सुखाचा शोध : अवगुणांचा त्याग

Submitted by शिष्योत्तम रामभाऊ on 12 August, 2018 - 12:07

अवगुण म्हणजे काय ?

अवगुण या आसुरी शक्तीं आहेत. शक्ती कोणत्या प्रकारच्या आहेत याबद्दल आपण जाणून घेऊ. पण योग्य वेळी

१. अवगुणांमुळे आसुरी शक्तीं व्यक्तीच्या शरिरामध्ये प्रवेश करतात. जोपर्यंत अवगुण आहेत तोपर्यंत आसुरी शक्ती वास्तव्यास राहतात. एकदा का आसुरी शक्ती वास्तव्यास आल्या कि त्या अवगुणांना ताब्यात ठेवतात. म्हणजेच अवगुण आसुरी शक्तींना निमंत्रण देतात. मग आसुरू शक्ती अवगुणांवर नियंत्रण मिळवतात. प्रत्येक जीव हा स्वतंत्र आहे. ज्याप्रमाणे चांगल्या गुणांमुळे त्याला दैवी शक्तींची प्राप्ती होते, त्याप्रमाणे अवगुणांमुळे आसुरी शक्ती शरिरामध्ये त्यांची स्थाने निर्माण करतात. जेवढे अवगुण जास्त, तेवढे सूक्ष्मातील आसुरी अलंकार त्याच्या देहात जास्त असतात.

२. कलियुगात इतर युगांतील जिवांपेक्षा सगळ्यात जास्त आसुरी अलंकार धारण केलेले आहेत.
हे सत्य आहे. थोडेफार निरीक्षण आणि आकलन असलेल्या व्यक्तीला हे सहजी कळून येईल. तथापि ज्यास सहजासहजी जाणिव होत नाही त्यास समजावून सांगणे क्रमप्राप्त ठरते. कलियुगात विकृती वाढलेल्या आहेत हे सांगावयास नकोच. हे तर प्रत्येकास मान्य आहे. कारण अवगुण वाढत गेल्याने असुरी शक्ती वाढलेल्या आहेत.
ज्याप्रमाणे स्थुलातील असुराचे अलंकारित रूप असते, त्याप्रमाणे कलियुगातील जिवाचे सूक्ष्मातील रूप आसुरी अलंकार घातलेल्या असुरांप्रमाणेच आहे.

३. राष्ट्र आणि धर्म यांच्या अधःपतनास कारणीभूत असणारे राष्ट्रद्रक्रिय्णि धर्मद्रोही यांच्या देहांत मोठ्या आसुरी शक्तीशी निगडित अलंकार असतात.

४. भ्रष्ट अधिकारीवर्ग आणि कर्मचारीवर्ग यांच्या देहांत आसुरी सैन्याशी निगडित अलंकार असतात.

५. नीतीमत्ताहीन स्त्रिया आणि राष्ट्र अन् धर्म यांच्या अधःपतनास कारणीभूत असलेल्या स्त्रिया यांच्या देहांत आसुरी स्त्रियांशी (स्त्री-वाईट शक्ती, उदा. राक्षसीण) निगडित अलंकार असतात.

हे सर्व विचार आज मान्य होत आहेत. आपण याच्या पुढे जाऊयात.
अवगुण आणि असुरू शक्ती यांचा परस्पर संबंध तर आपण पाहिला. यातले शास्त्र जाणून घेतले. मात्र ते कसे काम करते हे नको का पहायला ?
आपले शरीर रसायनांनी बनले आहे. त्यात आम्लं आहेत तशीच अल्कंही आहेत. आम्लांचे प्रमाण जास्त झाले तर काय होते ? शरीरात आम्लपित्त वाढते. यावर वेळीच उपाय न केल्यास पित्तामुळे चयापचय प्रक्रियेवर परिणाम होतो. त्यातून कफ वाढतो. पुढे त्रिदोष निर्माण झाले की असह्य डोकेदुखी, सर्दी, सायनसचा त्रास, कानाचा पडदा फाटणे, अपचन, बद्धकोष्ठता असे अनेक आजार होतात. आपले शरीर त्यास बळी पडते.

अशाच प्रकारे शरीरातील जिवामधे अवगुण काम करतात. आम्लांचे प्रमाण ज्याप्रमाणे नियंत्रणात ठेवावे लागते त्याचप्रमाणे अवगुणांवर मात करावी लागते. अवगुण व्यक्तीच्या जन्मातून आलेले असतात. जिवाचा त्यात काहीच दोष नसतो. कुळ, वंश, वर्ण याप्रमाणे गुण अवगुण प्रवास करत असतात. हे शास्त्रात सिद्ध झाले आहे. आधुनिक विज्ञान त्याला डीएनए म्हणत असते.

अवगुणांचे शास्त्र ठाऊक असल्यानेच त्यावर मात करण्यासाठी पूजा, पाठ, मंत्रोच्चार, सात्विक कर्मे असे उपाय गुरूंनी सुचवलेले आहेत. सात्विक कामांमुळे दैवी गुणांची वाढ होते. दैवी गुणांमुळे दैवी शक्ती जिवामधे वास करू लागतात. दैवी शक्तींचे प्रमाण वाढले की आसुरी शक्तींचा नाईलाज होतो आणि जीव अवगुणांवर योग्य वेळी मात करण्यात यशस्वी होतो.

अवगुणांमुळे जीव दु:खी होतो. त्यामुळे देह कष्टप्रद होतो. दु:खाचा संसर्ग भवतालावर होतो. जीव दु:खी झाल्याने भवतालाच्या एक्टोप्लाझम वर रासायनिक क्रिया होते. भवतालचे एक्टोप्लाझम आणि शरीरातील मेटॅबोलिझम यांचा संयोग होतो. दु:ख अवगुणाकडून शोषले जाते. बिघडलेला मेटॅबोलिझम त्यास पोषक काम करतो. आणि आजूबाजंच्याआ जिवात दु:ख प्रवेश करते.

त्यामुळे दु:ख दूर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. दु:ख धारण केलेला व्यक्ती जवळ आला असताही वातावरणातील एक्टोप्लाझमचा परिणाम न होऊ देण्यासाठी साधनेची आवश्यकता असते. त्यासाठी साधक म्हणून वावरावे लागते. त्यामुळे दैवी शक्तींचा सदैव संचार होऊन व्यक्ती दु:खावर मात करतो. या विषयी अधिक जाणून घेऊ.

विश्रांती

शिष्योत्तम रामभाऊ

( आपल्याला ही माहिती उपयोगी वाटली असल्यास आपले मित्र, परिवार, कुटुंबीय यांचेपर्यंत ती पोहोचवावी. जेणेकरून सर्वांना लाभ व्हावा )

कल्याण वस्तु

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः।

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<अवगुणांवर मात करावी लागते. अवगुण व्यक्तीच्या जन्मातून आलेले असतात. जिवाचा त्यात काहीच दोष नसतो.>>

बरोबर आहे.

आता हे कसे करावे?
फार फार कठीण. पूजा, पाठ, मंत्रोच्चार, या गोष्टींना श्रद्धा लागते, ती नसते, उगाच म्हणायचे म्हणून प्रार्थना म्हणायची - मनात वाईट विचार तसेच चालू!

राम भाऊ दादा , तुम्ही कोण आहात ? कोण्त्या कल्ट ( याचे मराठीत काय बरे भाषांतर करावे ? - चला , कोणा बाबा, बुवा, बाई, माई ई. नी चालवलेला पंथ/संस्था) चा भाग आहात जरा उलगडून सांगाल का? मायबोलीकरांना ज्ञान वाटण्याआधी जरा या संस्थाळाचा अभ्यास करा बरे.

या बाबा , बुआ, बाईने तुमचा ब्रेन वॉश केला आहे. इथे मायबोलीवर अनेक बाफ आहेत ज्याचा अभ्यास करता आपला मेंदू कसा पुर्णपणे धुतला गेलेला आहे हे तुमच्या लक्षात येऊ शकेल. अर्थात तुम्हाला या व्यसनाची लागण होऊन कीती वर्शे झाली आणि तुमचा मेंदू कितपत जागृतावस्थेत आहे त्यावरच तो परत ठीक होऊ शकतो की नाही ते ठरायचे.
पण तुमचे लेख वाचून या व्यसनातून तुम्ही सावरू शकाल असे फारसे वाटत नाही. तुम्ही अट्टल व्यसनी आहातच पण नविन सावज का शोधत फिरताय ?

रच्याकने, रामभाऊ दादा, इथे सगळ्या आसुरी स्त्रियां (स्त्री-वाईट शक्ती, उदा. राक्षसीण) वास्तव्य करून आहेत बरं. तर सावधान!! ते गरीब बिचारे सावज मिळण्याआधीच त्या तुमचा खात्मा करून टाकतील Biggrin

लेखाशी मी सहमत आहे. मला हे सगळे पटलेले आहे. सदस्यत्वासाठी काही विधी / प्रवेश प्रक्रिया असल्यास ती करायला मी तयार आहे. या परिवाराचे केंद्र माझ्या घराच्या जवळपास / जवळच्या शहरात कुठे असेल तर कळवावे. गुप्तपणे कार्य चालत असल्यास आधी माझी चाचणी घेण्यात यावी व मी आपल्या या कार्यासाठी लायक आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे ही विनंती. या सर्व प्रक्रियेतून माझी निवड झाली तर मी स्वतःस भाग्यवान समजेल.

मी शाळेत रसायनशास्त्र हा विषय ऑप्शन ला टाकलेला होता. त्यामुळे मज शेवटून दुसारा परीच्छेद समजला नाही. तो इथे किंवा प्रत्यक्ष भेटीत समजावून सांगावा ही नम्र विनंती. ( जर मी खूपच मठ्ठ आहे असे मत झाल्यास आपण प्रवेश दिला नाही तर मी माझ्या नशिबाला बोल लावीन व त्याबद्दल आपणास दोष देणार नाही याची हमी देऊ इच्छितो ).

सर्वे सन्तु कल्याणवस्तु !

दु:खाचा संसर्ग भवतालावर होतो. जीव दु:खी झाल्याने भवतालाच्या एक्टोप्लाझम वर रासायनिक क्रिया होते. भवतालचे एक्टोप्लाझम आणि शरीरातील मेटॅबोलिझम यांचा संयोग होतो. दु:ख अवगुणाकडून शोषले जाते. बिघडलेला मेटॅबोलिझम त्यास पोषक काम करतो. आणि आजूबाजंच्याआ जिवात दु:ख प्रवेश करते. >> किती भारी शास्त्रीय माहिती सोपी करुन सांगितलीय ! मायबोलीच्या सर्व वाचकांचा एकदम सत्वर उद्धार करुन सोडणार तुम्ही यात शंकाच नाही

https://www.maayboli.com/user/7201/created या ताईंनी पण कल्याणाचा वसा घेतला होता . पण त्यांनी प्यायलेले कूल एड कमी पडले बहुतेक. त्या गायबच झाल्या मायबोलीवरून. तुम्ही त्यांच्या धाग्यांची आठवण करुन दिलीत

दु:खाचा संसर्ग भवतालावर होतो. जीव दु:खी झाल्याने भवतालाच्या एक्टोप्लाझम वर रासायनिक क्रिया होते. भवतालचे एक्टोप्लाझम आणि शरीरातील मेटॅबोलिझम यांचा संयोग होतो. दु:ख अवगुणाकडून शोषले जाते. बिघडलेला मेटॅबोलिझम त्यास पोषक काम करतो. आणि आजूबाजंच्याआ जिवात दु:ख प्रवेश करते. >>

आँ ! हे आधी नव्हतं का ? कसं काय स्किप झालं ? निषेध स्वतःचाच. आता मला प्रवेश मिळेल का ?

॥ कल्याण करी रामराया । जनहित विवरी, जनहित विवरी ॥

नन्द्या ४३ जी. अगदी बरोबर बोललात आपण. आपले आकलन उच्च दर्जाचे आहे.

डेलिया ताई
आपल्याला मी काय सांगू ? बकरा मिळवणे असे काही नसते अहो. जगाला सुखी करायचा वसा घेतलेल्या लोकांना बकरे कशाला हवेत ? आपल्याला आनंद हवा तर दारं सताड उघडी आहेत. बाकी आपली इच्छा.

सर्व स्त्रिया वाईट असे मी म्हणालो नाही.

आसुरी शक्तींचा नायनाट कसा करावा याबद्दलच्या तुमच्या कल्पना जाणून घेण्यास मी अत्यंत उत्सुक आहे. >> वत्स भरत. वाचून आनंद झाला. आपण जाणून घेण्यास उत्सुक आहात. नायनाट कसा होतो याचे शास्त्र थोडक्यात याच लेखात दिलेले आहे. ते समजले नसेल तर आपणास पुन्हा समजावून सांगण्याची माझी तयारी आहे. आपल्याला प्रत्यक्ष भेटून सुद्धा सांगण्याची तयारी आहे . आपल्या इच्छेनुसार.

आम्ही असे मानतो कि सत्शील व्यक्ती, सकारात्मक शक्तींच्या संपर्कात आल्याने दैवी शक्तींच्या गुणांचा संचय होतो. हा संचय वाढू लागला की राक्षसी शक्तींचा नाईलाज होतो आणि अवगुण नियंत्रणात राहतात. त्यांचा पूर्णपणे नायनाट होत नाही. पण आयुष्यभर ते डोके वर काढत नाहीत.

अड्डावाला
आपल्याला इच्छा आहे हे पाहून आनंद झाला. आपल्याला खरोखर प्रवेश हवा असल्यास दारे सताड उघडी आहेत.

त्यामुळे दु:ख दूर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. दु:ख धारण केलेला व्यक्ती जवळ आला असताही वातावरणातील एक्टोप्लाझमचा परिणाम न होऊ देण्यासाठी साधनेची आवश्यकता असते. त्यासाठी साधक म्हणून वावरावे लागते. त्यामुळे दैवी शक्तींचा सदैव संचार होऊन व्यक्ती दु:खावर मात करतो. या विषयी अधिक जाणून घेऊ.>>>
आमच्यासारख्या पापी आणि नोकरी करणार्या स्त्रियान्साठी हे शक्य आहे का हो..
हे प्रभु पथ प्रदर्शित किजिये

नही
मै तुम्हें इस तरह से खामोश नही होना दूंगा
छह दिन से तुम्हारी टकटक पढ रहा हूं
टंक टंक के मेरा सर खा गये हो तुम, टंको
बाते करो मुझसे
बाते करो मुझसे
बाते करो मुझसे