थेट प्रसारण

Submitted by मंजूताई on 11 May, 2020 - 05:15

सध्या आॅनलाईन वेगवेगळ्या चॅनेल्सवर /फेबुवर वेगवेगळे थेट प्रसारणाचे कार्यक्रम सुरू आहेत. आय ॲम बुध्द चॅनेलवर मागच्या आठवड्यात बरेच कार्यक्रम बघितले. लोकआग्रहास्तव परत काल विकेंडम्हणून दोन कार्यक्रम घेतले एक प्रसून जोशी व काल प्रसिध्द कोलगेट अंताक्षरीच्या सुत्रसंचालिका पल्लवी,दूर्गा जसराज, राजेश्वरी, रेणूका शहाणे ह्यांचा मस्त कार्यक्रम झाला. तसेच सद्गुरू, गुरदेव स्री स्री रविशंकरांचेही प्रवचन,मेडिटेशन असे थेट प्रसारणाचे कार्यक्रम आहेत. असे बरेच असतील अश्या माहितीच्या देवाणघेवाणासाठी हा धागा!
निसर्ग/पर्यावरणप्रेमींसाठी :
निसर्गभान श्रवणमाला

आकार जीवनाला

पुस्तक अभिवाचन

आपलं रोजचं जगणं अधिक आनंददायी व आरोग्यपूर्ण बनवण्यासाठी जरूर ऐका ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ *श्री दिलीप कुलकर्णी* यांच्या *आकार जीवनाला* या पुस्तिकेचे क्रमशः अभिवाचन *दि. १० मे २०२० पासून रोज तीन भागात सलग सहा दिवस* YouTube व Facebook Live वर.

मालिकेच्या सातव्या दिवशी याच विषयावर श्री दिलीप कुलकर्णी स्वतः विवेचन करतील आणि श्रोत्यांच्या निवडक प्रश्नांना उत्तरेही देतील.

प्रसारण कालावधी :
दि १० ते १६ मे २०२०

रोज सायं. ५.०० वा

_Watch Premiere on_
Facebook Live :
https://bit.ly/2YHhvLm

YouTube Live :
https://bit.ly/2W9ESLV

_ टीम निसर्गभान

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users