माजं चोरिला गेलेलं लिखान
माझं एक लिखान चोरिला गेलं होतं. जुन्या बाडात एक कापी सापडलि. आपनासाठि त्यातला काहि भाग स्पेशल देत आहे.
- ए भाई, तु आज मला हितं काहुन बोलवले ?
- आपन हितंच भेटु शकलो अस्तो.
- काहुन ?
- हितुन पुढं तुजी हद्द चालु होते
- मंग ?
- तुझी मानसं चिन्धिचोर हायेत. माजी मानसं कापडं काडुन घेत नाहित.
- माज्या मानसानि काडून घेतल्ली कापडं आधि त्यांचिच व्हती
- हम्म्म. मंग आपुन या पुलाखालिच भेटु शकलो असतो.
- व्हय.
- आठवतं का ? हितं तू माज्या गोट्या चोरुन नेल्या व्हत्या
- आनि तु माझ्या बिड्या
- हम्म. या पुलाखालि आपलं ल्हानपन गेलं.
- हितंच आपल्या बाबाला पोलिस घेऊन गेल्ते
