Submitted by शिवाजी उमाजी on 12 December, 2018 - 01:46
रे सावळ्या
रे सावळ्या मन गोकुळ होवु दे
प्रेम भाव मना मनात जागु दे !
भेदभाव अंतरी जो नांदतो
धर्म जात कलह सारा जळू दे !
तन मन रंगले न् रंगले ध्यान
असा उधळ एकच रंग होवु दे !
एक नाद एक ताल विश्व भाव
सकलांत सूर सुमधुर नांदू दे !
प्रेम सुगंध प्रेम तरंग भु वरी
अलवार अखंड मुक्त वाहू दे !
©शिवाजी सांगळे
मो.९५४५९७६५८९
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सच्चे विचार सहिष्णू भावना.
सच्चे विचार सहिष्णू भावना.
दिल से शुक्रीया..
दिल से शुक्रीया...हायझेनबर्गजी
वैश्विक प्रेम!!!!!!
वैश्विक प्रेम!!!!!!
पाटील जी धन्यवाद
पाटील जी धन्यवाद