मायबोली गणेशोत्सव २०१८ - घोषणा

Submitted by संयोजक on 20 August, 2018 - 10:18

j1.jpg

ॐकार स्वरुपा। नित्य निराकारा।
येतसे आकारा। भक्तांलागी॥
शुंडधारी दिव्य। सगुण सुंदर।
रुप मनोहर। वर्णवेना॥
मस्तकी मुगुट। झळके स्वर्णिम।
तेज अनुपम। नेत्रद्वयी॥
शुंड वक्राकार। रुळे दोंदावरी।
चतुर्भुजधारी। भव्य रुप॥
धरी करांमाजि। परशु कमळ।
मोदक निखळ। सत्प्रेमाचा॥
आशीर्वाद हस्त। उभारी प्रेमाने।
तेणे भक्तजने। आनंदली॥
झळकत कटी। रेशमी वसन।
सुवर्ण कंकण। मनगटी॥
पूजिता भक्तिने। ऐसा श्रीगणेश।
अपूर्व संतोष। भाविकांसी॥
नित्य समाधान। देई गजानना।
आणिक वचना। आर्जवचि॥
येतसे शरण। तूजलागी पूर्ण।
भावे लोटांगण। भक्तिप्रेमे॥
(-पुरंदरे शशांक)
श्रावण महिन्यात पावसाने धरलेला जोर कमी होऊन सुखद रिमझिम धारांची बरसात सुरु केलेली असते.
यानंतर भाद्रपदमासात चतुर्थीच्या दिवशी आनंदाची उधळण करत राजाप्रमाणे वाजत गाजत तो येतो.
अमाप आनंदाची खैरात भक्तजनांवर करत आणि सर्वाना सुखद अनुभूतीचा प्रसाद देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे ह्या ही वर्षी तो येतोय.
हो, तोच आपला सर्वांचा लाडका, मूषकवाहन असलेला, लंबोदर, एकदंत, गौरीशंकरसुत गणपतीबाप्पा !!
तर मायबाप भक्तजनहो, बाप्पा येत आहेत हो .....
त्यांचे धूमधडाक्यात स्वागत करूया.
मायबोली गणेशोत्सव संयोजन समितीतर्फे (२०१८) ह्याही वर्षी विविध स्पर्धा आणि भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे..
तर मायबोलीकरांनो, तयार व्हा, सुखाच्या क्षणांसाठी, बाप्पाच्या स्वागतासाठी!!!

Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणपती बाप्पा मोरया!

जोरदार सुरुवात! ओव्या आणि बॅनर दोन्ही सुंदरच आहेत.

ओव्या मस्त जमल्यात, अगदी मंगलमय, प्रसन्न! Happy बॅनरही अगदी सुंदर आहे. Happy

संयोजकांना शुभेच्छा! Happy

वा वा! मस्त बॅनर आणि प्रसन्न ओव्या! सुंदर नांदी झाली आहे गणेशोत्सवाची! Happy
संयोजकांना शुभेच्छा! काहीही मदत लागली तर हक्काने कामाला लावा. Happy

मोरया!

मस्त सुरूवात!

गणपतीबाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया!

Pages