धार्मिक-साहित्य

संध्या वंदन

Submitted by कनू on 24 August, 2017 - 08:23

नमस्ते मित्र मैत्रिणींनो,
ही संध्याकाळची प्रार्थना माझ्या बाबांच्या काकांनी तयार केली आहे.
आम्ही ती अनेक वर्ष घरी म्हणतो. तिचा प्रसार व्हावा हि इच्छा आहे.

रवी मावळला दिन हा गेला आलो सदनाला
या समयासी हे जगदीशा करितो नमनाला || धृ ||

दिवसा माझी नाना कामे जी जी रे पडली
आनंदाने दुःखाने वा सर्वही ती केली
कायिक वाचिक मानसिक वा कर्मे जी घडली
ती ती देवा प्रेम भराने अर्पी पद कमली || १ ||

आरती कृष्णाची

Submitted by कनू on 24 August, 2017 - 07:52

नमस्ते मित्र मैत्रिणींनो,
ही कृष्णाची आरती माझ्या बाबांच्या काकांनी तयार केली आहे.
आम्ही ती अनेक वर्ष घरी म्हणतो. तिचा प्रसार व्हावा हि इच्छा आहे.
तुम्हाला आवडल्यास तुम्हीही म्हणू शकता.

जय देव जय देव जय गोपाळा कृष्णा
तव गीतामृत पाने निवते भव तृष्णा || धृ ||

नीती न्याय दयादिक गुण जनी लोपोनि
अधर्म अन्यायाही त्रासली जब अवनी
दुष्टा निर्दालाया तव जगी अवतरुनि
सुष्टा रक्षियले त्वा सत्पक्षा धरुनी || १ ||

आरती गणपतीची

Submitted by कनू on 24 August, 2017 - 07:28

नमस्ते मित्र मैत्रिणींनो,

ही गणपतीची आरती माझ्या बाबांच्या काकांनी तयार केली आहे.
आम्ही ती अनेक वर्ष घरी रोज म्हणतो. तिचा प्रसार व्हावा हि इच्छा आहे.
तुम्हाला आवडल्यास तुम्हीही म्हणू शकता.

जय देव जय देव जय ओंकार रूपा
आरती ओवाळिता नुरविशी पापा || धृ ||

विश्वस्वरूपा तुजला स्थापू मी कोठे
आवाहन करू कैसे संमंतपी थाटे
तव निज महिमा आठविता तर्को दधि आटे
पाहुनी अद्भुत शक्ती आदर बहू वाटे || १ ||

आमच्या घरचा बाप्पा

Submitted by संयोजक on 21 August, 2017 - 21:05

aamacha-ganapati-2017.jpg

आला रे आला बाप्पा आला
दुःख विसरा मनी सुख हे भरा ||

येतोय भेटाया बाप्पा माझा
जल्लोष करा तयारी करा
स्वागत होऊ दे जंगी जरा
प्रसन्न झालाय माहोल सारा ||

कारण आलाय बाप्पा माझा
समई लावा रोषणाई करा
आरतीची वेळ झाली घाई करा ||

नाथ सांप्रदाय

Submitted by र।हुल on 11 August, 2017 - 10:32

हा धागा नाथ सांप्रदायाचा इतिहास,साहित्य,स्वरूप, सिद्धांत, पुजापद्धती तसेच नाथपंथाची महत्वाची स्थाने, नाथपंथीयांचं सामाजिक योगदान,आलेले अनुभव यांच्याबद्दलची चर्चा करण्यासाठी उघडण्यात आला आहे.

[स्पष्ट सुचना- या धाग्यावर वरील गोष्टींची एलर्जी असलेल्यांनी कृपया येऊ नये हि आग्रहाची हात जोडून विनंती. Happy ]

मायबोली २०१७ गणेशोत्सवासंबंधी घोषणा

Submitted by संयोजक on 6 August, 2017 - 22:19

IMG_5436.JPG

पयलं नमन हो करितो वंदन. पयलं नमन हो पयलं नमन. तुम्ही ऐका हो गुणिजन. आम्ही करितो कथन.

नमस्कार मायबोलीकर
हे मायबोलीचे एकविसावे वर्ष. या वर्षीच्या गणेशोत्सवात पाककृती स्पर्धा, लहान मुलांसाठी कार्यक्रम , झब्बू हे मायबोलीकरांचे आवडते कार्यक्रम तर आहेतच. सर्व माय॑बोलीकरांना आवडतील, लहान थोरांना भाग घेता येईल असे काही नवीन उपक्रमही यावर्षी असतील. या सर्व उपक्रमांबद्दलची माहिती संयोजक मंडऴ लवकरच इथे जाहीर करेल.

पंख पसरून उडणारी डुकरे

Submitted by उडता डुक्कर on 1 August, 2017 - 08:30

पंख पसरून उडणारी डुकरे

तू माझे काय झाले याची पर्वा केली नाहीस
आणि मी हि तुझी
कंटाळा आणि वेदनांशी सामना करीत आपण चाललो आहोत वेड्यावाकड्या मार्गावर
कधीतरी पावसाकढे बघत
कोणत्या नालायकाला दोष दयावा याचा विचार करीत
आणि बघत ती पंख पसरून उडणारी डुकरे

-उडता डुक्कर

(रूपांतरित / आधारित / प्रचोरीत)

!! आरती श्री स्वामी समर्थ !!

Submitted by शिवाजी उमाजी on 20 July, 2017 - 02:02

!! आरती श्री स्वामी समर्थ !!

श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
तुम्हा कृपेने, जीवन आमुचे होउ दे सार्थ!!धृ!!

कृपा तुमची सदैव असता, ना हो कुणी कष्टी
राहुनी अक्कलकोटी, असते आम्हावरी दृष्टी
गाउ किती, वर्णु किती, करू किती स्वार्थ
तुम्ही दिला, तुम्ही घडविला, जीवनासी अर्थ

श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
तुम्हा कृपेने, जीवन आमुचे होउ दे सार्थ !!१!!

भिऊ नकोस म्हणता, नेमे पाठीशी असता
संकट काळी, बळ देउनी, हरविल्या चिंता
वेळोवेळी प्रत्यय देउन, दिले कृपा तिर्थ 
होउन आता कृष्ण, करा शिवास कृतार्थ

देव भक्त

Submitted by पुरंदरे शशांक on 18 July, 2017 - 23:23

देव भक्त

पहाटेस झाडलोट
सडा घालूनी अंगणी
रखुमाई लगबगी
शेण्या लाविते चुल्हाणी

पाणी अाणी कावडीने
धारा काढी अावडीने
विठू हरखे अंतरी
संतसंगाच्या ओढीने

दिंडी येता पंढरीस
विठू धावला वेशीत
प्रेम भक्तांचे अद्भुत
ओढी संतांना कुशीत

देवसंतांचे मिळणी
येत भाविका उधाण
गेला गेला जीवभाव
एकमेका लोटांगण

भक्तीसुखे लोभावला
देवे त्यागिले वैकुंठ
युगे अठ्ठाविस उभा
भक्तांलागी तो तिष्ठत...

गुढ अर्थ

Submitted by शिवाजी उमाजी on 17 July, 2017 - 08:36

गुढ अर्थ

न्यायचे सोबती, कोणा काय ठाव !
तरी धावा धाव, संचयासी !!

सुखाच्या शोधासी, करीता प्रयत्न !
होईना तो अंत, कष्टाचाही !!

वृत्ती समाधानी, ठेवोनी पहाता !
लागे सुख हाता, विचारांती !!

सांगोनी ते गेले, नश्वर ही काया !
तरी जडे माया, देहावरी !!

संताच्या वाणीत, वसे गुढ अर्थ !
जावो न तो व्यर्थ, म्हणे शिवा !!
©शिवाजी सांगळे, मो.+919545976589

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - धार्मिक-साहित्य