने केंद्र चालवायची जबबदारी उचलली. पहिल्या दिवशी १४२ लिटर दुध जमा झाले. कंपनीने सहा महिन्यात प्रतिदिन किमान दीड हजार लिटर दुध जमा व्हायला हवे असे कळवले. मग शेतकर्यांकडे मोर्चा वळवला... पण ग्रामीण भागात असे अनेक संकलन केंद्र असल्याने प्रत्येक जण उचल (अ‍ॅड्व्हान्स ) ची मागणी करु लागला.... ज्या पाच पन्नास शेतकर्‍याना बोललो, त्यांची एकुण मागणी २५ लाखाच्या पुढे गेली..... धबाडधुम! इथे शिवरात्र अन एकादशी एकसाथ चालु असताना ....!

मग शेतकर्‍यांना केवळ १) दुधाचे वेळेवर पेमेट २) दर्जेदार दुधाला दर्जेदार भाव ३) केंद्र चालवण्याचा खर्च म्हणुन दुध उत्पादकाकडुन काहीही कपात केली जाणार नाही, अश्या आश्वासनांवर (जी गेली दोन वर्षे १००% पाळली आहेत ) दुध देण्याची विनंती केली. काहींनी ती मान्य केली अन त्यांना फरक समजुन आला..... एक महिन्यात प्रतिदिन १०० अन सहा महिन्यात प्रतिदिन अडिच हजार लिटर दुध जमा होउ लागली. एका वर्षात प्रतिदिन चार हजार लिटर दुध जमा करुन महाराष्ट्रात सह्याद्री अ‍ॅग्रो च्या एकुण ५०० केंद्रा मध्ये तीसरा क्रमांक पटकावला!!! Happy

मित्रांनी दिलेले सर्व पैसे परत करु शकलो! अन अनेक नवे मित्र ही जोडु शकलो!

आज अंदाजे ४०० लहान मोठे दुध उत्पादक दररोज ४००० लिटर दर्जेदार दुध श्री बाळकृष्ण दुध संकलन व शितकरण केंद्रावर जमा करत असतात! इतर दुध केंद्रांनी आजवर लुटलेले/ कमी भाव दिलेले/ पैसे बुडवलेले लोक गेली दोन वर्षे अत्यंत समाधानाने दुध उत्पादनाचा हा पुरक उद्योग यशस्व्व्पणे करित आहेत... सकाळी किंवा संध्याकाळी जर कधी केंद्रावर बसले, तर ह्या शेतकरर्यांशी मनमोकळी बातचीत होते. लै झ्याक मजा येते! तिथुन पाय हलत नाही! Happy पुन्हा मुंबई, सिडनी ला जाउशी वाटत नाही Happy
अश्या भेटीतुन विचारांचे आदान प्रदान होते! समवयस्क अन लहान मोठे शेतकरी बांधव प्रत्यक्ष शेती करताना काय अडचणी येतात ते सांगतात...अन जमल्यास काही मेळावे भरवुन, कृषी तज्ञ बोलावुन मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जातात.

***************

ग्रामीण भागातील शेती मध्ये दुध अन ऊस हे महत्वाचे घटक आहेत! दुधाचे काम सुरु आहे. मग ऊसाबद्दल विचार सुरु केला..... साखर कारखाना काढण्याची ऐपत तर नाही! पण एक १०० टन प्रतिदिन गाळप क्षमतेचे गुळ उत्पादन केंद्र (गुर्‍हाळ/ खांडसरी/कहाकी-काकवी) बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

काही सरकारी अन काही खाजगी बॅन्कांकडे तीस लाख रुपयाच्या प्रकल्पाला ६० लाख रुपयाचे तारण देऊनही कर्ज मिळेना! सॅटरडे क्लब ह्या मराठी व्यावसायीकांच्या संघटनेलाही साकडे घातले...पण हाती आले शुन्य! शेती अन पुरक उदयोगांची हीच खरी अडचण आहे....इथुन परतल्यावर पुन्हा प्रयत्न करेलच! Happy

यासंदर्भात सध्या काही गोष्टी करतो आहे-
१) गुळ बनवण्याच्या आधुनिक प्रक्रियेबद्दल माहीती मिळवणे.
२) ज्य लोकांची गुर्‍हाळे सध्या सुरु आहेत त्यांचेशी कायम संपर्कात राहणे.
३) कोल्हापुर/सातारा भागातील मित्रांकडुन याबद्दल अधिक माहिती मिळवणे.

....चंप्या गुळवाला!:)

प्रकार: 

चंपक, इथे तू पाहतोसच आहेस की काही गोष्टी (भाजीपाला, कॅन्ड्/बॉट्ल्ड भाज्या/पेस्ट्स) बाहेरूनच येतात. तसा काही प्रयत्न करणार आहेस का? भारतात हे सगळं उगवून्/बनवून बाहेर पाठवायचं?

वेल डन चंपक,
आज शेतकरी समाजाला अशाच प्रामाणिक मनाच्या अन प्रामाणिक कामाच्या व्यक्तिंची गरज आहे.

चंप्या दूधवाला,

मी मालदीवमध्ये रहातो.. इथली काही आकडेवारी देतो...

१. अख्ख्या देशात ( १५०० बेटे) गायीम्हशी नाहीत.
२. टेट्रा पॅकमध्ये दूध सुमारे ८० रु. लिटर मिळते.
३. मिल्क पावडर ४०० ग्रॅमचा डबा सुमारे १६० रु. त्यात ३.१ लिटर दूध होऊ शकते.

आणि हे सगळं आस्ट्रेलियातून येते.... मालदीव-भारत १००० किमी आहे.... मालदीव-औस्ट्रेलिया किमान ५००० किमी तरी असावे. मला रोज वाटते... भारतातून दूध\पावडर या देशात का येत नाही? लोक दुध आणि योगर्टच्या नावाने काय वाट्टेल ते -स्टृऑबेरी फ्लेवर, मॅन्गो फ्लेवरवाले मूठभर कागदी पॅकमधले- काय वाट्टेल ते पीत असतात......... नुसते शुद्ध दूध भारताने सप्लाय केले तरी चालेल......

तुमचा लेख, तुमचे प्रयत्न, तुमच कार्य सगळच छान Happy
अश्या प्रकारच्या अनुभव लेखातुन खुप काही शीकायला मीळत Happy

वा चंपक. आगे बढो!
तुम्हाला साखर कारखाना आणि इतर उद्योगातही यश मिळो! सर्व शेतकर्‍यांचं भलं होवो!!

चंपक असलच काहितरी डोस्क्यात आहे (शेती किंवा ग्रीन हाउस). पण मला जागेपासुन सुरवात करावी लागेल.
जामोप्या यानी दिलेली माहिती बघुन आश्चर्य वाटल.
कसल मोठ्ठ मार्केट आहे हे.
मालदीवचे आयएफएस अधिकारी ज्ञानेश्वर मुळे आहेत. (चु भु द्या घ्या) त्यांचा एक लोकसत्ता मध्ये एका रविवारी लेख आला होता. त्यात त्याने मालदीवचे अध्यक्ष (की पंतप्रधान) आणि रतन टाटा ह्यांची भेट कशी घडवुन आणली आणि त्यातुन तिकडे टाटांची गुंतवणूक कशी वाढली आणि त्यात तो देश आणि टाटा ग्रुप आणि भारत देश ह्याना विन विन सिच्युएशन कशी बनली ह्याचा उहापोह केलाय.
जामोप्या यानी उल्लेख केलले कार्य घडुन यायला थोडासा वेळ लागु शकतो पण ती खुप मोठी अचिव्हमेंट होइल. Happy
लोकसत्ताची लिन्क बघतो. जुना लेख आहे. शोधुन काढण कठीण आहे.
dmulay@hotmail.com

ह्या त्यांचा इमेल आयडी.
मला तो लेख काहि शोधता आला नाही.

होय, मालदीवचे इंडियन हाय कमिशनर मा. ज्ञानेश्वर मुळे आहेत.. त्यांची माती,पंख आणि आकाश, नोकरशाई, ग्यानबाची मेख ही त्यांची काही गाजलेली पुस्तकं.. ( आणखीही आहेत.. )

चंपक
अभिनंदन. खूप स्फुर्तीदायक लेख, बर्‍याच अडचणींवर मात करून तू आता यशस्वीपणे हे काम करतोयस हे वाचून एकदम छान वाटले. तुझ्या अश्या लेखाने अनेकांना शेतीशी संबंधित उद्योग करण्याचे, तो सांभाळण्याचे, टिकवण्याचे आणि यशस्वी करण्याचे मनोधैर्य लाभो.

धन्यवाद मित्रांनो....

लेखात म्हटल्या प्रमाणे, माझे मोठे बंधु श्री रविंद्र अन श्री अशोक, हे केंद्राचे दैनंदिन काम बघतात. आर्थिक बाबीवर लक्ष ठेवायचे काम माझे असते...

श्री. झकासराव अन श्री. जागोमोहन, माहितीबद्द्ल धन्यवाद..... माझ्या मित्राचे एक खाजगी दुध शीतकरन केंद्र आहे आळे फाट्या वर (संगमनेर ते मुंबई/पुणे मार्गावर), प्रतिदिन २०, ००० लिटर दुध तो मुंबई ला विकतो. मी आजच त्याच्याशी बोलतो. श्री. मुळे साहेबांना पण संपर्क करतो... काही करता आले तर निस्चितच आनंद वाटेल. आपण अजुन काही माहिती मिळाल्यास अवश्य कळवा. कारण इतकी आयडियल बाजारपेठ असुन आपले दुध तिथे का नाही? भारतीय मालाला अडथळा आणेल असा काही नियम बनवलेला आहे का?

भाग्याताई- भारतातुन परदेशात शेतमाल पाठवायला काही परवाणे आवश्यक असतात. तो मोठा प्रकल्प आहे, खुप गुंतवणुक लागेल. परदेशात आपला कुणीतरी असेल तर उत्तम, हारण अश्या धंद्यात मालाचे पैसे बुडण्याची मोठी रिस्क असते...... परदेशी बाजारपेठेसोबत केवळ देशांतर्गत बाजारपेठेवर लक्ष ठेवले तरी खुप करता येईल असे वाटते.
माझा एक मित्र हल्ली- मे/जुन २००९- पासुन आखाती देशात केळी निर्यात करु लागला आहे. त्याला ही याबद्दल बोलुण ठेवलेले आहे. भविश्यात नक्कीच करता येईल असा हा उपक्रम आहे.

मायबोलीवर शेतीबद्दल झालेल्या चर्चेमध्ये (अन श्री शरद पवार यांच्या भाषणांमध्ये नेहमीच) आलेला एक मुद्दा म्हणजे.. ...शेतकरी घरातील एका भावाने नोकरी करावी अन एकाने शेती. नोकरीतील पैसा अन व्यवस्थापनाचे ज्ञान जर शेतीमध्ये घातले तर शेती नक्कीच सोनेरी होउन जाईल. ग्रामीण भागात असे प्रकार हल्ली मोठ्या प्रमाणावर होत आहेत, अन ही आनंदाची बाब आहे.

आपल्यासारख्या हितचिंतकांच्या शभेच्छा नकीच हुरुप वाढवतात! धन्यवाद! Happy

दूध तर आहेच. ... भाजी, धान्य, साखर अशा अनेक वस्तू सध्या श्रीलन्का, भारत पुरवत आहे... टिनमधले वाटाणे, राजमा, भाज्या (प्रीकुक्ड) हे सगळं फ्रान्स,सिंगापूर, अरब देश, ऑस्त्रेलिया मधून येते.... हे सगळे देश भारतापेक्षा लांब आहेत.. तरीही तिथून येते. टिनमधले फूड हाही एक पर्याय चांगला वाटतो.. ताज्या भाज्या, टिन फूड सगळेच महाग ( म्हणजे भारतातल्या किंमतीसोबत तोलताना) आहे. भारतात मात्र शेतकर्‍यांची दूध ८० पैशाने वाढवा आणि कडधान्याला ६० पैसे जास्त मिळावेत म्हणून आंदोलनं होतात.. . वांग्याचे भरीत आणि भेण्ड्याची भाजी ही चैनीची वस्तू होईल, असे वाटलेदेखील नव्हते.. Happy

मस्तच रे चंपक. खूपच इन्स्पायरिंग आहे.
असे काही वाचले की वर्गिस कुरियनांचं 'माझंही एक स्वप्न होत' आठवतं. म्हणजे प्रेरणादायी म्हणून. इथं तर व्यवसाय ही त्याच्याशी संबधित आहे.
आता थांबू नकोस.
बेस्ट ऑफ लक!

चंपक शुभेच्छा रे! Happy

आणि 'कोल्हापुरी गूळ' एक्स्पोर्टची चांगली बातमी दिल्याबद्दल ढेप बक्षिस!

Pages