एफ एम वर ऑडिओ साठी कथा / कादंबर्‍या हव्या आहेत

Submitted by विनिता.झक्कास on 4 June, 2023 - 08:28

नमस्कार माबोकर,

जसे मी म्हटले होते की आम्ही प्रायव्हेट एफ एम सुरु करत आहोत. जी माणसे संघर्ष करुन एका लेवलला पोहोचली आहेत, त्यांचा प्रवास मांडणार आहोत. आम्हांला फार प्रसिध्द व्यक्ती नको आहेत, तर आपल्यासारखेच व्यक्तिमत्व हवे आहेत. दर महिन्याला आम्ही अशी एक मुलाखत प्रसारित करणार आहोत. तुमच्या माहीतीत अशा व्यक्ति असतील तर नक्की आमच्यापर्यत त्यांची माहीती पोहचवा.

बर्‍यापैकी कथा सध्या आमच्याकडे आहे. तुम्हाला तुमच्या कथा / कादंबर्‍या ऑडिओमधे ऐकायची इच्छा असेल तर आम्हाला देऊ शकता. मानधन आम्ही देउ शकत नाही. कारण अजुन आम्ही नवीन आहोत. यातुन इन्कम सुरु नाही. पण क्रेडिटमधे तुमचेच नाव असेल. कथा मराठी किंवा हिंदी ही चालेल.

माबोवरिल आशिष निंबाळकर उर्फ कवठीचाफा, कौतुक शिरोडकर आणि विशाल कुलकर्णी यांनी त्यांच्या कथा आम्हांला दिलेल्या आहेत. त्याबद्दल सुचेतस इंडिया कडून मनःपूर्वक धन्यवाद!

ज्यांना एफ एम साठी काही नवीन कल्पना सुचवायची असेल त्यांनी नक्की सुचवावी.
धन्यवाद __/\__

- विनिता

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults