भगवद्गीतेचे भाषांतर हवे आहे

Submitted by अतरंगी on 6 August, 2013 - 07:27

मागच्या महिन्यात मी भगवत गीता वाचायला घेतली. आमच्या घरात स्वामी प्रभुपाद यांचे "गीता आहे तशी" हे भाषांतर आहे. मला दहावी पर्यंत पूर्ण संस्कृत होतं पण तरी आता दहावी पास होउन बरीच वर्षे झाल्याने आणि मध्यंतरी संस्कृतशी काहिच संबंध नसल्याने कोणत्यातरी भाषांतरावरच अवलंबून रहावे लागणार होते...

पण हे भाषांतर वाचता वाचता मला असे वाटायला लागले कि त्यात काहि त्रुटी आहेत.... ( कदाचित मा.बु.दो)

म्हणून मला बर्‍याच श्लोकांचा अर्थ हवा आहे. तसेच गीतेचे कोणते भाषांतर वाचावे हे पण कळत नाही. बाजारात जास्त करुन स्वामी प्रभुपाद यांचे पुस्तक उपलब्ध आहे. गीताई पाहण्यात नाही आले, गीतारहस्य अ.ब. चौकात मिळते पण ते ईंग्रजी मधे आहे.

कोणास जर चांगले भाषांतर माहित असल्यास कृपया सुचवा.....

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण हे भाषांतर वाचता वाचता मला असे वाटायला लागले कि त्यात काहि त्रुटी आहेत<<<<<

अगदी मनातले बोललात !!! मलाही जाणवले तेच मीही त्याच प्रकाशनाची गीता वाचली आहे मुळात माझे असे मत झाले की इस्कॉन वाल्यांनी काही जागी स्वता:च्या साधनामार्गात गुरूंनी जे सांगीतले तेच जसेच्या तसे लिहिले आहे ...जे त्यांच्या समुदायाच्या विचारसरणीला अनुसरून पेक्षा सोयीचे जास्त असल्याने मलाही जरा गडबडाचे वाटले अनेक जागी

असो उत्तम धागा अभिनंदन !!!
एक शेर आठवला

.......................जाउद्या पुन्हा कधीतरी सांगीन Happy
________________________________

वाह शशांक जी गीताईची लिंक दिलीत
ऋणी !!!!!!!
गीताई माय फेव्हरेट पुस्तक !!!!!! विनोबा इस ग्रेट !!!!!

इस्कॉन वाल्यांनी काही जागी स्वता:च्या साधनामार्गात गुरूंनी जे सांगीतले तेच जसेच्या तसे लिहिले आहे ...जे त्यांच्या समुदायाच्या विचारसरणीला अनुसरून पेक्षा सोयीचे जास्त असल्याने मलाही जरा गडबडाचे वाटले अनेक जागी

>>
हायला, असे असुनही नाव "गीता आहे तशी"? कमालच आहे बुवा Happy

गोरखपूर, गीता प्रेस ची भगवद्गीता बघा. हिंदी अनुवाद असतो. पण चांगला आहे. पूर्वी बाजारात सहज उपलब्ध होत असे. इथे त्यांच्या साईटवर डाऊनलोड करण्याची व्यवस्थाही दिसत आहे

वाह वरदा मस्त सांगीतलेत ...ही गोरखपुरच्या प्रेस्ची (गीता प्रेस)गीता फार छान सरळ सोपी आहे मी वाचली आहे त्यातील शेरांचे अन्वयार्थ बरोब्बर आहेत अर्थ समजावताना खाली दिलेली माहिती उलगडेही फार उत्तम आहेत

धन्यु वरदा धन्यु

महत्त्वाचेम्हणजे ही गीताप्रेसची सर्व पुस्तके अत्यल्प किमतीत असतात जेणेकरून बाकीच्या एका पुस्तकाच्या किमतीत या चार पाच प्रतीही येतात व स्वतःसाठी व दुसर्‍याना देण्यासाठीही एकदमच घेता येतात

मीपण तुम्ही उल्लेख केलेलीच गीता वाचतेय, मलापण ती तेवढी कळत नाहीये, काहीतरी कमी आहे असे जाणवतंय, आता गीताई वाचायला घेईन. धन्यवाद अतरंगी ह्या धाग्यासाठी. धन्यवाद शशांक गीताईसाठी.

धन्यवाद शशांक, वरदाजी.

शशांकने दिलेली लिंक उघडल्यावर सगळे ईंग्रजी मधे आले. परत एकदा दचकलो... पण त्यातली मराठीची लिंक उघडल्यावर दिलासा मिळाला. सगळे छान मराठी मधे आहे. पण ते डाऊनलोड कसे करायचे ?

गोरखपुरची लगेच डाऊनलोड झाली.... आणि श्लोकाचे भाषांतर म्हणून श्लोक असल्यावर थोडेफार कळायचे राहून जाते. जरा विस्तृत पणे लिहिलेले असल्यास माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या माणसाला समजायला सोपे जाते.

अय्ला खरंच की !!!!! मला सगळीकडे शेरच दिसताय्त की काय जळी स्थळी काष्ठी पाषाणी ...
Uhoh

स्वामी प्रभुपाद याच्या पुस्तकाच्या मागे गीतेच्या या भाष्याची वैशिष्ट्ये मधे अमेरिकेतील ९०% हून अधिक विश्वविद्यालयीन पाठ्यक्रमात निर्धारित केली गेली आहे असे लिहिले आहे Happy

आमच्याकडेही गोरखपूर गीता प्रेसची गीता आहे. हिंदी असली तरी चांगला अर्थ समजतो.

माझा असा अनुभव आहे की पहिल्यांदा फार वरवरचे कळते पण नंतर जेवढे वाचू तेवढे दरवेळी काहीतरी नवीन गवसतेय असे वाटते आणि श्लोकांचे अर्थ तर फार गहन आहेत प्रत्येकजण आपापल्या परिने समजून घ्यायचा प्रयत्न करित असावा आणि म्हणूनच प्रत्येकाला येणारी अनुभुती वेगळी असावी. मलाही वाचायला आवडतील श्लोकांचे अर्थ.

त्यामुळे मी विचारलेल्या श्लोकांचा अर्थासोबत कोणास जर चांगले भाषांतर माहित असल्यास कृपया सुचवा.>>>>>>
कु. ज्ञानेश्वर विठठल कुलकर्णी नावाच्या एका मुलाने बर्‍याच वर्षापुर्वी श्रीमदभगवद्गीतेचे भाषांतर/रुपांतर करायचा एक चांगला प्रयत्न केला होता.
इथे पहा..
http://www.gharogharidnyaneshwari.com/adhyay.html

अवांतरः: भाषांतरकर्त्याचा Ulterior motive काय होता इ. अवांतर गोष्टींवर विचार करण्यापेक्षा श्लोकाच्या अर्थावर जास्त चिंतन केल्यास जास्त उपयुक्त ठरेल असे वाटते.

सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद....

आता हे तिन्ही एकदा एकदा वाचतो आणि मग काही शंका असल्या तर परत येतो विचारायला.....

माझ्याकडे पण गोरखपुर प्रेस वालीच आहे. २० रु. चे पुस्तक. इंग्रजी अनुवाद आहे. कालच किती वेळ वाचत बसले होते आणि आज हा बाफ. आपल्याला जितके लाइफ घडत जाईल तितके त्यातले अर्थ उलगडत जातात असे आपले माझे मत. त्यात गीता पठन कसे करावे वगैरे माहिती पण दिलेली आहे.

वैवकु, तुमची गजलांवरची निष्ठा प्रामाणिक आहे असेच तो कृष्ण सखा म्हणेल.

अतरंगी, पुस्तक घेऊन एक्ट्याने बसून शांत पणे वाचा तर वेगळा अनुभव येइल. स्क्रीन वर वाचण्यापेक्षा.

कृपया - ‘‘भगवतगीतेचे भाषांतर हवे आहे’’ अशा मथळ्याच्या ऐवजी तो ‘‘श्रीमद्‌भगवद्गीतेचे / भगवद्गीतेचे भाषांतर हवे आहे’’ असा हवा का ते पाहणे.

स्वामी स्वरुपानंद (पावस) यांनी भावार्थ गीता या त्यांच्या एका पुस्तकात श्रीमद्भगवतगीतेचा अर्थ उलगडून सांगितला आहे.

श्री पांडुरंग शास्त्री आठवले यांचे गीतामृतम पुस्तकही सुरेख आहे.

आ. विनोबांची गीता प्रवचने हे पुस्तकही अप्रतिम आहे.

भगवद् गीतेच्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ लागण्यासाठी यथार्थ गीता वाचा किवा ऐका! योग्य दिशा मिळेल.पण खर सान्गु तर भग्वद गीता ,ज्ञानेश्वरी यान्चा अर्थ सद् गुरु शिवाय कळत नाहि! पण अस्सो....

फ्री To download Ebook ,audio सुद्धा आहे.विश्लेषण फारच सुन्दर आहे.
केवळ मराठीच नाहि तर अनेक भाषात अगदी मोफत आहे. मराठी Audio तर फारच सुन्दर आहे.प्रत्येक श्लोक उच्चार अरथा साठी Audio नक्किच ऐका!

http://yatharthgeeta.com/

मी सध्या बंगळूरू (whitefield) मधे असल्याने पुस्तक लगेच मिळायची शक्यता कमीच. म्हणूनच ईथे विचारले होते. बीबी श्लोकांचे अर्थ विचारण्यासाठी होता. ४ का ५ श्लोक पण लिहिले होते. पण त्यांच्या भाषांतरा पेक्षा पुस्तकांवरच चर्चा झाली आणि मलाही चांगले संदर्भ मिळाले, मग मुळ पोस्ट बदलली.

सोबत स्वामी प्रभुपादांचे पुस्तक आहे. त्यात जे कळणार्/पट्णार नाही ते गीताई मधून नाहीतर गोरखपुर च्या सॉफ्ट कॉपी वर पाहेन. पुण्यात परत जाई पर्यंत तरी दुसरा पर्याय नाही.

मला यथार्थ गीता च्या वेब साईटवरून audio files download करता येत नाही आहेत. अजून कोणाला हा प्रॉब्लेम येतोय का? माझ्याकडे लोकमान्य टिळक यांनी केलेले भाषांतर (आणि टिपा) असलेली गीता आहे. ती वाचून गीतेच्या श्लोकाचे अर्थ समजणे सोपे जाते. अर्थात हा नुसता शब्दार्थ झाला! भावार्थ समजायला आयुष्य पुरणार नाही! तोवर "एकतरी ओवी अनुभवावी'! सर्व लिंक्स साठी धन्यवाद!

विनोबांची गीताई तर प्रसिद्ध आहेच, जोडीला गीता प्रवचने ही....
तसेच गीताई चिंतनिका हे पुस्तकही फार म्हणजे फारच सुंदर आहे - गीतेचा विशेष अभ्यास करायचा असेल तर ....
उदा.
भगवद्गीता अ. ११
तस्मात प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीशमीड्यम्
पितेव पुत्रस्य सखेव सख्यु: प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम्
|| ४४||

म्हणूनि लोटांगण घालितो मी प्रसन्न होई स्तवनीय मूर्ते
क्षमा करी बा मज लेकराते सखा सख्याते प्रिय तू प्रियाते || गीताई

यावर विनोबांची टिप्पणी - वात्सल्य, सख्य व प्रेम ही तीन नेहेमीची क्षमा मंदीरे आहेत.
वात्सल्य दोष पोटात घालते, सख्य दोष सहन करते, प्रेमाला दोष दिसतच नाहीत; - तिन्ही प्रकारांनी दोष दुरुस्त होऊ शकतात.

वेडा राघू, गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा या सगळ्याचं आकलन झाल्यावर जर हयात असलो तर कुराण शिकायला नक्की जाईन एखाद्या मौलवी कडे........ Happy

यथार्थ गीता माझ्याकडे पण ओपण आणि डाउनलोड होत नाही. (मी ऑफिसच्या नेट वरुन होत नव्हतं म्हणून टाटा फोटॉन लावून करुन पाहिलं तरी होत नाही. firefox cannot find server at download.yatharthgeeta.com असे येत आहे.

काय करावे बरे ?????

Pages