|| कर्म ||
दया क्षमा भाव । मना चित्ती धरी ।
वसे जो अंतरी । रत्नगर्भे ।।
जगता असावा । निर्मळ स्वभाव ।
पारदर्शी भाव । जळा परी ।।
प्रयत्ने रहावे । उध्दाराया तमा ।
येवो जन्म कामा । कवि जैसा ।।
अदृष्य रूपात । तारतो सर्वांस ।
अहर्निश श्वास । देतो प्राण ।।
ह्रदयी जपावी । वात्सल्य करूणा ।
जसा नेत्री पान्हा । गो मातेच्या ।।
वृक्षाचीये ठायी । जैसा सेवा धर्म ।।
आचरावे कर्म । सर्वां प्रती ।।
रे सावळ्या
रे सावळ्या मन गोकुळ होवु दे
प्रेम भाव मना मनात जागु दे !
भेदभाव अंतरी जो नांदतो
धर्म जात कलह सारा जळू दे !
तन मन रंगले न् रंगले ध्यान
असा उधळ एकच रंग होवु दे !
एक नाद एक ताल विश्व भाव
सकलांत सूर सुमधुर नांदू दे !
प्रेम सुगंध प्रेम तरंग भु वरी
अलवार अखंड मुक्त वाहू दे !
©शिवाजी सांगळे
मो.९५४५९७६५८९
शोध आणि बोध
आपण सगळे तिर्थाटन करतो, यात्रा करतो त्या दरम्यान मंदिरात जातो, का बरं जातो आपण? कारण परंपरेने काही धार्मिक गोष्टी आपल्याला वारश्यात प्राप्त झालेल्या आहेत, कधी त्याचे पालन करायचे म्हणून तर कधी श्रद्धा म्हणून, पण त्या त्या ठिकाणी खरोखरच परमेश्वर आपल्याला दिसतो, भेटतो का? यावर माझ्यामते उत्तर नाही असेच आहे... कारण परमेश्वर हा तुमच्या आमच्या ह्रदयात वसलेला आहे, अशाच काहीशा भावना गीतकार वंदना विटणकर यांनी आपल्या गीतातून व्यक्त केल्या आहेत... “शोधिशी मानवा, राऊळी मंदिरी, नांदतो देव हा, आपुल्या अंतरी”
आपल्या पैकी किती जण पिठापूरमला जाऊन आले आहेत? कसा अनुभव आहे तिथला?
पुष्पदंत विरचित शिवमहिम्न स्तोत्राचा मराठी समश्लोकी अनुवाद
(१ ते २९ श्लोक शिखरिणी वृत्तात आहेत)
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१८११०७
१
महिम्नः पारं ते परमविदुषो यद्यसदृशी
स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः
अथाऽवाच्यः सर्वः स्वमतिपरिणामावधि गृणन्
ममाप्येष स्तोत्रे हर निरपवादः परिकरः
.
तुझा ज्ञात्यांनाही गवसत नसे पार म्हणता
स्तुती ब्रम्हादींची उचित न ठरे ज्ञान नसता
मला वाटे गावे अवगत जसे स्तोत्र तव ते
शिवा स्वीकारावे हृदगतच माझे सरस हे
पुण्यात आल्यापासून गणेशोत्सवात एक गोष्ट अनुभवली आहे. इथे श्री गणेशाची आणि इतर आरत्या थोड्या वेगळ्या पद्धतीने म्हटल्या जातात असे माझे मत आहे. मूळच्या आरती मध्ये काही जादाचे शब्द घातले गेले आहेत. जसे कि उदाहरणार्थ...
जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती
जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा
जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी
नमस्कार.
थोडे आधी विचारायला हवे होते खरे. देवपूजेतील चांदीची चिकट भांडी कशी स्वच्छ करावीत?
धन्यवाद!
दरवर्षी प्रमाणे बाप्पा येतोय... पुढच्या महिन्यात... पण डेकोरेशनच काय? थर्माकॉल बंदी अन नवीन कल्पना सुचत नाहीत... तुम्हाला काय सुचतंय ? स्वस्त आणि मस्त... चटकन उठावदार दिसणारं डेकोरेशन... सुचवा ना ... प्लिज
अवगुण म्हणजे काय ?
अवगुण या आसुरी शक्तीं आहेत. शक्ती कोणत्या प्रकारच्या आहेत याबद्दल आपण जाणून घेऊ. पण योग्य वेळी