पाताल लोक

Submitted by सान्वी on 28 May, 2020 - 06:05

नमस्कार,
आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी आधीच ही सीरिज पहिली असेल, किंवा काहीजण आत्ता पाहत आहेत. सर्व कलाकारांचे दमदार अभिनय आणि वेगवान कथा ह्या बलस्थानांमुळे मलाही ही सीरिज प्रचंड आवडली. या धाग्यावर स्पोईलर सकट चर्चा करायला नक्की आवडेल मला, म्हणून हा वेगळा धागाप्रपंच...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

काही स्पॉयलर असतील:

पाताल लोक बघितल्या बघितल्या खूप काही लिहावसं वाटलं होतं. पण वेळच मिळाला नाही. इथं आता टप्प्या टप्प्याने लिहीत जाईन.
सर्वप्रथम मला हि वेब सिरीज म्हणजे सेक्रेड गेम्सला प्राईमच उत्तर अशीच वाटली. अगदी त्याच धर्तीवर धक्के, बॅक स्टोरीज आणि मुक्त चित्रण. पण तरीही बऱ्याच वेळा पाताल लोक उजवी वाटते. आताच्या राजकारणाच्या जवळ जाणारी वाटते.
जयदीप अहलावतने हाथिराम चौधरी काय रंगवलाय! जबरदस्त! एक सहृदय, सिस्टीम खाली दबलेला आणि संधीच्या शोधात असणारा पोलीस ऑफिसर त्याने जबर रंगवलाय. हो त्याचेही काही अवगुण आहेत, पण इट्स ओके. तेच त्याला माणूस बनवतात. शेवटच्या एपिसोड मध्ये वरिष्ठांसमोर ताठ उभा राहणारा, मेहराला सुनावणारा आणि पुन्हा गणवेश चढवणारा हाथिराम भारीच! भलेही तो जिथे आहे तिथेच परत आलाय, पण आता त्याच्याकडे अनेक पत्ते आहेत, ही फिलिंग सुखवणारी ठरते.
नीरज कबीने रवीश कुमारच डोळ्यासमोर उभा केलाय. त्याचे मारेकरी पकडले जातायेत, त्याच्या जीवाला धोका आहे, मात्र त्याचाही तो मस्त वापर करतो.
गुल पनाग इतकी साधी पहिल्यांदा दिसली. पण ती गरीब बिचारी कुठेही नाही. उलट थप्पड का जवाब थप्पडसे देणारी... मस्तच.
अन्सारीही शोभून दिसलाय. स्मार्ट, हाथिरामला सपोर्ट करणारा. स्वर्ग लोकातल्या एटीकेट्सची जाण असणारा Lol
अभिषेक बॅनर्जी तितकासा शोभला नाही. राजेश शर्मा आणि अनुप जलोटा छोट्या छोट्या रोल मध्ये भाव खाऊन जातात. दुनलियाचा आवाज मला आधी पियुष मिश्राचा वाटलं होता. पण तो कुणी वेगळाच आहे.
कॅमेरावर्क, लोकेशन्स अप्रतिम. चित्रकूट जशाच्या तसं उभं केलंय...
आणि एकाच सीजन मध्ये काहीतरी ठोस एन्ड दाखवला हि सगळ्यात बेस्ट गोष्ट.

अजून एक. बऱ्याचदा हि सिरीज सुद्धा छुपा हिंदूविरोधी अजेंडा चालवतेय का अशी शंका येते. मात्र कश्यपच्या तुलनेत न्यूट्रल आहे.

सगळ्यात बेस्ट अन्सारी . >>> हो, अन्सारी स्कुल गन prblm मस्त सोडवतो. किती छान सिच्युएशन handle करतो.

हम लोगची छुटकी आहे यात लेडी सी बी आय ऑफिसर.

जयदीप अहलावतने हाथिराम चौधरी काय रंगवलाय! जबरदस्त! एक सहृदय, सिस्टीम खाली दबलेला आणि संधीच्या शोधात असणारा पोलीस ऑफिसर त्याने जबर रंगवलाय. हो त्याचेही काही अवगुण आहेत, पण इट्स ओके. >>>> छान वर्णन.

माझे आवडते सीन्स
१) सुरुवातीची पाताल लोक गोष्ट
२) थप्पड का जवाब थप्पड से Lol
३) हाथीराम गन द्यायला जात असताना त्याच्या शिव्या आणि नंतर केलेली धुलाई.
४) कान बंद कर. (आणि मग पुन्हा शिव्या सुरू)
५) तलरेजा श्रीच एमपायर
६) अन्सारी मुलीला गाडी ठोकतो, आणि त्यानंतर हाथीराम त्यावर वैतागतो.
७) तेरा ताउ पहले से सस्पेंड बैठा पडा है
८) अन्सारीचा प्रिंसिपल बरोबर संवाद. सिक्रेट मिशन

अजून खूप आहेत. लिहीन सावकाश

ह्या सिरीज चा डायरेक्टर ती मराठी हिरोईन कादबरी कदम म्हणुन आहे ना तिच्या नव्हरयाने अविनाश अरुण ने केलीय...

अन्सारी फार गोड आहे. हाथीराम व त्याच नातं खूप भावलं. सगळ्यांचीच कामे अप्रतिम! ट्रेनमधला चोरीचा सीन आधी समजलाच नव्हता नंतर लिंक लागली. अंजू, हो ती हमलेगची छुटकीच आहे.

नीरज कबीने रवीश कुमारच डोळ्यासमोर उभा केलाय. त्याचे मारेकरी पकडले जातायेत, त्याच्या जीवाला धोका आहे, मात्र त्याचाही तो मस्त वापर करतो. >> ही सिरीज तहलकाच्या तरूण तेजपालची कादंबरी The Story of my Assassins वर बेस्ड आहे.. आणि मेहराचे कॅरॅक्टर तरूण तेजपालवरच बेतलेले आहे/असावे.

ट्रेनमधला चोरीचा सीन आधी समजलाच नव्हता नंतर लिंक लागली. >>> मी दुसऱ्या धाग्यावर विचारलं आहे तेच का. तो चीनी मुलगा म्हणजे चोरलेल्या मालातले पावडर, लिपस्टिक लावणारा छोटा मुलगा.

यातलं गुर्जरांच्या मुखियांचं पात्रं निर्भय गुर्जर वरून बेतलेलं आहे असं वाटलं. कदाचित मूळ कादंबरीत त्याचे तपशील वेगळे असावेत. मूळ कादंबरी वाचावी लागेल. ट्रू स्टोरी आहे कि मसाला आहे हे कळत नाही.
बुंदेलखंडातील गुर्जर हे भयंकर अंधश्रद्ध लोक असतात. यांची एक कुठलीशी देवी आहे. त्यामुळे तिचा पुजारी हा फार महत्वाचा असतो. पुजारी ज्याच्या मागे तो सत्ताधारी (जमातीचा) असा मामला आहे. निर्भय गुर्जर हा बहुतेक भूमिहीनांच्या आंदोलनाचा पुढारी. पुढे तो डाकू कसा बनला हे माहीत नाही. पण डाकू म्हणून त्याचू कारकीर्द गाजली. इतरांसाठी हैवान पण गुर्जरांसाठी तो रॉबीनहूड होता. भूमिहीनांच्या फसवणूकीला त्याने बंदूकीने उत्तर दिलं. नीट लक्षात नाही. पण तो मारला गेला कुणीतरी टीप दिल्याने.

मेहरा हे पात्र रवीशकुमार नाही. पण रवीश कुमारवरून बेतलं आहे. ते जरी तरूण तेजपाल ची कहाणी सांगत असले तरी. त्याचं दिसणं, पांढरे झालेले केस आणि एकूण लुक्स रवीशकुमारची आठवण करून देणारे आहेत. नाहीतर एक शेंडी दाखवली असती तरूण तेजपालप्रमाणे. त्याने कथेला फरक पडत नाही.

मूळ कादंबरीत हाथीराम चौधरीचे एव्हढे तपशील असतील का ? नक्कीच नसतील. वेबसिरीज बनवताना हाथीराम चौधरीला मध्यवती ठेवले गेले असावे. तरुण तेजपालने जर मूळ कादंबरी लिहीलेली असेल तर ती पत्रकाराच्या नजरेतून असायला हवी. इथे हा पत्रकार एक पात्र बनून येतो. कथा इन्स्पेक्टरच्या नजरेतून उलगडते. त्यामुळे ती तटस्थपणे उलगडत जाते. हा बदल जर असेल तर अत्यंत महत्वाचा बदल आहे हा.

काही गिमिक्स मात्र खूपच स्टिरीओटाईप आहेत. म्हणजे जेव्हां जेव्हां या गुन्हेगारीकडे वळालेल्या पात्रांची कथा सुरू होते तेव्हां तेव्हां त्यांच्या समाजाचे मोर्चे निघत असतात. हा योगायोग नंतर खटकण्याइतका रिपीट झाला आहे. अन्सारी जातो त्या गावातही तेच आणि चित्रकूटला हाथीराम जातो तेव्हांही तेच. एव्हढं चालायचंच पण.

मालिकेचा वेग अत्यंत संथ आहे. नंतर आपण त्या संथ प्रवाहाशी ट्यून होऊन जातो. वेगवान अंगावर येणा-या , नुसते धक्क्यातून धक्के देणा-या मांडणीपेक्षा हा संथ गतीचा खोल खोल प्रवाह आवडायला लागतो. असं वाटतं खूप काही आहे याच्या तळाशी...

जयदीप अहलावतची रिअल लाईफ कहाणी सुद्धा खूप ऐकण्यासारखी आहे. तो आर्मीत जाण्यासाठी मेहनत घेत होता. पण त्याचे सिलेक्शन झाले नाही. बहुतेक त्याचा अपघात झाला होता. आर्मीचे रस्ते बंद झाल्याने तो निराश झाला. पोलीस सेवेत पण त्याच कारणासाठी घेणार नव्हते. त्या वेळी तो हौस म्हणून थिएटर करायचा. नैराश्य झटकण्यासाठी तो थिएटर करू लागला.
एक दिवस त्याला सिनेमात ब्रेक मिळाला. पण त्याचा रोल दुर्लक्षित रहायचा. अगदी शाहरूखच्या सिनेमातही त्याने काम केले आहे. गुजरातचा लिकर माफिया असलेला सिनेमा नाव नाही आठवत. त्यात मुंबईत तो ज्याच्याकडे येतो तो जयदीप अहलावत. तो त्यात डॉनच वाटला आहे. पण शाहरूख असल्याने त्याच्यावर फोकस गेला नाही. दर वेळी जीव तोडून मेहनत करूनही त्याच्या चेह-याला ओळख मिळत नव्हती.

गँग्ज ऑफ वासेपूर मधे जयदीप अहलावतचे काम जोरदार आहे. पण इथे भाव खाऊन गेला नवाजुद्दीन. त्यामुळे फोकस गेला. नवाजुद्दीनला चांगला ब्रेक मिळाला. राजी मधेही त्याचे काम उल्लेखनीय आहे. पण आलिया भट, विकी कौशल आणि इतरांच्या सर्वांच्या तुलनेत तो पुन्हा विसरला गेला.

अशातच पाताललोक त्याच्याकडे आली. त्याने स्विकारली आणि पुढचा इतिहास आपण बघतोच आहे.

गंग्स ऑफ वासेपुरचा रेफरन्स तुलनात्मकरित्या अस्थानी/चुकीचा वाटतोय.
बाकी काही गोष्टींसाठी धन्यवाद! बऱ्याच नव्या गोष्टी कळल्या!!! Happy

वेबसिरीज च्या धाग्यावर प्रश्न विचारला होता.पण उत्तर मिळाले नाही. कुणी सांगेल का.. ग्वाला गुजर आणि वाजपेयी नंतर हात मिळवणी करतात. अचानक हा बदल कसा होतो..

वाजपेयीला गुज्जरला तिकीट द्यायचं नसतं, म्हणून तो त्यागीला अडकवायच बघतो.
मात्र शेवटी ग्वाला गुज्जरला हा प्लॅन हाथीराम कडून कळतो, व तो गुज्जरला सांगतो.
याचा वापर गुज्जर वाजपेयीच्या विरुद्ध करू शकतो, त्याला खुनाच्या आरोपात अडकवण्यासाठी.
म्हणून नाईलाजाने तिकीट द्यावेच लागलं...
अर्थात हे माझं मत...

मला त्या त्यागीच्या टिचरला मुलं मास्टरजी म्हणतात अर्थात obvious आहे म्हणा, तर हा मास्टरजी असेल का असंही डोक्यात आलं.

उद्या पुर्ण होईल बघून, आज नाही होणार, सातपर्यंत बघू.

मी अगदी इंप्रेस झाले आहे patal lok ने.. इन जनरल व जयदीप वाहलावत ने इन particular!
खूप मस्त काम केलंय. मला तो चंदा ला भेटायला जातो तो सीन खूप आवडला..ती दार लगेच बंद करेल..हे समजून...आधीच पाय अडवतो ते. ती म्हणते..कौन टोप सिंह..? त्यावर...ये भी सही हैं! वो बेचारा उधर सी का tatoo lagaye ghum raha hai..aur tum kahati ho...kaun top singh....
मस्त म्हणतो.
मलाही शेवटी ग्वाला गुजर v बाजपेयी एकत्र कसे दाखवले ते कळलं नाही.
आणि अजून एक... ग्वाला ला दुनालिया चा मृत्यू इतका secret ठेवायचं होता...तर मग जन्म मृत्यू विभागात तरी का नोंदणी केली?
हाथी राम ल तिथूनच समजते ना?

अजून एक प्रश्न पडला मला की, गुज्जर आणि वाजपेयी ची हातमिळवणी झालेली दाखवतात( तेही पुरेसं पटलं नाही पण असो) तर याचा फायदा म्हणून हाथीराम ला त्याचा गेलेला जॉब मिळतो. काय संबंध?

ग्वाला, वाजपेयीवर शेवटच्या दोन भागात जास्त फोकस आहे का, माझे आज 7 बघून झाले.

हातोडा इतकी परीक्षा देतो ज्याच्या जवळ जायला, तो दोनालिया ना, तो कायम घोंगडी तोंडावर ठेवतो आणि त्याच्या बोटात खूप अंगठ्या असतात.

राजी मधेही त्याचे काम उल्लेखनीय आहे. पण आलिया भट, विकी कौशल आणि इतरांच्या सर्वांच्या तुलनेत तो पुन्हा विसरला गेला. >>> बरोबर, ओळखीचा वाटला पण आठवत नव्हता एवढा.

हो अंजू, तोच म्हणजेच चिनी >>> थँक यु. हो पुढे बघितली स्टोरी. फार वाईट वाटलं त्या कॅरॅक्टरबद्द्ल, लहानपणापासून वाताहात. बालमित्र चांगला असतो, बालपणी वाचवायचा प्रयत्न करतो त्या शाकालपासून पण वाचवू शकत नाही.

अनेक रस्त्यावरच्या लहान मुलांचं बालपण फार व्यथित करुन जातं Sad .

शिव्या आणि घाण भाषेचा इतका मुबलक वापर मला खटकतो मात्र, जाम त्रास होतो ऐकताना. इतक्या सढळपणे गरजेची नव्ह्ती, प्रतिकात्मक एक दोन वाक्यात लक्षात येतं. जरी वास्तव असलं तरी, कमी प्रमाणात अशी भाषा वापरली असती तरी ओवरऑल इम्पॅक्ट कमी झाला नसता असं माझं पर्सनल मत.

अश्लील सीन्स उगाच घुसवले आहेत. चिनी शाकाल च्या रेप सिन दाखवण्याची काय गरज होती? न दाखवताच तो इतका परिणामकारक झाला आहे प्रसंग.

हाथीरामचे काम करणारा खरोखरच एक जबरदस्त अभिनेता आहे. त्याला अशाच अनेक संधी मिळोत.
बाकी न्यूज अँकर, अन्सारी, बाकीचे अभिनेतेही उत्तम काम करतात.
एकंदरीत खिळवून ठेवणारी मालिका आहे. बरीचशी वास्तववादी. शिव्या आणि सेक्स थोडा कमी असता तरी मालिका तेवढीच परिणामकारक ठरली असती.

अन्सारीचे पात्र हे केवळ मुसलमानांचे उदात्तीकरण आणि हिंदूंच्या "जात्यंधपणावर" टीका करायला मिळावी म्हणून घातले आहे. कुठलाही दुर्गुण नावालाही नाही. आणि बाकीच्यांचे टोमणे बिनातक्रार सोसण्याची अफाट स्थितप्रज्ञता, प्रचंड हुषारी इ. इ. पण त्याने आपले काम चोख केले आहे. (You can't help but like him!)

हिंदू आणि अन्य (बिगर मुस्लिमाची) लोकांची बदनामी अनेक ठिकाणी आहे. काही वेळा उघड तर काही वेळा तरल. घरवापसीचा एक उल्लेख आहे, भगवे कपडे घातलेले अत्यंत हिंसक लोक काही मुसलमान लोकांना मारतात, शीख लोक खालच्या जातीच्या लोकांवर अत्याचार करतात, गुर्जर लोक तर काही विचारू नका. अनेक प्रसंगात जिथे राजकीय, सामाजिक दहशत, क्रौर्य दाखवायचे असेल तिथे देवांच्या मूर्ती, नदीचा घाट, हिंदू लोकांचे तर्पण वगैरे विधी अगदी ठसठशीतपणे पार्श्वभूमीवर दिसतात हा योगायोग वाटत नाही. एक उद्देश ठेवून रचलेली दृश्ये आहेत.

रेल्वे स्टेशनाच्या परिसरात भिकारी म्हणून लहानाचे मोठे झालेले लोक, त्यांना काय भयानक आयुष्य जगावे लागते ह्याचे थोडे दर्शन ह्या मालिकेत होते आणि प्रचंड विषण्ण वाटते. ते वास्तव भयानक आहे!

स्क्रिप्ट जबरदस्त आहे. महत्त्वाच्या प्रत्येक पात्रामागे स्वतःची काहीतरी कहाणी आहे. आणि ती लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

गुड कमेंट.

मी अजून सात एपिसोडस बघितले आहेत, दोन बघायचे आहेत.

खरंच शिव्या आणि काही दृश्ये टाळता येण्यासारखी होती, साधारण अंदाज आला की मी forward करायचे.

मालिका जबरदस्त खिळवून ठेवते.

शेवटचा गुज्जर आणि बाजपेयीचा गोंधळ मला काही कळला नाही .
चंदा , बाजपेयी , ग्वाला , मास्टरजी , त्यागी वगैरे सगळ्यांचे कनेक्शन नीटसे लागले नाही .
बाकी एकत्रित परिणाम बघता सिरिज आवडली.

मला त्या न्यूज चॅनेल वल्याच्या बायकोचे काम आवडले
खूप साधी, प्रेमळ, हतबल होऊनही अजिबात आकांडतांडव न करता आपल्या पद्धतीने ठणकावून आयुष्य जगणारी
आणि आधीच्या सीन्स मध्ये ताण आल्यावर श्वास घेताना होणारा त्रास वगैरे इतकं जबरदस्त घेतलं आहे

मला असं समजलंय ..
मोठा गुज्जर उर्फ दुनळीया उर्फ मास्टरजी आणि वाजपेयी यांचे एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ असे नाते असत... दुनळीया ला समाज मानत असतो आणि त्याचा समाजावर होल्ड असतो. तो त्याचा उपयोग वाजपेयीला निवडणूक जिंकण्यासाठी करत असतो ..बदल्यात वाजपयी त्याला रस्त्याची कामे करण्याचे कंत्राट देत असतो. पैश्याचा हिशोब सगळा ग्वाला बघत असतो.
पण काही कारणामुळे दुनळीया मरतो पण तो मेला ह्याची खबर गुप्त ठेवलेली असते. कारण समाजा वरचा होल्ड जाईल म्हणून.

वाजपेयी ला पण दुनळीया आता नको असतो पण तो तर मेला . मग त्याचा एकनिष्ठ हाथोडा त्यागी त्याची जागा घेणार ..त्याला अडकवून त्याचा एंकॉउंटर करण्यासाठी आणि पार्टीला नॅशनल लेवल वर नाव मिळण्यासाठी तो त्याला नीरज कबी ला मारायला पाठवतो . म्हणून DGP आणि त्याची टीमची त्याच्यावर पाळत असते . एक दगडात दोन शिकार .. पण तो त्यागी त्याला मारत नाही कारण त्याला मास्टरजीशी बोलायच असत. त्याला ते पुलावरच मारणार असतात पण ट्रॅफिक मध्ये एक मीडिया ची गाडी असते.
ग्वाला विरुद्ध पार्टी कडून निवडणूक लढवणार असतो पण जेव्हा त्याला हाथिराम कडून हे कळत तेव्हा तो वाजपेयींला ब्लॅकमेल करून त्याच्या पार्टीकडून तिकीट मिळवतो.
ग्वाला ला वाजपेयींशी मिळवल्यामुळे हाथिराम ला त्याची नोकरी परत मिळते.

Pages