धार्मिक-साहित्य

online चौरंग कसा मिळेल

Submitted by प्रितीभुषण on 2 June, 2013 - 02:59

online चौरंग कसा मिळेल, वेबसाईट वगैरे सुचवा

online चौरंग कसा मिळेल, वेबसाईट वगैरे सुचवा

क.......क.......क......कलियुगाचा पण महिमा आहेच नामाचा .

Submitted by विनायक. दि.पत्की. on 28 May, 2013 - 12:17

||जय श्री राम||
||श्री राम समर्थ||
कलीयुगाचा महिमा

कलीयुग.(कनक).....|कलीयुग.(कांता).........||.कलीयुग..(कीर्ती)...........|||

'मी कर्ता नव्हे' जाणून करी कर्म । त्याला बाधेना कलीचा मार्ग ॥
दुष्ट अभिमानाला न पडावे बळी । त्याचा मालक होईल कलि ॥
कलि जेथे शिरला । त्याने राम दूर केला ॥
कलि अत्यंत माजला । गलबला चोहोकडून झाला ।
॥कलि अत्यंत मातला।नीतिकर्तव्याचा विसर पडला॥
अनाचार होत से फार।आता नाही रामावाचून दुजा ठाव॥
चोराने घर फोड केले। मग जागृतीचे कारण नाही उरले॥
म्हणून असावी सावधान वृत्ति। अखंड राखावी भगवंताची स्मृति॥

दुःख

Submitted by श्रीराम-दासी on 8 May, 2013 - 05:21

"मी दुःखात आहे." हे माणूस किती प्रामाणिकपणे. मनापासून आणि खरंतर कौतुकाने मान्य करतो! पण "मी सुखात आहे." हेही तेवढ्याच प्रामाणिकपणे आणि मनापासून का मान्य केलं जात नाही? "मी सुखात आहे" म्हणणार्‍यांच्या स्वरात काहिसा विषाद किंवा डोळ्यांत सत्य लपवण्याच्या धडपडीसारखे भाव असायलाच हवेत का? का नाही तो छातीठोकपणे सागू शकत की "हो... मी सुखात आहे! मला असलंही दुःख नाही! मला कुणाकडून कसलीही तक्रार नाही! माझी जेवढी अपेक्षा होती, माझी जेवढी पात्रता होती, त्याहून कित्येक पटींनी जास्त मला आयुष्याकडून मिळालेलं आहे. त्यासाठी मी द्देवाचा ऋणी आहे. आभारी आहे. समाधानी आहे. सुखी आहे."

शब्दखुणा: 

काय होतं आणी काय होतं आहे !

Submitted by परब्रम्ह on 5 May, 2013 - 11:18

काय होतं आणी काय होतं आहे ?
एखादि गोष्ट सुरु होते कशी आणी कालांतराने त्या गोष्टीच्या मुळाशी असलेली कारणे कशी विसरुन मागे पडतात आणी दुसरेच कुठले शीर्षक त्याला कसे चिकटते ह्याची काही उदाहरणे येथे देतो आहे.
१). रक्षाबंधन - कालामानाने मुळ अर्थ बदलुन एकाच दिशेला मनुष्य कसा एखादि परंपरा घेऊन चालत राहातो ह्याचे हे एक मोठे आश्चर्यजनक उदाहरण - जेव्हां सर्वप्रथम सुर आणी असुरांचा संग्राम होणार हे ठरले, तेव्हां असुरांनी सरळ सांगितले कि इंद्राची राजधानी अमरावती वर आक्रमण करुन ती जींकुन वर आम्ही इंद्रपत्नी "शची ", हिला सुद्धा घेऊन जाऊ.

शब्दखुणा: 

आजकाल वृत्तबीत्त पाळतात गाढवे

Submitted by तिलकधारी on 30 April, 2013 - 02:01

आजकाल वृत्तबीत्त पाळतात गाढवे
शेपटात शेरबीर माळतात गाढवे

बोध आकलन खुमार कामयाब नाट्यमय
शब्द पाहिजेत ते विटाळतात गाढवे

ना गुरू सभोवती बघून भीड चेपली
गझललाथ झाडुनी पिसाळतात गाढवे

शेर दोन ओळ आणि ग्रंथ या प्रतिक्रिया
फुकट सर्व्हरामुळे उफाळतात गाढवे

इग्नरास्त्र मारल्यास गप्प राहतात ती
तेच तेच अन्यथा उगाळतात गाढवे

ज्ञानेश्वरी समजावून घेताना....

Submitted by पुरंदरे शशांक on 9 April, 2013 - 06:39

ज्ञानेश्वरी समजावून घेताना....

सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च |
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेवचाहम् ||१५|| गीता - अध्याय १५ ||

सर्वांतरी मी करितो निवास । देतो स्मृति ज्ञान विवेक सर्वा ॥ समग्र वेदांस हि मी चि वेद्य । वेद-ज्ञ मी वेद-रहस्य-कर्ता ॥ १५ ॥ गीताई||

"एऱ्हवीं सर्वांच्या हृदयदेशीं| मी अमुका आहें ऐसी| जे बुद्धि स्फुरे अहर्निशीं| ते वस्तु गा मी ||४२१||"
अशी अतिशय सुरेख सुरुवात करुन परमात्माच कसा सर्वांच्या अंतरात "मी मी" असा अहर्निश स्फुरत असतो हे माऊली विवरुन सांगताहेत.

हे सगळं मुळातूनच वाचण्यासारखे आहे.

संस्कारधन

Submitted by विनायक. दि.पत्की. on 5 April, 2013 - 06:01

एक नवी टूम .................. वेळ नाही
आजकाल हा शब्द फार सामान्य झाला आहे.
चिमुरड्यांपासून ते वृद्धांपर्यंत.

देव्यपराधक्षमापनस्तोत्र

Submitted by विनायक. दि.पत्की. on 2 April, 2013 - 07:31

देव्यपराधक्षमापनस्तोत्र (रुपांतरीत )
माते मी न जाणतो मंत्र,यंत्र,आणिक स्तुती.
न ये मजला मुद्रा,आवाहन, वा आहुती ||१||
मला न ठाऊक व्याकुळ विलाप,आणि ध्यान.
हे जगदंबे मला नसे स्तोत्र,कथादिंचे हि ज्ञान.||२||
ठाऊक मजला ते एकच तुझे अनुसरण,
त्या योगे मजला न होते आप्पत्ती चे स्मरण ||३||
मी अज्ञानी न जाणतो विधिवत तुझी पूजा,
मी पामर,आळशी, परी तू न धरी मनी भाव दुजा ||४||
क्षमा असावी माते पडत आहे तव सेवेत खंड
दुष्ट बालक मी तुझा, परी माता न करे तया दंड ||५||
जगी या असतील तव पुत्र अनेक सत्कर्मी
मी चंचल बालक, हीन मनाचा, असेन दुष्कर्मी ||६||

सत्संगती

Submitted by पुरंदरे शशांक on 27 March, 2013 - 23:09

सत्संगती

श्वासोच्छ्वासी नाम | जपे सर्व काळी | वारी ती आगळी | साधे ज्याला ||

न लगे जावया | अन्य पुण्यक्षेत्री | अवघी धरित्री | तीर्थरूप ||

व्यापूनिया चित्ती | नित्य समाधान | वाटे धन मान | तृणवत ||

अंतरी संतत | ध्यातो भगवंत | होय मूर्तिमंत | संत भला ||

लाभावी अशाची | नित्यचि संगती | याविण विनंती | नाही दुजी ||

(श्री तुकोबारायांचरणी सादर समर्पण)

शब्दखुणा: 

जगदंबेची प्रार्थना-6

Submitted by विनायक. दि.पत्की. on 26 March, 2013 - 07:07

जगदंबेची प्रार्थना-6
(अंबा जननी विश्वाची माया आदी पुरुषाची )
(चाल- निर्भय होई रे मना,निश्चिंत होई रे मना)
जरी जन्म दिला जननीने,
पुर्नजन्म दिला जगतजननी ने.
असेन जन्मलो संसारा साठी,
पुर्नजन्म राहो हा परमार्थासाठी.||१||
संसार भयाने न मी करावी भक्ती,
करी नष्ट पूर्ण विषयासक्ती.
साधो मज पूर्ण प्रेमळ भक्ती,
बाधो न माया देई सायुज्य मुक्ती ||२||
माया मोह हि तुझीच देणी,
यातून हि न सुटे कोणी.
वेळीच ज्याला गुरु हि भेटे,
न येई दैन्य तया आड वाटे ||३||
मोहाचे निखारे मजला भूलविती,

Pages

Subscribe to RSS - धार्मिक-साहित्य