देवपूजेतील चांदीची चिकट भांडी कशी स्वच्छ करावीत?

Submitted by sneha1 on 12 September, 2018 - 12:26

नमस्कार.
थोडे आधी विचारायला हवे होते खरे. देवपूजेतील चांदीची चिकट भांडी कशी स्वच्छ करावीत?
धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

येस
टूथपेस्ट एकदम बेस्ट
आणि नंतर भांडी धुवून फुसुन घ्यायची अन् ग्लास शायनिंगसाठी एक पावडर येते ती सुक्या भांड्यावर ब्रशने घासुन थोड़ावेळ ठेवून मग परत धुतली की खूप दिवस चकाकी टिकून राहते

As I am using phone; hence writing in English.

Wrap the silver artifacts in an aluminum foil.
Take a big utensil preferably that of Aluminum.
Fill water in it such a way that the silver artifacts wrapped in aluminum foil are completely immersed in it.
Add baking soda and washing powder to the water and keep it for boiling on a stove.
Once the water starts boiling keep it for some time.
The silver artifacts are cleaned to a greater extent.

भांडी फारच चिकट असतील (तेलाचे ओघळ इ. मुळे) तर आधी रांगोळीनं पुसून मग टूथपेस्ट + ब्रश असं वापरून बर्‍यापैकी स्वच्छ होतात.

पितांबरीचं सिल्व्हर क्लिनर सुद्धा फार छान रिझल्ट्स देतं पण ते वापरल्यावर भांडी संपूर्णपणे कोरडी करणं अत्यावश्यक नाहीतर पाण्याचे काळसर डाग पडतात...

सगळ्यांना धन्यवाद.
खरे म्हणजे मी आधी टूथपेस्ट ने घासलीत, पण हवी तेव्हढी स्वच्छ झाली नाहीत. आणि अल्युमिनियम फॉईल चा उपाय माहिती आहे, पण त्याच्यात हायड्रोजन सल्फाईड गॅस निघतो. एक्झॉस्ट फॅन लावून करायला हरकत नाही, पण मी आधीच इतकी सर्दी खोकल्याने हैराण झाली आहे की तो त्रास वाढायची भीती वाटते!

हे नव्हते माहिती ना..मी भांडी आणि ब्रश सगळे ओले करून केले.
मलाच कळायला पाहिजे होते, मी दात घासत नाहीये म्हणून!

साफ करायला- क्लोजअप जेल टूथपेस्ट बोटांनी चोळून ५ मिनिटे तसेच ठेवतो. नंतर वाहत्या पाण्यात धुवून काढतो.
सुती फडक्याने लगेच पुसून घेतो.
तेलकट डाग जास्तच असल्यास, स्टीलच्या पातेल्यात उकळवून जास्तीचा तेलकट पणा काढून वरील पायर्या करतो.

चमकवायला: कोलगेट टूथ पावडर चांदीच्या वस्तूवर टाकून सुती कपड्याने पाॅलीश. माझा अनुभव आहे कि सुरवातीला केलेले पाॅलीश १० दिवस टिकते.

वस्तू वापरून झाल्यावर दुसऱ्या दिवशी लगेचच वरीलप्रमाणे सफाई करून A4 कागदात गुंडाळून ठेवतो. त्यामुळे पुढील सफाईत वेळ आणि कष्ट वाचतात.

वस्तू वापरून झाल्यावर दुसऱ्या दिवशी लगेचच वरीलप्रमाणे सफाई करून A4 कागदात गुंडाळून ठेवतो. त्यामुळे पुढील सफाईत वेळ आणि कष्ट वाचतात.>>>>>> ही चांगली टिप!

अमेरिकेत असाल तर ब्राइट'स सिल्व्हर क्रीम - बहुतेक ग्रोसरी स्टोअर मधे क्लीनिंग सप्लाय मधे मिळते. ते वापरु शकता. जाळीदार, नक्षीदार सामान असेल तर टार्नेक्स आणि टुथ ब्रश बेस्ट . फक्त टार्नेक्स वापरताना ग्लव्ह्स घाला. त्याचा वास फार डेंजर आहे .

कंटेनर स्टोअर मध्ये सिल्वर पॉलिश मिळते. नेहमी तेच वापरते. व्यवस्थित भांडी स्वच्छ होतात. तेलकटपणा निघण्यासाठी अगोदर गरम पाण्यात उकळवून घेते.

साध्या पितांबरी ने चांदीची भांडी उत्तम साफ होतात. वापरून बघा. तेलकट पणा, काळे डाग, वातींचं काळे सगळं निघत.

निरांजने ,साबणाच्या पाण्यात उकळवून घेते. पूर्वी माझ्याकडे मोदी केयरचे लिक्विड होते.उकळलेली निरांजने त्यात सोडून २ मिनिटात बाहेर काढून परत साबणाने धुवायची.ते लिक्विड संपल्याने कोलगेट टूथ पावडरने सर्व साफ करतोय.पण जास्त काळ साफ रहातात.

कल्पेशकुमार, त्या पावडरीचे नाव द्याल का?

सगळ्यांना धन्यवाद. आता ब्राईट्स किंवा सिल्वर पॉलिश आणून ठेवेन. पीतांबरी मला वाटतं, इंडियन स्टोअर मधे असेल.
बरं, एक प्रश्न...ही चांदीची किंवा पितळेची भांडी कुणी डिशवॉशर मधे घातली आहेत का कधी?

मोठ्या तसराळ्यात (किंवा ड्रेन बंद करून सरळ सिंकमध्येच) एक अ‍ॅल्युमिनियम फॉइलची शीट घाला. त्यावर कडकडीत पाणी भरा. त्यात एक मोठा चमचा मीठ आणि तेवढाच वॉटर सॉफ्नर घाला. आता या पाण्यात चांदीची भांडी पाचेक मिनिटं बुडवून ठेवा. लखलखीत निघतात. मग साध्या पाण्याने विसळून घ्या आणि लगेच कोरडी पुसून ठेवा.

वॉटर सॉफ्नरऐवजी बेकिंग सोडाही चालतो असं ऐकलं आहे, मी प्रयोग केला नाही.