Submitted by शिवम् on 2 August, 2013 - 14:57
नमस्कार माबोकरांनो,
सध्या मी इंजिनिअरींगच्या पहिल्या वर्षात असून मला त्याबरोबरच UPSC ची तयारी करण्याची इच्छा आहे .ज्यामुळे माझ्या हातात असलेल्या चार वर्षांचा मला EFFICIENT वापर करता येईल. याबद्दल अधिकाधिक माहिती मिळावी हीच इच्छा !!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अगदी मनापासून (टिंगल
अगदी मनापासून (टिंगल उडवण्याचा कुठलाही हेतू मनात न बाळगता) सांगतेय, मायबोली वर घालवण्याचा वेळ पहिल्या दिवशीपासून नियंत्रीत करा. माबो चं 'सहज चक्कर टाकणे ते पडीक रहाणे' कधी होतं हे कळत नाही. आणि युपीएससी हे अतिप्रचंड ध्येय आहे, म्हणून जरा जपून.
रोज किमान ३ वृत्तपत्र वाचणे, त्याच्यातून नोट्स काढणे इत्यादी सगळ्याच गोष्टी नियमीत सुरु करा.
द हिंदु हे वृत्तपत्रं अतिशय उपयोगाचं आहे. सामान्य ज्ञान जितकं वाढवू शकाल, तितकं उत्तम. स्वतःसाठी एक ठोस असा नॉलेज बेस तयार करा, त्यासाठी विविध विषयांवरची वाचाल तितकी पुस्तकं कमीच आहेत.
तुमच्या ध्येयासाठी खूप खूप शुभेच्छा!!!
धन्यवाद !!
धन्यवाद !!
लोकसत्तामध्ये काही
लोकसत्तामध्ये काही दिवसांपूर्वी दररोज यूपीएससीसाठी मार्गदर्शनपर सदर चालवले जात होते.
http://www.loksatta.com/kg-to-college-news/upsc-question-papers-with-ans...
http://www.loksatta.com/kg-to-college/page/18/
धन्यवाद मयेकरजी...
धन्यवाद मयेकरजी...
अभ्यास करा
अभ्यास करा
अहो अत्ताच इन्जीनियरिन्गला
अहो अत्ताच इन्जीनियरिन्गला प्रवेश मिळालाय ना जरा मजा घ्या की ...मग पुढे आहेच की करियर वगैरे
थेंबे थेंबे तळे साचे... तशी
थेंबे थेंबे तळे साचे... तशी UPSC ची तयारी करा.
"जशी पीच तसा खेळ" यानुसार, जशी परिक्षा तशी तयारी.
१. सगळे जुने पेपर्स मिळवा.
२. याआधी ज्यांनी UPSC पास केलीय त्यांच्या मुलाखतीतुन त्यांनी कशी तयारी केली होती ते नोट करा.
३. प्रत्येक अभ्यासाच्या नोटस घ्यायची सवय करा.
४. प्री आणि मेन्सला कोणते विषय घेणार हे आत्ताच ठरवा.
५. त्यानुसार त्या विषयाचे जुने पेपर्स सतत सोडवुन बघा.
६. नुस्ताच अभ्यास महत्त्वाचा नव्हे, तर पेपर्स कमीतकमी वेळात कसा सोडवावा, हे शिकुन घ्या.
७. सोबत मुलाखतिचे तंत्रही शिकुन घ्या.
८. आणि शिवटच आणि महत्त्वाचं :- सल्ला द्यायला कोणाच्या बापाचे काहीच जात नाही (अगदी माझ्यासकट), त्यामुळे ऐकावे जनाचे करावे मनाचे.
शुभेच्छा.
अगदी मनापासून (टिंगल उडवण्याचा कुठलाही हेतू मनात न बाळगता) सांगतेय, मायबोली वर घालवण्याचा वेळ पहिल्या दिवशीपासून नियंत्रीत करा. माबो चं 'सहज चक्कर टाकणे ते पडीक रहाणे' कधी होतं हे कळत नाही. आणि युपीएससी हे अतिप्रचंड ध्येय आहे, म्हणून जरा जपून.>>>>>>>>>>>+१००००००
लोकसत्ताच्या दर सोमवारच्या
लोकसत्ताच्या दर सोमवारच्या करिअर वृत्तांत या पुरवणीतही यूपीएससीबद्दल मार्गदर्शन असते. आज वैकल्पिक विषय कसा निवडावा याबद्दल आहे.
कालेजात बघतो
कालेजात बघतो ...
सांगितल्याबद्दल धन्स...
विजयजींचेही आभार....
क्लास लावा तिथे बरीचशी माहिती
क्लास लावा
तिथे बरीचशी माहिती मिळते
वरील सर्वाशी सहमत. तुम्ही जो
वरील सर्वाशी सहमत.
तुम्ही जो विषय निवडाल त्यावर तुम्हाला झोपेत प्रश्न विचारले तरी सोडवता यायला हवेत. जे मित्र, नातेवाईक ही परीक्षा देऊ इच्छीता किंवा प्रयत्नात आहेत, अशांशी संपर्क ठेवा. सर्कल/स्टडीगृप तयार करा. परीक्षा केव्हा द्यायची आहे त्यानुसार क्लास व इतर अभ्यासाचा आराखडा तयार ठेवा.
डीग्री तर तुम्हाला मिळवायचीच आहे, त्यावरचा फोकस उडता कामा नये.
वृत्तपत्र वाचण्याबद्दल पूर्ण सहमत. रोज 'चांगली', 'माहीती देणारी' वृत्तपत्र वाचण्याची सवय असावीच. तुम्ही जो विषय निवडाल त्याची शैक्षणिक पुस्तकं मिळवून वाचणे.
शुभेच्छा!
बोलू का?
बोलू का?
नको. नव्या पोस्टी बघायला
नको.
नव्या पोस्टी बघायला धागाजनक डोकवतात. अभ्यास बाजूला पडतो.
जनकांनी डोकावून काय
जनकांनी डोकावून काय उपयोग?
दुपटे ओले झाले आहे असे पाहून जनिक आधी ईऽऽ करतात (मनातल्या मनात) अन मग नंतर जनिकेला हाक मारतात.
धागे हसतात मग त्यांच्या जनकांना
सर्वांचे आभार...
सर्वांचे आभार...