बी. बी. सी. मराठी (वेबसाइट) वर च्या बातम्या एकांगी असतात का ?

Submitted by यक्ष on 5 August, 2020 - 11:56

अगदी आजचीच बी. बी. सी. मराठी (वेबसाइट) बघत होतो....तशी अधून मधून बघतो....पण मला ती बव्हंशी एकांगी (मुद्दाम काड्या करणारी) अशी वाटते.
आपल्या शेजारच्याचा नेहमीच उल्लेख असतो. बरेच वेळा गडे मुर्दे उखाडून काढ्ण्यासाठी एक केविलवाणा प्रयत्न वाटतो. आज बैरूत ब्लास्ट बद्दल बातमी वाचावी म्हणून उघडले तर 'त्या' देशाची व्यक्तव्ये, जम्मु कश्मीर, बाबरी मस्जिद, ओवेसी आणी मुस्लिम लॉ बोर्ड ह्यासंर्भात ठळकपणे बातम्या आहेत. बैरूत ब्लास्ट बद्दलअवाक्षरही नाही!!
आपला काय अनुभव आहे?
ह्यांचा विचार काय आहे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा हलवण्याचा प्रयत्न केला आहे. क्षमस्व!
कुणातही भांडण लावण्याचा उद्देश नाहीय. आपण कृपया आजचीच स्वतः खात्री करा ही विनंती.
बाकिचे भांडण लावून जातात आणी आपण त्याची दखलही घेत नाही....हे दुर्दैव!

धन्यवाद चिनूक्स!
भयंकर घटना आहे!. त्यात काही दुर्दैवी मृत्युमुखी पावले बिचारे!

ते धागा उघडुन देतात. बाकीची जनता भांडत बसते.
>>> हे तर पुण्य चे काम आहे... एकाच धाग्यावर लोक किती भांडणार? नवीन धागा हवाच...

यक्ष आणि ऋन्मेष एकच नाहीत

कोणीतरी या ब्लास्ट बद्दल माहिती देणारा धागा काढा मराठीत
बघूनच हादरून गेलोय ते विडिओ Sad

आंतरराष्ट्रीय व्यापारी कंपन्या, जहाजे, विमाने पर्यटन या क्षेत्रातील लोक आणि युकेचे स्वत:चे हितसंबंध संभाळणे यांसाठी बातम्या असतात बीबीसीच्या.

बीबीसीच्या बातम्या त्यांचे स्वतःचे हितसंबंध जपणार्‍या; जगात सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले तर ते जपले जाणार नाहीत किंबहुना लोकांमधे फूट पाडली तरच ते जपले जाऊ शकतात असे त्यांना वाटते की काय; असे आपल्याला वाटायला लावणार्‍या असतात हे मात्र खरे.

होता होईल तो भारताचा रिकामा पेला दाखवण्याकडेच कल असतो. ज्या रिकाम्या पेल्याबद्दलच्या बातम्या असतात त्या खोट्या नसतात हे मात्र तितकेच खरे. आणि आपल्याला असा आरोप करता येणार नाही इतपत भारता बद्दलच्या 'बर्‍या' बातम्या ही असतात.

'At the end of the day people won't remember what you said or did, they will remember how you made them feel.' ह्या वाक्यातल्या प्रमाणे मला 'बीबीसी मराठी' वाचताना मला काहीतरी वावगं वाटतं जे नेमकं सांगता येत नाही.

घटनांबद्दल वावगं वाटतंच
पण त्या घटना रिपोर्ट करतानाही भेदभाव केला जातो हे मजेशीर वाटतं.
म्हणजे इन्फोसिस ची कर्मचारी गार्ड बरोबर च्या वादातून ऑफिसात मारली गेली त्याची बातमी होणार नाही.पण भारतातल्या अगदी दूर गाव च्या खेड्यात रेप केस झाली तर बिबीसी टीम नक्की जाऊन बातमी देईल.त्या बातमीत खाली 'भारतात बलात्काराच्या केसेस 13 डिसेंबर पासून वाढल्या आहेत' म्हणून निर्भयाच्या बातमीची हायपरलिंक असेल.(त्या 3 ओळी कॉपी पेस्ट असतात बातमीच्या शेवटी.अगदी त्यातला कॉमा किंवा शब्दक्रमही बदलत नाही.)
हेच भारतातल्या चांगल्या घटना, संशोधन वगैरे.त्याची बातमी बनणार नाही.पण कोणत्या तरी ngo मधल्या एका बाई ने डोनेशन चालू केली याची नक्की बातमी बनेल.
माझी उदाहरणे चुकीची असतील.पण बीबीसी.कॉम चे इंडिया सेक्शन रोज वाचल्यास हा मुद्दा नक्की जाणवेल.
बीबीसी भारतातल्या वाईट गोष्टी रिपोर्ट करते याबद्दल आक्षेप नसून त्या वाईटातही सिलेक्टिव्हिझम आहे यात मूळ आक्षेप आहे.

मी बीबीसी च्या बातम्या मुद्दाम जाऊन वाचत नाही. आता साइट पाहिली.
अहमदाबादच्या कोव्हिड हॉस्पि टलमध्ये लागले ल्या आगीची बातमी आहे. त्या बातमीत
भारतातल्या आगीच्या दोन जुन्या घटनांबद्दलच्या हायपर लिंक आल्यात. हा ए आय चा प्रकार असावा.
https://www.bbc.com/news/world-asia-india-53675430

बातमी खालच्या लिंक ए आय आहेत मान्य.
(मला हे कळले की मधल्या बोल्ड वाल्या 2 लिंक ए आय किंवा रिलेटेड पोस्ट/आर डी एफ मुळे आल्यात)
पण बातमी कंटेंट मधल्या प्रस्तावना लिहून दिलेल्या लिंक मॅन्युअल निर्णय असतो.(उदाहरण लवकरच देईनच)

ज्या घटनांच्या बातम्या होतात त्या घटनांबद्दल वावगं वाटतं की त्यांची बातमी झाली याबद्दल? >>>>

वावगं वाटण्यासारखी घटना असेल तर वावगं वाटतं. बातमीनुसार राग येतो, खंत वाटते, हताश व्हायला होतं. चीडही येते.

वावगं प्रामुख्याने, ह्याचं वाटतं की जी बातमी वाचून आनंद वाटेल, मनाला उभारी येईल, आशा, उल्हास वाटेल अशा बातम्या अभावानेच आढळतात. जवळ पास नसतातच.

मी फक्त मराठी बीबीसी बद्दल बोलतोय.

मनाला आनंद देणं हा बातम्यांचा हेतू नसतो.
मनाला आनंद हवा असेल तर गाणी ऐकावी, आवडीचे सिनेमे पाहावे, पुस्तकं वाचावी किंवा आवडीचं काही करावं.

'तुम्ही बीबीसीवर विश्वास ठेवू शकता कारण' ह्यावर टिचकी मारली असता
https://www.bbc.com/marathi/institutional-50418391 हे दिसते

हे वाचून झाल्यावर स्वतःच ठरवा. बीबीसी बातम्या कशा / कोणत्या देते

चिनुक्स,
मनाला आनंद देणं हा बातम्यांचा हेतू असतो असं कोण म्हणतंय. मी तरी म्हणत नाहीये.

[वावगं प्रामुख्याने, ह्याचं वाटतं की जी बातमी वाचून आनंद वाटेल, मनाला उभारी येईल, आशा, उल्हास वाटेल अशा बातम्या अभावानेच आढळतात. जवळ पास नसतातच.]

वावगं प्रामुख्याने, ह्याचं वाटतं की जी बातमी वाचून आनंद वाटेल, मनाला उभारी येईल, आशा, उल्हास वाटेल अशा बातम्या अभावानेच आढळतात. जवळ पास नसतातच.>> https://www.bbc.com/marathi/india-53677818

बोटीवर ( ships) संबंधित कर्मचाऱ्यांना पोर्ट ओफ कॉल घेताना या बातम्या उपयोगी पडतात.

एकूणच या मराठी बातम्या देणाऱ्या साइट्स पेक्षा त्यांचे फेसबुक किंवा इतर सोशल मिडिया वर येणारे फीड (आणि ते रोज उठुन शेअर करणारे मित्र) जास्त वैताग आणतात.

उगाच टिचक्या वाढवण्यासाठी काहीही शिर्षक देतात आणि पुढे प्रश्नचिन्ह टाकले की यांची जबाबदारी संपली.

न्यूजचॅनेल वरच्या बातम्या, राजकीय मुलाखती, त्यांची राजकीय चर्चासत्रे बघितली की लगेच लक्षात येते की त्यांचा कल कुठल्या बाजुला आहे.