विजक आणि विजकविद्या

ऊर्जेचे अंतरंग-१४: वीज, विजक आणि विजकविद्या

Submitted by नरेंद्र गोळे on 10 December, 2009 - 04:27

आकाशातून पडणारी वीज हा ऊर्जेचा एक लोळच असतो. या लोळातील ऊर्जा, असंख्य ऊर्जाकणांनी बनलेली असते. या प्रत्येक कणांवर किमान काही परिमाणात ऊर्जा असतेच असते. किमान ऊर्जेपेक्षा जास्त ऊर्जा धारण करणारे कण अतिरिक्त ऊर्जेच्या प्रमाणानुरूप गतीमान तरी असतात किंवा विद्युत भार तरी धारण करत असतात. अशा कणांतील ऊर्जा, त्यांना त्यांच्या वस्तुमानामुळे, विद्युत भारामुळे आणि गतीमुळे प्राप्त झालेली असते. वस्तुमानाने सर्वात लहान, किमान ऊर्जा धारण करणार्‍या, तसेच किमान विद्युत भार धारण करणार्‍या अशा कणाला "विजक" म्हणतात. वीज तयार करतो तो (वीज+ कण) "विजक". विजकांचा अभ्यास करणार्‍या शास्त्रास "विजकविद्या" म्हणतात.

Subscribe to RSS - विजक आणि विजकविद्या