मराठी उद्योजकः सभासदत्व कसे मिळवावे

Submitted by अजय on 19 January, 2010 - 00:00

मराठी उद्योजक या ग्रूपबद्दल माहिती प्रकाशित झाल्यापासून अनेक जणांनी यात सामिल होण्याबद्दल विचारणा केली आहे. या ग्रूपमधे सामील होण्याचे निकष आणि पुढील पायर्‍या. सभासदत्वासाठी कुठल्याही स्वयंसेवकाशी संपर्क साधण्याअगोदर कृपया खालील गोष्टींची पूर्तता करुनच संपर्क करावा

१. फक्त मायबोलीच्या कार्यरत सभासदांना या ग्रूपचे सभासद होता येईल. जे सध्या सभासद नाहीत ते आधी मायबोलीचे सभासदत्व घेऊन मग ग्रूपच्या सभासदत्वसाठी अर्ज करू शकतील.

२. सभासदत्चासाठी तुमचे नाव, आडनाव, गाव, देश आणि व्यवसायाबद्दल माहिती जाहिरपणे व्यक्तिरेखेत लिहणे आणि तशी कायम लिहलेली ठेवणे आवश्यक आहे. फक्त हीच माहिती सगळ्यांना उपलब्ध असेल. ही माहिती खोटी आहे असे कधीही आढळल्यास या ग्रूपचे आणि मायबोलीचेही सभासदत्व रद्द केले जाईल.

३. सभासदत्वासाठी अर्ज करताना तुमच्या जवळच्या विभागातल्या (किंवा तुम्हाला सोयिस्कर असलेल्या) ग्रूपच्या प्रतिनिधिशी संपर्क करून तुमच्या फोन नंबर कळवावा. ते प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची माहिती विचारतील आणि ती व्यक्तीरेखेशी जुळली असेल तर तुम्हाला सभासदत्व देण्याची प्रक्रिया सुरु करतील.

४. या व्यतिरिक्त तुमचा ईमेल किंवा फोन किंवा इतर संपर्काची माहिती ग्रूपमधे कधी जाहिर करण्याची गरज नाही किंवा या ग्रूपच्या प्रशासकीय टीमलाही सांगायची गरज नाही. तुम्हाला एकाद्या व्यक्तिबद्दल विश्वास निर्माण झाला तर त्याला कुठ्ली माहिती केंव्हा द्यायची हे तुमचे तुम्हीच ठरवायचे आहे. अयोग्य व्यक्तिच्या हातात सगळ्या सभासदांच्या ईमेल किंवा फोनचा एकत्रित डाटा जाऊन त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये यासाठी धोरण आहे.

५. सध्या मायबोलीवरच्या संपर्क सुविधेचा, विचारपूशिचा वापर करून सभासदांना एकमेकांत संपर्क करता येईल. इतरही सुविधांवर काम चालू आहे ज्या वापरून वेगवेगळे Filters ठेवता येईल.

६. या ग्रूपमधे उद्योजक, उद्योजक होऊ इच्छिणारे, नोकरी करणारे, नोकरी शोधणारे, विद्यार्थी सगळ्यांसाठी प्रवेश असेल. वर #२ मधे लिहल्याप्रमाणे खरी माहिती द्यावी लागेल. सभासदत्व देताना कुठल्या क्षेत्रातले असावेत यावर बंधन नसले तरी व्यवसायानुसार प्रतिक्षा यादी असू शकेल. उदा. एका क्षणी Software मधले खूप सभासद झाले तर नविन software व्यावसायिकाला थोडे थांबावे लागेल पण Manufacturing मधल्या एखाद्याला लगेच प्रवेश मिळू शकेल.

७. प्रत्येक सभासदाला त्याच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी एक धागा(एक पान) तयार करता येईल. ते त्यांना कितीही वेळा बदलता येईल. इतर सभासद त्या पानावर प्रतिक्रिया लिहू शकतील.

८. हा नेटवर्किंगचा ग्रूप आहे, मार्केटिंगचा ग्रूप नाही. त्यामुळे एकमेकात देवाणघेवाण अपेक्षित आहे. फक्त जाहिरातीची जागा नाही. #७ मधे लिहल्याप्रमाणे सुरूवातीला दिलेल्या व्यवसायाच्या माहिती व्यतिरिक्त पोस्टस,मेसेज,फोन,मेल स्वरुपात सततची जाहिरातबाजी करून इतर सभासदांना त्रास देऊ नये.. सभासदांकडुन तशी तक्रार प्रशासनाकडे आल्यास सभासदत्व रद्द होऊ शकते.
ज्यांना जास्त जाहिरातीची गरज आहे त्यांना मायबोलीवरच्या इतर जाहिराती सुविधां उपलब्ध आहेत.

९. NO means NO. ग्रूपमधे एखाद्या व्यक्तिने तुम्हाला मदत करण्यास नकार दिला किंवा असमर्थता दर्शवली तर त्या व्यक्तीला परत मायबोलीद्वारे किंवा बाहेरून संपर्क करू नये. या नियमाचे ३ पेक्षा जास्त वेळेस उल्लंघन केल्यास सभासदत्व रद्द केले जाईल.

तुमच्या सोयीनुसार , ग्रूपचे सभासद होण्यासाठी खालील स्वयंसेवकांशी मायबोलीची संपर्क सुविधा वापरून संपर्क करावा.
अ)संपर्कात तुमचा दूरध्वनी आणि तुमच्यासाठी सोयीची वेळ कळवावी. ब) वर #२ मधे लिहल्याप्रमाणे जाहीरपणे स्वतःच्या व्यक्तिरेखेत नाव, आडनाव, गाव, देश, आणि व्यवसायाबद्दल माहिती प्रकाशित करावी.

मुंबई
मिलिंद माईणकर (भ्रमर)
दीपक कुलकर्णी (डुआय)

पुणे
दीपक ठाकरे (साजिरा)
मयूरेश कंटक (मयूरेश)

उत्तर भारत
अल्पना खंदारे (अल्पना)

दक्षिण भारत
अश्विनि खाडिलकर (अश्विनीमामी)
नवीन केळकर (शुभंकरोति)

अमेरिका पूर्वकिनारा
अनिलभाई सांगोडकर(अनिलभाई)
रूपाली महाजन(रूनी पॉटर)
अजय गल्लेवाले (अजय)

अमेरिका पश्चिमकिनारा
भाग्यश्री कुलकर्णी-करकमकर (बस्के)
समीर सरवटे (समीर)

कॅनडा
वैशाली कालेकर (आशि)

युके
अदिती हिरणवार (punawa)

ऑस्ट्रेलिया
निलेश डोंगरे (चंबू)
निनाद कट्यारे (निनाद)

दुबई
कामिनी फडणिस केंभावी (श्यामली)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा,
हा कामाचा बिबि आहे.
मला या बिबिच्या Touch मधे राहायचं आहे, पुढे उपयोग होईल.
बाकी हा बीबी जरा जोर धरुदया, म्हणजे तसं काय काय करता येऊ शकतं याचं एकदा अंदाज आला की पुढे सदस्यत्वासाठी अर्ज टाकणार.

निवडक १० त टाकलाय, हरवु नये म्हणुन.

अजय, ज्यांना पुढे मागे उद्योजक व्हायचं आहे पण आत्ता कशातच काही नाही अशांनी सभासद झालं तर चालेल का?

सायो,सहा नं.चा निकष वाच. उद्योजक होऊ इच्छिणार्‍यांनाही सभासदत्व मिळु शकतं...
फक्त सभासदत्व मिळाल्यांतर ग्रुपवर ज्या काही चर्चा,विचारांची देवाणघेवाणं होईल त्यात सक्रीय सहभाग अपेक्षित आहे...

जे सभासद होऊ इच्छूक आहेत पण सध्या काहिच व्यवसाय करत नाहीत ते खालील प्रकारे माहिती भरू शकतात.
-सध्या व्यवसाय्/नोकरी नसल्यास पूर्वी काही नोकरी व्यवसाय केला त्या क्षेत्राबद्दल लिहू शकतात.
-आधी काहिच केले नेसल्यास कुठल्या क्षेत्रात शिक्षण केले आहे त्याबद्दल लिहू शकतात. शिक्षण चालू असल्यास कुठल्या क्षेत्रात शिक्षण चालू आहे ते लिहू शकतात.
-गृहिणी असल्यास गृहिणी हा व्यवसाय म्हणून लिहू शकतात. त्यात लाजण्यासारखे काही नाही. उलट गृहिणी या उत्तम Multitasker आणि Manager असू शकतात आणि काही उद्योगात/व्यवसायात त्यांना प्राधान्यही मिळू शकते.

नगरी, तुम्ही मायबोलीची संपर्क सुविधा वापरून मला तुमचा फोन नं आणि सोयीची स्थानिक वेळ कळवलीत तर आपण फोन वर बोलू शकू. त्या अगोदर कृपया वर लिहल्याप्रमाणे तुमच्या व्यक्तीरेखेत नाव, आडनाव, गाव, देश, आणि व्यवसायाबद्दल माहिती प्रकाशित करावी.

इथे संपर्क करा

मी माझा व्यवसाय अजुन सुरु केला नाही आहे. आणि बेसिकली तो अतिशय स्मॉल स्केल असणार आहे.तर मला उद्योजक मध्ये सभासदत्व मिळू शकेल का?

सध्या कुठल्याही व्यवसायासाठी प्रतिक्षायादी नाही. त्यामुळे सदस्यत्वासाठी बाकीचे टप्पे पूर्ण केले की सभासद होता येईल.

सभासद होऊ ईच्छिणार्‍यांनी कृपया वरील माहिती नीट वाचावी. बर्‍याच वेळा सभासद्त्वासाठी संपर्क साधला जातो परंतु उपरोक्त माहिती व्यक्तिरेखेमधे भरली नसते. तरी व्यवस्थित माहिती भरुन मग संपर्क करावा ज्यायोगे सभासदत्वासाठी शिफारस लागलीच करता येईल, अर्थात शहानिशा केल्यवरच!

राहुल
http://www.maayboli.com/node/1554 इथे लिहीलय देवनागरीत कसे लिहायचे याबद्दल किंवा तुम्ही लिहीताय त्या बॉक्सच्या डोक्यावर प्रश्नचिन्ह आहे निळ्या रंगात त्यावर टिचकी मारा.

>>माहिती जाहिरपणे व्यक्तिरेखेत लिहणे आणि तशी कायम लिहलेली ठेवणे आवश्यक आहे.

जाहिरपणे म्हणजे नक्की कुठे? माझे सदस्यत्व या ठीकाणी का? आणि ती माहिती कोणाकोणाला दिसेल?

स्वप्निल

Hi, Good evening, can anybody here who guide me... i am facing problem in writting in marathi. Actually i was told to click on question mark in one box by Rony. Thanks Rony for your response but where is it. I relly thankful to you, if you pls help me .. thanks & regards.. rahul nikale

माझे नाव विजयकुमार कणसे असुन माझा स्वतःचा हाउसकिपींग चा व्यवसाय आहे. माझे कार्यालय मुंब ई येथे असुन पुणे, कोल्हापुर व नाशिक येथे ब्रान्चेस आहेत. मला ह्या मराठी उद्योजक ग्रुप चे सभासदत्व हवे आहे ....काय करावे लागेल.

भ्रमर, तुम्हाला दोन्दा संपर्क केला. तुम्ही लिहिलेत तसे बदलही केलेत, तरी अजुन सभासदत्व नाहीये Sad काय करावे बरे?????//

साधना,
भ्रमर यांनी दोन आठवड्यांपूर्वीच तुमच्याबद्दल कळवले होते. कामानिमित्त मी प्रवासात असल्याने माझ्याकडून राहून गेले होते. सॉरी. तुम्हाला सभासद केले आहे.

मला या ग्रुप् चे सभासद्त्व हवे आहे.काय करु?
मयुरेश,दीपक ठाकरे मला परिचयाचे आहेत्.दीपक मला २३ वर्षा पासुन ओळखित आहे.
कळवा.

महादेव, मला माझ्या मायबोली ई-मेल सेवेद्वारे एक फॉर्मल मेल कर रे की तुला सभासद व्हायचय या ग्रुपचा म्हणुन... त्यात तुझा भ्रमणध्वनी क्रमांक दे.. शिवाय तुझ्या मायबोली प्रोफाईलमध्ये तुझी सध्याची व्यावसायिक माहिती दे..

Pages