मध्यरात्र उलटून गेल्यानंतरची गाढ झोपेची वेळ, पण तरीही सदानकदा बिछान्यात चुळबुळत पडलेला सदा. इतक्यात डोळ्यासमोर अचानक लक्ष लक्ष काजवे चमकल्यासारखे झाले अन तो दचकून बिछान्यातच उठून बसला. पाहतो तर समोर एक तेजस्वी सिद्धपुरुष ज्याच्या शरीरातून निघणार्या प्रकाशाने बेडरूमच्या डिमलाईटच्या प्रकाशाला पुरते झाकोळून टाकले होते. आपण स्वप्नात तर नाही ना हे बघण्यासाठी म्हणून सदा स्वताला चिमटा काढायला जाणार इतक्यात समोरूनच आवाज आला, "अरे राजा, स्वप्न पडण्यासाठी आधी झोप तरी यायला नको का?" .... हे मात्र सदाला पटले, गेले कित्येक दिवस त्याला मनासारखी झोप लागली नव्हती..
मन्गलागौरीची आरती हवी आहे
श्रावण मास आज हा आला करु आरती चला गौरीला
खूप खूप वर्षांपूर्वी मानवी जीवन हे पृथ्वीच्या सीमित भूभागावरच स्थिरावलेले होते. उपजीविकेच्या शोधात मानवाने मग नवनव्या भूप्रदेशांचा शोध घेतला. कालांतराने सबंध पृथ्वीचा शोध लागला. आज पृथ्वीवरचे बहुतेक सर्व भूभाग, त्यांवरील चराचरांसह ज्ञात झालेले आहेत.
प्रत्येक जण समाधानाचा (वैभवाचा) भक्त असतोच.म्हणजेच कोणी कितीही मोठा वा छोटा असो सर्व जण वैभव देवतेचे (महालक्ष्मीचे) भक्त असतातच .आपण सर्व जण त्या मंगलमय महालक्ष्मी चे भक्त आहोतच. आता प्रत्येकाची वैभवाची व्याख्या वेगवेगळी असू शकते त्या नुसार माता लक्ष्मी हि अनेक रूपे धारण करून आहे.जसे कि धनलक्ष्मी,सौभाग्यलक्ष्मी,धान्यलक्ष्मी,वैभवलक्ष्मी,संतानलक्ष्मी,वैराग्यलक्ष्मी,... या प्रमाणे ज्याला जे हवे आहे ,जे रूप आवडेल त्या सर्व ठिकाणी ती श्री लक्ष्मी माताच प्रत्येक भक्ताला त्या रुपात आनंद देतच असते तिच्या कृपावृष्टीत अखंड वृद्धी होत राहो.
मागच्या महिन्यात मी भगवत गीता वाचायला घेतली. आमच्या घरात स्वामी प्रभुपाद यांचे "गीता आहे तशी" हे भाषांतर आहे. मला दहावी पर्यंत पूर्ण संस्कृत होतं पण तरी आता दहावी पास होउन बरीच वर्षे झाल्याने आणि मध्यंतरी संस्कृतशी काहिच संबंध नसल्याने कोणत्यातरी भाषांतरावरच अवलंबून रहावे लागणार होते...
पण हे भाषांतर वाचता वाचता मला असे वाटायला लागले कि त्यात काहि त्रुटी आहेत.... ( कदाचित मा.बु.दो)
हिंदु धर्म आणि शाप
हिंदु धर्मात शाप देण्याची प्रथा आढळते. तशी ती हॅरी पॉटरमध्येही आहे. पण हिंदु धर्मातील बरेच शाप पीडीकृत शाप या कॅटॅगेरीत येतील. तत्क्षण मरण शाप अगदी क्वचितच.
शंकराने मदनाला जाळून भस्म केला, हा त्या प्रकारात कन्सीडर होईल कदाचित.
|| श्री गणेशाय नम: ||
नमस्कार मायबोलीकर !
आज अचानक प्रेरणा झाली आहे आणी मी पुनःश्च भगवंताच्या लीलांचे पृथक्करण करुन आपणा सर्वांच्या बरोबर वाटुन घेण्यास बसलो आहे.
पुराण शास्त्रांतील गोष्टी ह्या नुसत्याच वेळकाढू भाकड गोष्टी नसुन त्यातुन आपल्याला काय शिकुन अवगत करुन घ्यायचे आहे, भक्ति म्हणजे अर्थपूर्ण रितीने काय, जेव्हा तो परमेश्वर अवतार घेतो त्याची काय कारणे असावित, त्या अवतारांचे संपूर्ण जीवनच आपल्या सर्वांसाठी कसे बोधपूर्ण असु शकेल ह्याचा एक अल्पसा प्रयत्न मी ईथे करीत आहे.
गळा दाटला अभंग घोष विठु रखुमाई
अनवाणी पाउलांना कष्ट जाणवे न काही
चंद्रभागेच्या तीराची ओढ लागली मनाला
दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला
घुमे गजर हरिनामाचा भक्त नामात रंगला...
जय शिवराय रायगड 21 जून : जेष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक आज सकाळी सहा वाजता ध्वजारोहण केल्यानंतर सुरू झाला. सप्तगंगा स्नान, पंचगंगा स्नान, शत्रपूजन अशा विधींनी शिवकालीन स्मृतींना उजाळा दिला गेला. सामूहिक शिवआरती पठणानं गडावरचं वातावरण अगदी शिवमय होऊन गेलं होतं.
शिवललकारी, पोवाडे, शाहिरी नमन, मैदानी खेळ असे इतिहास जागवणारे विविध प्रकार रायगडावर आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर निघालेल्या पालखी मिरवणुकीतल्या वाद्यांच्या गजरानं रायगड दुमदुमून गेला होता. सर्वत्र आनंदी वातावरण