डोंट होल्ड योर ब्रेथ @जॅक...

Submitted by राज on 24 July, 2020 - 21:25

वी लिव इन इंटरेस्टिंग टाइम्स...

गेल्या वर्षी डिसी मधे मोठ्या संख्येने हायस्कुल स्टुडंट्सनी प्रो-लाइफच्या समर्थनांत निदर्शने केली. रो व. वेडच्या निकाला संदर्भात. निक सँडमन हा त्यातलाच एक. साधारण त्याच वेळेस डाकोटा अ‍ॅक्सेस पाइपलाइनच्या संदर्भात निदर्शने डिसी मध्येच होत होती. नेथन फिलिप्स, एक नेटिव अमेरिकन अ‍ॅक्टिविस्ट त्या निदर्शनात सहभागी होता. योगायोगाने, त्या दरम्यान लिंकन मेमोरियल्च्या आसपास निक सँडमन आणि नेथन फिलिप्स यांची गाठ पडली आणि दोघांत सॉर्ट ऑफ अन्प्लॅन्ड, अनइंटेशनल शोडाउन झाला. गंमतीची बाब हि कि निकने मागा (मेक अमेरिका ग्रेट अगेन) हॅट घातली होती...

झालं.

सगळ्या ट्रंपविरोधी मिडियाच्या हातात कोलीत मिळालं. त्या प्रसंगानंतरचे बरेच दिवस हा किस्सा सिएनएन, वॉपो, इ. नी चघळुन चोथा केला, कुठल्याहि प्रकारची शहानिशा न करता. कारण एकच - निक वाज वेअरिंग ए मागा हॅट. अशा घटनांमधे सोशल मिडिया एखाद्याला धोपटण्यात नेहेमीच पुढे असते, तेच निकच्या बाबतीत घडलं. ऑब्वियस्ली हि फॉट बॅक, त्याने डेफमेशन सूट फाइल केला - वॉपो, आणि सिएनएन इ. च्या विरोधात.

फास्ट फॉरवर्ड जुलै २०२०. आज बातमी आली कि वॉपो आणि इतर (फेक) न्युज विरोधात निकने केस जिंकल्याची.

तर मंडळी, आताच हा सगळा प्रपंच का? तर, ट्विटरचे संस्थापक/सर्वेसर्वा जॅक डोर्सी यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करुन पोलिटिकल बाय्स (अन्लाइक मार्क झकरबर्ग हु हॅज शोन एक्स्ट्राऑर्डनरी मचुरिटि) निर्माण केला. वाज हि एमिंग पोलरायझेशन? फिगर इट आउट योरसेल्फ...

कुठलाहि आवाज, मग तो विरोधात असो किंवा समर्थनार्थ दाबला जाउ नये. इन्फॅक्ट त्यावर कुठलिहि बंधनं, वेष्टनं (रॅपर), अथवा दबाव टाकला जाउ नये, अ‍ॅटलिस्ट ग्लोबल मिडिया प्लॅटफॉर्मने तरी. थोडक्यात कुठल्याहि प्रकारे ढवळाढवळ किंवा हस्तक्षेप करु नये. हा फ्री सोसायटिचा अलिखित नियम आहे, माझ्या मते...

ट्विटरने ती लाइन क्रॉस केली, आणि निकने त्याला चाबूक उत्तर दिलं - द फाइट इजंट ओवर. टु डाउन, सिक्स टु गो. डोंट होल्ड योर ब्रेथ @जॅक...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिकेतील आयुष्याशी अजिबात परिचय नसल्यामुळे नक्की मुद्दा काय हे कळले नाही.

निक ट्रम्पवाला नसूनही केवळ डोक्यावरच्या टोपीवर जो सामान्य भासणारा मजकूर होता तोच मजकूर ट्रम्पही मंत्रासारखा वापरत असल्यामुळे निकवर ट्रम्पभक्त म्हणजे हल्लीच्या भाषेत अंधभक्त असल्याचा आरोप केला गेला. सोशल मीडिया येण्याच्या काळापूर्वी जी फक्त न्यूज चॅनेल्स होती ती त्यांचे 'लोकांना बातमी द्यायचे' हे प्रमुख काम सर्वसामान्य जनताच करू लागल्यामुळे बेकार झालीत व कुचाळक्या करणे हे सर्वसामान्य जनतेचे लाडके काम आता करू लागलीत. त्यामुळे त्यांनीही निकविरोधी भरपूर कुचाळक्या केल्या. निक अर्थातच अंधभक्त नसल्याने पण हाडाचा अमेरिकन असल्यामुळे त्याने सगळ्यांना कोर्टात खेचून नुकसानभरपाई वसूल केली.

हे मला झालेले ज्ञान.

यात ट्विटरच्या पात्राची कहाणी कळली नाही. त्याच्या मालकाने स्वतःच एकहाती लाखो फेक आईडी उघडून स्वतःच वेगवेगळ्या टोप्या घालून निकविरोधी कुचाळक्या केल्या की सगळे जण ट्विटरवर कुचाळक्या करून स्वतःचा वेळ सत्कारणी लावत असताना स्पोईल्सपोर्टपणा करून त्या कुचाळक्या बंद पाडल्या नाहीत यापैकी नक्की कुठल्या कारणामुळे त्याचा निषेध करण्यात आला हे कळले नाही.

फिगर इट आउट योरसेल्फ...>>>>

या वाक्याची जाम भीती वाटते. जे लोक असली वाक्ये वारंवार वापरतात त्यांचे मुद्दे कित्येकदा कळत नाहीत. त्यामुळे न कळलेल्या मुद्द्यांवर मीच काय ते समजून घ्यावे आणि तेही त्यांच्या मनात जे आहे तेच नेमके समजून घ्यावे ही अपेक्षा कशी जमवावी असा प्रश्न पडतो. मला काहीच कळले नाही असे म्हटले तर 'काय मूर्ख अडाणी बाई आहे, हिच्याशी बोलण्यात अर्थच नाही' असाही लूक मिळतो. अशा वेळी मराठीतील 'हो नं, बघ तर...' वगैरे शब्दप्रयोगांचा खूप आधार वाटतो. Lol

मला समजलेले -

रिपब्लिकन्स 'प्रो लाइफ' = गर्भपात विरोधी आहेत. निक या आंदोलनात सहभागी होता.
मागा (मेक अमेरिका ग्रेट अगेन) हॅट - खास ट्रंपचे स्लोगन आहे.
अर्थातच निक हा ट्रंपचा समर्थक आहे.
_________
नेटिव्ह अमेरिकन अ‍ॅक्टिव्हिस्ट नेथन फिलिप्स व निक यांमध्ये काहीतरी खटका उडाला.
__________
यावर सी एन एन व वॉपो (जी की रिपल्ब्लिकन्स यांच्या विरोधातील वृत्तपत्रे आहेत) त्यांनी कसलीही शहानिशा न करता या खटक्यास जातियतावादी रंग देण्याचा प्रयत्न केला.
______
त्यामुळे निकने या वृत्तपत्रांना कोर्टात खेचलेच परंतु तो अवाढव्य रकमेने केस जिंकला.

.
.

ट्विटरला आता तो कोर्टात खेचायची भाषा करतो आहे. कारण ट्विटरनेही दुफळी माजवायचा प्रयत्न केला होता.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
यामागे रिपब्लिकन्स चा या निक नामक तरुणाला सज्जड सपोर्ट असणारे हे नक्की. बाकी सी एन एन हे अज्जिबात निष्पक्ष वृत्तपत्र नाही हे खरे आहे. सी एन एन वरती एक प्लेसहोल्डर फक्त, ट्रंपला शिव्यांची लाखोली वहायला डेडीकेटेड आहे.

>>>>यात ट्विटरच्या पात्राची कहाणी कळली नाही. त्याच्या मालकाने स्वतःच एकहाती लाखो फेक आईडी उघडून स्वतःच वेगवेगळ्या टोप्या घालून निकविरोधी कुचाळक्या केल्या की सगळे जण ट्विटरवर कुचाळक्या करून स्वतःचा वेळ सत्कारणी लावत असताना स्पोईल्सपोर्टपणा करून त्या कुचाळक्या बंद पाडल्या नाहीत यापैकी नक्की कुठल्या कारणामुळे त्याचा निषेध करण्यात आला हे कळले नाही.>>>> हे मलाही कळलेले नाहीये. ट्विटरने आगीत तेल कसे ओतले?

सामो म्हणजे मला जे कळल्यासारखे वाटले ते पूर्ण चुकीचे आहे. मला निक ट्रम्पविरोधी वाटला पण तुम्हाला तो ट्रम्पसमर्थक वाटतोय.

लेखक इतरांनाही समजेल असे लिहिणार आहे का?

Submitted by साधना on 25 July, 2020 - 14:56
Submitted by सामो on 25 July, 2020 - 17:36 >>>>>
मलाही नाही कळले. पण अमेरिकन आयुष्य आणि समाज व्यवहार याबद्दल काहीच माहीत नाही. किती मुळापासून समजावून घेणार म्हणून सोडून दिले. सामोंच्या प्रतिसादातून थोडे कळले.
अजून अमेरिकन मायबोलीकर लिहीतील तेव्हा वाचेन नाहीतर सोडून देणार.
बहुतेक चुकून खुल्या विभागात राहिलाय धागा.

निकने त्याला चाबूक उत्तर दिलं - द फाइट इजंट ओवर. टु डाउन, सिक्स टु गो. डोंट होल्ड योर ब्रेथ @जॅक... >>> म्हणजे दोन वृत्तपत्रांना धूळ चारली. पण अजून ६ कोण? त्यातील १ ट्विटर असेल तर बाकी ५ कोण? आणि का? मला हे अमेरिकन वाक्प्रचार पण कळत नाहीत.

हायस्कुल स्टुडंट्स -- गर्भपात विरोधी आंदोलनात सहभागी, वृत्तपत्रांवर खटले, कुठला सोशाल मिडीया फ्री सोसायटिचा नियम मोडतोय --- या उचापत्या पण करतात?
अरे, दहावी २ वर्षांवर आली, अभ्यासाला लागा, असं काही नसतं का तिथे?

>>>>>हायस्कुल स्टुडंट्स -- गर्भपात विरोधी आंदोलनात सहभागी, वृत्तपत्रांवर खटले, कुठला सोशाल मिडीया फ्री सोसायटिचा नियम मोडतोय --- या उचापत्या पण करतात?
अरे, दहावी २ वर्षांवर आली, अभ्यासाला लागा, असं काही नसतं का तिथे?>>>>> मला वाटतं इथे तरुणपीढी राजकारण व मुख्यत्वे सामाजिक मुद्द्यांमध्ये खूप सक्रिय असते. मुलगी ज्या युनिव्हर्सिटीत आहे तिथेही असेच वातावरण दिसते. मुलीच्या मैत्रिणी 'ब्लॅक लाइव्ज ममध्येआंदोलने, निदर्शने यांमध्ये सक्रिय होत्या. मुलगीही भयंकर ओपिअनेटेड आहे. आम्ही दोघे रिपब्लिकन्स्ना पाठींबा देतो तर ती डेम्स ना. वरती वाद घालते Happy खरं तर त्यामुळे व एकंदरच माबोवरील चर्चा वाचल्याने, मी ना इथली ना तिथली अशी आहे. म्हणा कोणालाही, एकाच पार्टीचे १००% पटत नाहीच अर्थात पण माझं फारच तळ्यात की मळ्यात आहे.

>>हे मलाही कळलेले नाहीये. ट्विटरने आगीत तेल कसे ओतले?<<
पोलिटिकल व्युज, पोलिटिकल करेक्टनेसच्या बाबतीत डोर्सी हल्ली बराच वोकल झाला आहे. मिडियाने रिपोर्टिंग करावं, कोणत्याहि पक्षाची बाजु न घेता संपुर्ण माहिती वाचकांसमोर मांडावी हे नॉर्मली अपेक्षीत असते. काहि दिवसांपुर्वि डोर्सीने त्याच्या अधिकारांत ट्रंपचं एक ट्विट मॉडरेट केलं. हा असा प्रघात पडणार का, मिडिया एकाच बाजुने प्रापगंडा करणार का, हा संदर्भ घेउन निकने ती कोपरखळी (सॉर्ट ऑफ नज, वॉर्निंग शॉट) डोर्सीला मारलेली आहे...

>>वरती वाद घालते<<
टिनेजर्स किंवा नविन शिंगं फुटलेल्या तरुणांना सोशलिझमची भुरळ असते. आमच्या कडेहि एक आहे. वास्तवाची ओळख होत गेली कि ती भुरळ आपोआप निवळते... Wink

>> म्हणजे दोन वृत्तपत्रांना धूळ चारली. पण अजून ६ कोण? त्यातील १ ट्विटर असेल तर बाकी ५ कोण? आणि का? <<
याचं उत्तर वर दिलेल्या लिंक मधील बातमीत आहे. अ‍ॅक्च्युअली, तिन्हि लंक्स वाचल्यात तर या घटनेची संपुर्ण पार्श्वभुमी लक्षात येईल. Wink

बातमीतला हा तुकडा, तुमच्याकरता -
It’s the teen’s second win in a whopping $800 million defamation battle against a number of news outlets including the Washington Post, CNN, ABC, CBS, The Guardian, The Hill and NBC.

सहावं वृत्तपत्र - सिनसिनाटि एन्क्वायरर बहुतेक...

नवीन Submitted by राज on 25 July, 2020 - 19:59 >>>> ओके कळलं, धन्यवाद
अमेरिकन आयुष्य आणि समाज व्यवहार याबद्दल काहीच माहीत नाही. प्रो-लाइफ, मागा हॅट, डोंट होल्ड योर ब्रेथ @जॅक काही काहीच लिंक लागली नाही + देवनागरी इंग्लिश. मग लिंक उघडल्याच नाहीत प्रामाणिकपणे सांगायचं तर.
सामोंनी लिहीलेले कळले. आता कल्पना आली. थोडक्यात,
कुठल्यातरी आंदोलनात, हजारोंच्या गर्दीत एक आंदोलक कुठली टोपी घालतो यावरून बादरायण संबंध जोडून मान्यवर वृत्तपत्रे आणि वाहिन्या यातील रिकामटेकड्या / कुरापती एक्स्पर्ट लोकांनी ढोल वाजवून गहजब केला; त्या आंदोलकाने त्यातून पैसा आणि प्रसिद्धी मिळवली. चांगलं आहे....

मोठ्या प्रकाशनांनी अशा प्रकारे शहानिशा न करता वृत्त द्यावे हे धक्कादायक आहे. निकने त्यांना वठणीवर आणले यासाठी त्याचे अभिनंदन.
बाकी बायस्ड किंवा एकांगी वृत्तांकन ही कोणा एका बाजूची मक्तेदारी नाही. खुद्द तात्या इतक्या थापा मारतात, तिथे बहुधा ही कोर्टात खेचायची सोय नसावी.

मिडियाने रिपोर्टिंग करावं, कोणत्याहि पक्षाची बाजु न घेता संपुर्ण माहिती वाचकांसमोर मांडावी हे नॉर्मली अपेक्षीत असते. >>> अगदी. फॉक्सबद्दलही अस्संच वाटतं बर्‍याच लोकांना.

राज,

लेख (नसलेल्या) डोक्यावरून गेला

भरत यांच्या प्रतिसादातील मुद्याशी सहमत आहे, लेख थोडा (तरी) कळेल असा हवा होता

माझे ज्ञान अत्यल्प आहे हे मान्य आहे

वरचा लेख वाचून का ही ही कळणार नाही, हे चार ओळींतच लक्षात आलं. काही इंटरेस्टिंग किंवा गंभीर आहे का हे बघायला शोधाशोध केली.
हे वाचून बरंच काही कळलं.

लेख अमेरिकेतील आयुष्य या ग्रुपात आहे त्यामुळे भारतातल्यांना नाही कळला तरी चालेल.

>>मला कळला नाही इतकेच!<<
बेफि, हल्ली अमेरिकेत्ल्या घडामोडिं/बातम्यां माबोवर सगळे वाचतात, प्रतिक्रिया देतात हे माझं निरिक्षण आहे. या घटनेला त्यावेळेस बर्‍यापैकि एक्स्पोझर मिळालं होतं. शिवाय नविन वाचकाच्या दृष्टिकोनातुन वरच्या तिन्हि लिंक्स मधुन ती घटना आणि त्याचे पडसाद बर्‍यापैकि कवर केलेले आहेत. असे असुनहि भरतशेठ सारख्या चतुरस्र वाचकाच्याहि आकलनाच्या मर्यादा उघड्या पडल्याचे बघुन, माझी अवस्था किंकर्तव्यविमुढ का काय म्हणतात तशी झालेली आहे... Proud

अ‍ॅटलिस्ट ग्लोबल मिडिया प्लॅटफॉर्मने तरी. थोडक्यात कुठल्याहि प्रकारे ढवळाढवळ किंवा हस्तक्षेप करु नये. हा फ्री सोसायटिचा अलिखित नियम आहे,>> पण अल्गोरि दम डिझाइन करून अनभिज्ञ व्यक्तीचे मत इन्फ्लुएन्स करून ते मतदान प्रक्रिया बदलायला वापरणे पण बरोबर नाही ना?! फेसबुक सोडले तरी इन्स्टाग्राम व्हाट्सॅप वरून आपला डाटा त्या पेरेंट कंपनीला मिळतच राहतो. त्या मानाने ट्विटर जरा रॉ प्रतिक्रिया पण जनमानसाचे प्रतिबिंब टाइप वाटतात. जे तिथे # ट्रेंडिंग आहे त्या नुसार मते व पोस्टी दीड दोन दिवसात व्हॉत्सेप वर फिरू लागतात व पुढे चार व पाच दिवसात असल्या साय्टींवर धागे निघतात. रेडिट वर इन्सेन फेसबुक. # कॅरन # अ‍ॅन्टी व्हॅक्सर मुव्हमेंट , व्हाइट प्रिव्हिलेज असे # फॉलो केले तर फार रंजक माहिती मिळते.

जनमत वळवणे हे एका अतिशय सॉफिस्टिकेटेड प्रकारे सध्या अमेरिकेत होत आहे. डेमोक्रॅट्स स्टार्तेड द के के के असे मुलांसोबत खच्चुन
ओरडून म्हणणारी व्हाइट उच्चभ्रू बाई हे एक उदाहरण आहे. इतके डोके बाजूला ठेवून वावरणारी लोके आहेत का तिथे खरंच?!

आता निवडणूक होईपरेन्त असे काय काय होतच राहणार. मी जंबो चीज कॅरेमल पॉपकॉर्न बनवून ठेवले आहे. कढईतच आयपी नाहीतर एअर फ्रायर नाही मजकडे.

राज तुम्ही लिहीत जा हो तिथले अ‍ॅक्चुअल स्लाइस ऑफ लाइफ अनुभव वाचायला छान वाट्ते. इंग्रजी मराठी काहीच इशू नाही. तुमचे गॉल्फ कसे चालू आहे.

पण केस सेटल केली म्हणजे जिंकली नाही. ट्रंपतात्यांनी अश्याच अनेक केसेस सेटल करून स्टॉर्मी, ट्रंप युनिव्हर्सिटी स्टुडंट्स वगैरे जिंकले नाहीत हे म्हणतातच की. Wink

धन्यवाद अमा. गॉल्फ माझं विकेंड रुटिन आहे. ऑनेस्टली स्पिकिंग, गॉल्फ इज वन ऑफ दि बेस्ट थिंग्ज हॅपन्ड टु मी आफ्टर कमिंग टु अमेरिका...

गॉल्फ इज वन ऑफ दि बेस्ट थिंग्ज हॅपन्ड टु मी आफ्टर कमिंग टु अमेरिका...
>>>>

ग्रेट !
एक धागा काढा की मग गोल्फवर.
ईथे भारतात ट्रेनमध्ये मोबाईलवर जरी गोल्फ खेळू लागलो तर शेजारचा कॅंडी क्रश खेळणारा आपल्याकडे आदराने बघू लागतो. कारण ईथे लोकांनी चित्रपटातच हा खेळ पाहिला असतो आणि तो देखील एखादी व्यक्ती अतिश्रीमंत आहे हे दर्शवायला तो सीन घेतला असतो Happy
दोन बिल्डींगच्या मध्ये एक गल्ली असते कार पार्क करायला. पण त्या तिथे नसल्या की बॅटरीत स्टंप ठोकून वन्डी टूडी रन्सवाले क्रिकेट खेळले जाणारया या देशात आमच्या पिढीपर्यंत तरी फारच कमी लोकांना गोल्फचे बेसिक नियम माहीत असतील. त्यामुळे सारीच माहिती सारेच अनुभव आमच्यासाठी नवीन असतील. गूगाळलेली माहिती वेगळी आणि मायबोलीवर वाचायला मिळणारे अनुभवसमृद्ध लेखन वेगळे. त्यामुळे खरेच लिहा..
आणि हो, वाटल्यास धाग्याला चेंडू-काठी असे मराठी शिर्षक द्या. जेणेकरून अवांतर वाद टळतील Happy

सोशल मिडीया कंपन्या आणि सामाजिक जबाबदारी हा विषय भारत्/अमेरिका एका देशापुरता मर्यादित नाही. पत्रकारिता आणि त्या अनुषंगाने येणारी प्रसार माध्यमे यात प्रशिक्षित पत्रकार असल्याने निष्पक्षपणा अपेक्षित आहे. पण सोशल मिडीया या देखरेख नसलेल्या खाजगी कंपन्या असल्याने (लॅक ऑफ ओव्हरसाईट), येणारी माहिती ही प्रशिक्षित लोकांकडून येत नसल्याने, इ अनेक कारणांमुळे बेजबाबदार ठरतात/ठरू शकतात. त्याबद्दल अधिक वाचायला आवडले असते.
(इंग्रजी लिहीले तरी चालेल पण लिपी रोमन असेल तर वाचायला सोपे जाते. वेष्टन लिहीलं म्हणून बरं नाय तर मी "लेफ्ट फूट अप राईट फूट स्लाईड" वाला रॅपर समजले असते.)

पत्रकारिता आणि त्या अनुषंगाने येणारी प्रसार माध्यमे यात प्रशिक्षित पत्रकार असल्याने निष्पक्षपणा अपेक्षित आहे.>>>>

ओके. म्हणजे तिकडे प्रसार माध्यमातून जे काम करतात ते प्रशिक्षित पत्रकार असतात का? आमच्या इथे असली जाचक बंधने नाहीत. नशीब, अजून काय?

अगदी प्रत्येकजण नसतो, सगळे नसतात Happy . पण बहुतेक संपादक बी.एस/ बी.ए जर्नलिझम किंवा पोलिटीकल सायन्स असे काही शिक्षण घेतलेले असतात. ह्या लिंकवर बघाल तर प्रत्येक संपादकाच्या पदव्या इ. दिले आहे.
https://helpcenter.washingtonpost.com/hc/en-us/articles/360002940991-Lea...

जाचक बंधने Happy ह्यात थोडं नशीब, थोडी अनास्था. मागे कुठल्या दुसर्‍या धाग्यावर पण मी लिहीले होते- सामान्य वाचक विचारत नाही म्हणून चालतं सगळं. रोजच्या धकाधकीत कुणाला एवढा वेळ हे पटत नाही. आलिया/कंगना यांना लाखभर फॉलोअर्स असतात, भलते भोचक पर्सनल प्रश्न विचारत असतात. पण माझ्यासकट कुणाला वर्तमानपत्राला 'अरे तुमचा पत्रकार काय शिकलाय रे' प्रेमाने विचारायला वेळ नसतो. फोर्थ इस्टेट्च्या अशा अवस्थेला आपणच जबाबदार आहोत... Happy

>>येणारी माहिती ही प्रशिक्षित लोकांकडून येत नसल्याने, इ अनेक कारणांमुळे बेजबाबदार ठरतात/ठरू शकतात. त्याबद्दल अधिक वाचायला आवडले असते.<<
ट्विटर संबंधातला मुद्दा अप्रशिक्षीत लोकांच्या बेजबाबदार लिखाणाचा नसुन ते मॉडरेट करणार्‍या एस्टॅब्लिश्ड मिडियाच्या मुस्कटदाबी धोरणाचा आहे. याच संदर्भातलं हल्लीचं दुसरं उदाहरण न्यु यॉर्क टाइम्सचं (आप-एड सदर) आहे. बाकि, प्रोफेशनल जर्नालिस्ट्सनी प्रापगंडा करणे, एखाद्याच्या मागे हात धुउन लागणे हा विच हंटिंगचाच एक प्रकार आहे...

>> वेष्टन लिहीलं म्हणून बरं नाय तर मी "लेफ्ट फूट अप राईट फूट स्लाईड" वाला रॅपर समजले असते.<<
अहो ते कुठल्या कांटेक्स्ट मधे लिहिलंय ते बघा. मी बोलतो तसंच लिहितो. भाषेचे शब्द ज्या कांटेक्स्ट मधे वापरले (बोलले, ऐकले) जातात तसा त्याचा अर्थ बदलतो. उद्या तुम्हाला कोणि पत्ता शोधताना डायरेक्शन दिलं - गो राइट आफ्टर टु ब्लॉक्स ऑन वॉशिंग्टन अ‍ॅव. तर तुम्हि वॉशिंग्टन अ‍ॅवला पोचल्यावर तिथे मांडि घालुन लिहायला बसणार का?.. Light 1

>>एक धागा काढा की मग गोल्फवर.<<
ऋन्म्या, विचार करतो...

Pages